एक्स्प्लोर

Saif Ali Khan Attack Case : सैफवर हल्ला झाल्याची माहिती पोलिसांना करिनानं दिलीच नाही, लीलावती रुग्णालयातून मिळाली

Saif Ali Khan Attack Case : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आल्याचा आरोप मुंबई पोलिसांनी केला आहे. पोलिसांकडे पुरेसे पुरावे आहेत.

Saif Ali Khan Attack Case : अभिनेता सैफ अली खानवर (Actor Saif Ali Khan) वांद्रे (Bandra) येथील त्याच्या राहत्या घरात घुसून चोरट्यानं हल्ला केला. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला तात्काळ लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) दाखल करण्यात आलं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर सैफवर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली होती. तेव्हापासून आतापर्यंत या प्रकरणात अनेक खळबळजनक खुलासे करण्यात आले आहेत. आता याप्रकरणी आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. पोलिसांना सैफ अली खानवरील हल्ल्याची माहिती करिना (Kareena Kapoor Khan) किंवा खान कुटुंबाकडून नाही तर, लीलावती रुग्णालयातून मिळाली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याबाबत माध्यमांशी बोलताना पश्चिम विभागाचे अतिरिक्त एसीपी परमजीत सिंह दहिया म्हणाले की, पोलिसांना सैफ अली खानवरील हल्ल्याची माहिती कुटुंबाकडून नाही तर, लीलावती रुग्णालयातून मिळाली. सैफ अली खान पहाटे 2:57 वाजता ऑटो रिक्षानं रुग्णालयात पोहोचला. दरम्यान, पोलिसांनी अद्याप सैफला रुग्णालयात कोणी नेलं आणि हल्ल्यानंतर कुटुंबानं पोलिसांना का कळवलं नाही? याचा खुलासा केलेला नाही.

पोलीस अधिकारी दहिया यांनी दावा केला की, आम्ही ज्या व्यक्तीला अटक केली आहे, तो पूर्णपणे योग्य आरोपी आहे. यामध्ये संशयाला वाव नाही. आमच्याकडे फिजिकल, ओरल आणि टेक्निकल असे तिन्ही पुरावे आहेत. त्यामुळे या पुराव्यांच्या आधारे पोलीस आपली बाजू कोर्टात सिद्ध करू शकतात. 

पुणे सीआयडीकडे सॅम्पल्स

आरोपींच्या फिंगरप्रिंटबाबत जे अंदाज लावले जात आहेत, ते पूर्णपणे चुकीचे आणि निराधार असल्याचं एसीपी दहिया यांनी सांगितलं. दरम्यान, आतापर्यंत फॉरेंसिक डिपार्टमेंटकडून वांद्रे पोलिसांना फिंगरप्रिंटचे रिपोर्ट्स मिळालेले नाहीत. वांद्रे पोलिसांनी फिंगरप्रिंटचे नमुने पुणे सीआयडीकडे पाठवल्याचही त्यांनी सांगितलं आहे. 

आरोपी बंगालमार्गे बांगलादेशातून भारतात 

एसीपी दहिया पुढे म्हणाले की, जेव्हा आरोपी पश्चिम बंगालमार्गे भारतात आला, तेव्हा तो काही दिवस कोलकातामध्येही राहिला. कोलकातामध्ये ज्या महिलेच्या आधार कार्डवरून आरोपीनं सिम कार्ड घेतलं होतं, तिचा जबाब नोंदवण्यात आला आहे. आमची टीम कोलकातामध्ये असल्याची माहितीही त्यांनी दिली. आरोपीकडे असलेला चाकू आणि हेक्सा ब्लेड जप्त करण्यात आल्याची माहितीही दहिया यांनी दिली. सर्व साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. आरोपीची ओळख परेड अद्याप झालेली नाही.

पोलिसांकडून लपवाछपवी? 

दरम्यान, सैफ अली खान प्रकरणात अजुनही अनेक प्रश्न अनुत्तरीतच आहेत. ज्यांची उत्तरं मुंबई पोलिसांनीही दिलेली नाहीत. जसं की, ज्या दिवशी हल्ला झाला, त्या दिवशी नेमकं काय घडलं? याचा सीक्वेन्स अद्याप पोलिसांनी सांगितलेला नाही. आरोपीला सैफचे 11 व्या मजल्यावर असलेलं घर चोरीसाठी योग्य का वाटलं? तो खालच्या मजल्यावरही चोरी करू शकला असता. पोलिसांना पहाटे 3 वाजता आरोपीबद्दल माहिती मिळाली, तरीही तो सकाळी 7 वाजेपर्यंत सैफच्या घराजवळील वांद्रे तलाव, लकी हॉटेल परिसरात कसा फिरत राहिला? हे सर्व प्रश्न अनुत्तरीतच आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

KRK On Saif Kareena: बॉलिवूड स्टारकडून सैफ-करिनाची पोलखोल? 'त्या' रात्री काय-काय घडलं? पुराव्यानिशी सांगितलं

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss Marathi: महाट्रॉफी, 15 लाख अन्... रितेश भाऊंकडून तन्वी कोलतेला मिळाली खास भेटवस्तू, झाली भावुक
महाट्रॉफी, 15 लाख अन्... रितेश भाऊंकडून तन्वी कोलतेला मिळाली खास भेटवस्तू, झाली भावुक
Sachin Pilgaonkar Madhurani Gokhle: ‘नवरा माझा नवसाचा’नंतर 22 वर्षांनी मोठा धमाका; सचिन पिळगांवकर - मधुराणी गोखले पुन्हा एकत्र, नव्या ‘हिरो’ची एंट्री चर्चेत!
‘नवरा माझा नवसाचा’नंतर 22 वर्षांनी मोठा धमाका; सचिन पिळगांवकर - मधुराणी गोखले पुन्हा एकत्र, नव्या ‘हिरो’ची एंट्री चर्चेत!
Bigg Boss Marathi 6 Deepali Sayed Post: पाच लाखांची पैशांची बॅग खाली ठेवली; बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली..
पाच लाखांची पैशांची बॅग खाली ठेवली; बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली..
Nandita Patkar Uttarakhand Marriage: मुंबईत कोर्ट मॅरेज केल्यानंतर 44 वर्षीय मराठी अभिनेत्रीचं उत्तराखंडमध्ये विधिवत लग्न; फोटो पोस्ट करत म्हणाली..
मुंबईत कोर्ट मॅरेज केल्यानंतर 44 वर्षीय मराठी अभिनेत्रीचं उत्तराखंडमध्ये विधिवत लग्न; फोटो पोस्ट करत म्हणाली..

व्हिडीओ

Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका
Special Report Mumbai Local : मुंबईमध्ये आता अंडरग्राऊंड लोकल सुरु होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2026: सचिन, सेहवाग, द्रविडसोबत टीम इंडियाकडून टी-20 खेळला, तरीही आयपीएलमधून बाहेर! 'या' क्रिकेटरसोबत असं का घडलं?
सचिन, सेहवाग, द्रविडसोबत टीम इंडियाकडून टी-20 खेळला, तरीही आयपीएलमधून बाहेर! 'या' क्रिकेटरसोबत असं का घडलं?
Rashid Khan: 'आयपीएलच्या 2023 च्या मोसमात मला अफगाणिस्तान सोडून...' राशिद खानचा सनसनाटी खुलासा! नेमकं काय म्हणाला फिरकी स्टार?
'आयपीएलच्या 2023 च्या मोसमात मला अफगाणिस्तान सोडून...' राशिद खानचा सनसनाटी खुलासा! नेमकं काय म्हणाला फिरकी स्टार?
Kolhapur Crime: ऑनलाईन गेमिंगमध्ये लावलेले सगळे पैसे हरला, कोल्हापुरात तरुणाने नैराश्याच्या भरात आयुष्य संपवलं; अवघ्या वर्षभरापूर्वीच वडिलांचे निधन
ऑनलाईन गेमिंगमध्ये लावलेले सगळे पैसे हरला, कोल्हापुरात तरुणाने नैराश्याच्या भरात आयुष्य संपवलं; अवघ्या वर्षभरापूर्वीच वडिलांचे निधन
Hingoli Crime : अनैसर्गिक संबंधांसाठी नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिकाचा तगादा, सततच्या त्रासाला कंटाळून 24 वर्षीय तरुणाने आयुष्य संपवलं, कळमनुरी हादरलं!
अनैसर्गिक संबंधांसाठी नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिकाचा तगादा, सततच्या त्रासाला कंटाळून 24 वर्षीय तरुणाने आयुष्य संपवलं, कळमनुरी हादरलं!
Sudhir Mungantiwar vs Kishor Jorgewar: 'हा वाद माझ्या आटोक्याबाहेर'; चंद्रपुरातील मुनगंटीवार-जोरगेवार वादासमोर भाजप प्रदेशाध्यक्षांनी टेकले हात, आता थेट दिल्लीतून होणार फैसला, नेमकं काय घडलं?
'हा वाद माझ्या आटोक्याबाहेर'; चंद्रपुरातील मुनगंटीवार-जोरगेवार वादासमोर भाजप प्रदेशाध्यक्षांनी टेकले हात, आता थेट दिल्लीतून होणार फैसला, नेमकं काय घडलं?
Sanjeev Jaiswal Motilal nagar: 'घरं कशी मिळतात बघतो, तू घुसखोर आहेस का?, इथूनच उचलतो', म्हाडाच्या संजीव जयस्वालांची रहिवाशांच्या बैठकीत मुजोरी
'घरं कशी मिळतात बघतो, तू घुसखोर आहेस का?, इथूनच उचलतो', म्हाडाच्या संजीव जयस्वालांची रहिवाशांच्या बैठकीत मुजोरी
Bigg Boss Marathi 6 Deepali Sayed Post: पाच लाखांची पैशांची बॅग खाली ठेवली; बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली..
पाच लाखांची पैशांची बॅग खाली ठेवली; बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली..
Local Train Accident Dombivli: मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Embed widget