गंमत झाली आता... 'चला हवा येऊ द्या' फेम 'या' अभिनेत्याची बिग बॉसच्या घरात एन्ट्री? पोस्ट व्हायरल
छोट्या पडद्यावर खळखळून हसवणारा हा अभिनेता बिग बॉसच्या सहाव्या पर्वात येण्याची शक्यता आहे.

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला गेली आहे. यंदाचा सीजन अभिनेता रितेश देशमुख होस्ट करणार आहे. नव्या सीजनमध्ये कोणते स्पर्धक असणार यावरून प्रेक्षकांची उत्सुकता चाळवली गेली आहे. 11 जानेवारीपासून रात्री 8 वाजता बिग बॉस चा सीजन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सीजन सुरु होण्याआधी अनेक नावांची चर्चाही होती. सोशल मीडियावर अनेक अंदाज व्यक्त होत असताना आता आणखी एका व्यक्तीची जोरदार चर्चा आहे. चला हवा येऊ द्या फेम अभिनेता सागर कारंडे बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात दिसणार असल्याचं बोललं जातंय. त्याची सोशल मीडिया पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.
गंमत झाली आता ..
सागर कारंडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात 'गंमत झाली आता ***जंमत होणार ..लवकरच तुमच्या भेटीला 2026 ' असं त्याने पोस्ट केलंय . अभिनेता सागर कारंडे खरंच बिग बॉसच्या पर्वत सहभागी होणार आहे का याबाबत त्याने स्पष्ट काही सांगितलेले नाही.पण त्याच्या या पोस्टमुळे चाहते अंदाज बांधत आहेत. पण आता अवघे काही दिवसच बिग बॉसच्या पर्वाला शिल्लक राहिले आहेत,त्यामुळे चाहत्यांना लवकरच स्पर्धकांबद्दल स्पष्ट कल्पना मिळेल.
View this post on Instagram
सागर कारंडेना चला हवा येऊ द्या या शो मधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली .या शोमध्ये तो साकारत असलेलं स्त्री पात्र चांगलंच लोकप्रिय झालं. त्यानं साकारलेली पोस्टमनची भूमिका देखील खूप प्रसिद्ध झाली. छोट्या पडद्यावर खळखळून हसवणारा हा अभिनेता बिग बॉसच्या सहाव्या पर्वात येण्याची शक्यता. चला हवा येऊ द्या' हा शो संपल्यानंतर सागर कारंडे फारसा कुठे दिसला नाही. सध्या त्याचं 'हिच तर फॅमिलीची गंमत आहे' हे नाटक सुरू आहे. चला हवा येऊ द्या सोडल्यानंतर त्याने यापुढे स्त्री पात्र करणार नसल्याचं सांगितलं होतं.























