Sai Tamhankar on Politics : 'राजकारणात नव्या विचारसरणीची गरज', निवडणुकांआधी सई ताम्हणकरच्या वक्तव्यानं वेधलं लक्ष
Sai Tamhankar on Politics : अभिनेत्री सई ताम्हणकर हिने शिर्डीतील साईबाबांचं दर्शन घेतलं. यावेळी तिने राजकारणाविषयी देखील भाष्य केल्याचं पाहायला मिळालं आहे.
Sai Tamhankar on Politics : तिच्या अभिनयामुळे सई ताम्हणकर (Sai Tamhankar) ही कायमच चर्चेत असते. सई ही कधी तिच्या लुक्समुळे तर कधी तिच्या चित्रपटांमुळे कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आलीये. सध्या राज्यासह देशभरातही निवडणुकांच वातावरण आहे. त्यातच कलाकारही या निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) वातावरणामध्ये चर्चेचा विषय ठरत असतात. नुकतच सईने या निवडणुकांच्या वातावरणात राजकारणावर केलेलं तिचं वक्तव्य चर्चेचा विषय ठरलाय.
सईने नुकतच शिर्डी साई मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी तिला राजकारणाविषयी देखील भाष्य केलं आहे. राजकारण हा वेट आणि वॉचचा गेम असतो, असंही सईने यावेळी म्हटलं आहे. निवडणुकांच्या वातावरणात सईच्या या वक्तव्याने साऱ्यांचच लक्ष वेधून घेतलं आहे. दरम्यान पाडव्याला सई तिच्या नव्या प्रोजेक्टविषयी देखील घोषणा करणार असल्याचं सूचक वक्तव्य तिनं यावेळी केलं.
राजकारणात नव्या विचारसरणीची गरज - सई ताम्हणकर
राजकारणाविषयी काय वाटतं या प्रश्नावर बोलताना सई म्हणाली की, जसं एखादा सिनेमा आल्यावर तो किती कमाई करेल हे सांगू शकत नाही, त्याचप्रमाणे राजकारणात कधी काय होईल हे कोणीही सांगू शकत नाही. राजकारण हा वेट अँड वॉचचा गेम आहे. त्यामुळे आपण ते एन्जॉय करायचं असतं. राजकारणात सध्या नव्या विचारसरणीची गरज आहे आणि ती राजकारणात येतही आहे.
View this post on Instagram
सई गुढीपाडव्याला देणार नव्या प्रोजेक्टविषयी माहिती?
यावेळी सईला नवीन काय आहे? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना सई म्हणाली की, हो काही नवीन प्रोजेक्ट आहेत. पण असं म्हणतात की आपण जी प्रार्थना करतो ती सांगायची नसते. त्यामुळे मी ते सांगणार नाही, बाकी तुम्हाला गोष्टी पाडव्याला कळतीलच. त्यामुळे येत्या पाडव्याला सई तिच्या चाहत्यांना कोणती गुडन्यूज देणार याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांमध्ये लागून राहिली आहे.
View this post on Instagram