संजीव कुमार थेट माझ्या घरी आले आणि ऑटोग्राफ घेतला, त्यावेळी मी 14-15 वर्षांचा होतो, सचिन पिळगावकरांनी सांगितला किस्सा
Sachin Pilgaonkar on Sanjeev Kumar : संजीव कुमार थेट माझ्या घरी आले आणि ऑटोग्राफ घेतला, त्यावेळी मी 14-15 वर्षांचा होतो, सचिन पिळगावकरांनी सांगितला किस्सा

Sachin Pilgaonkar on Sanjeev Kumar : मराठी चित्रपटसृष्टीतील आणि बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी एक किस्सा सांगितलाय. जो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलाय. सचिन पिळगावकर यांनी सर्वात पहिल्यांदा कोणाचा ऑटोग्राफ घेतला आणि त्यांचा ऑटोग्राफ पहिल्यांदा कोणी घेतला? याबाबत त्यांनी एक किस्सा सांगितलाय. सचिन पिळगावकर यांनी नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊयात..
सचिन पिळगावकर म्हणाले, माझा पहिला ऑटोग्राफ एका माणसाने घेतला होता, ते मी कधीच विसरु शकत नाही. एक काळ असा आला होता. विशू राजे हे माझ्या वडिलांचे मित्र होते. त्यांना Ha Majha Marg Ekala हा चित्रपट हिंदीमध्ये करायचा होता. तेव्हा मी 14-15 वर्षांचा असेन. त्यांना तो चित्रपट हरीभाईंबरोबर बनवायचा होता. म्हणजे संजीव कुमार यांच्याबरोबर...मग त्यांना एक ट्रायल ठेवली होती. ही ट्रायल अजंथा आर्टमध्ये ठेवली होती. हरीभाईंनी तो पूर्ण सिनेमा तिथे पाहिला. सिनेमा पाहून बाहेर आले. सायंकाळचे 7 वाजले होते. त्यांनी विशूराजेला विचारलं सचिन कुठे राहातो माहिती आहे का? ते म्हणाले मला माहिती आहे. मग ते म्हणाले, मला घेऊन जाता का त्याच्याकडे...ते लगेच म्हणाले हो चला.. ते गाडीत बसले. जाताना सांताक्रुझमध्ये एका स्टेशनरी शॉपजवळ हरीभाईंनी गाडी थांबवली. एक ऑटोग्राफ बुक घेतलं. एक पेन विकत घेतला. ते घरी आले. बेल मारली. वडिलांनी दरवाजा उघडला तर समोर संजीव कुमार उभे होते. ते म्हणाले हरीभाई आतमध्ये या.. ते म्हणाले सचिन आहे का? बोलवा त्याला. ते हॉलमध्ये बसले. मी आलो.. त्यांनी सांगितलं मी आताच Ha Majha Marg Ekala हा चित्रपट पाहून आलोय. मी आयुष्यात कोणाचा ऑटोग्राफ घेतला नाही. मी आयुष्यातील पहिला आटोग्राफ घेऊ तुझा घेऊ इच्छित आहे, असं म्हटले आणि माझ्यासमोर आटोग्राफ बुक ठेवलं. पेन दिला. मी त्यांना ऑटोग्राफ दिला. मी लिहिलं, हरीभाऊ विथ लव्ह.. सचिन.. ती ऑटोग्राफ मी आयुष्यात कधीही विसरणार नाही.
पुढे बोलताना सचिन पिळगावकर म्हणाले,मी आयुष्यातील पहिला ऑटोग्राफ घेतला तेव्हा फार लहान होतो. कदाचित मी वहीवरती हा ऑटोग्राफ घेतला होता. माझ्याकडे त्या काळी ऑटोग्राफ बुक वगैरे काही नव्हतं. मला आठवतंय मी अभ्यास करण्यासाठी ती वही घेऊन गेलो होतो. राजकमल स्टुडिओमध्ये शूटिंग चालू होतं. मी लहान होतो माझं वय 7 वर्ष होतं. मी टॅक्सीतून बाहेर पडलो. राजकमल स्टुडिओमध्ये मी गेलो. आम्ही सोबत कधीही काम केलं नाही. पण मी त्यांना मधू आंटी (मधुबाला) म्हणून हाक मारली आणि पळालो. तिने माझ्याकडे पाहिलं..आम्ही हात पसरवले..मी गेलो आणि मिठीच मारली. मी म्हटलं मधुआंटी एक मिनीट...मी पुस्तक आणि पेन काढला आणि म्हटलं एक ऑटोग्राफ द्या. त्या म्हणाल्या तुला पाहिजे माझा आटोग्राफ..मग त्यांनी आटोग्राफ दिला. आटोग्राफ देताना मी खाली पाहिलं. मला द्या बाईचे पाय दिसले. ती बाई जितकी सुंदर होती, त्याच्या 10 पटीने त्या बाईचे पाय सुंदर होते. असे पाय मी आयुष्यात कधी बघितले नाहीत. इतके सुंदर तिचे पाय होते. बापरे बाप.. त्या म्हणाल्या कुठे शूटिंग सुरु आहे. मी येते तिकडं...त्यानंतर ब्रेकमध्ये त्या आल्या.. आम्ही सोबत बसलो. मात्र, मी घेतलेला तो पहिला ऑटोग्राफ होता. जो मी माझ्या आयुष्यात घेतला.
इतर महत्त्वाच्या बातम्या
VIDEO : अमिताभ बच्चन पापाराझींना पाहाताच भडकले, म्हणाले; 'व्हिडीओ नका काढू, बंद करा'























