VIDEO : अमिताभ बच्चन पापाराझींना पाहाताच भडकले, म्हणाले; 'व्हिडीओ नका काढू, बंद करा'
Amitabh Bachchan gets angry : महानायक अमिताभ बच्चन यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते पापाराझींवर भडकलेले पाहायला मिळत आहेत.

Amitabh Bachchan gets angry : महानायक अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचा महानायक म्हणून ओळखलं जातं. केवळ त्यांच्या अभिनयासाठीच नव्हे, तर त्यांच्या शांत स्वभावासाठीही ते प्रसिद्ध आहेत. ते चाहत्यांशी आणि पॅपराझींशी देखील प्रेमाने आणि आदराने वागतात. मात्र, अलीकडे अमिताभ बच्चन यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ते आपल्या नेहमीच्या शांत स्वभावाच्या अगदी विरुद्ध वागताना दिसत आहेत. अमिताभ बच्चन पापाराझींवर भडकलेले पाहायला मिळत आहेत.
View this post on Instagram
*अमिताभ बच्चन फोटोग्राफरला पाहाताच भडकले, म्हणाले; 'व्हिडीओ नका काढू, बंद करा'* pic.twitter.com/ycKOGHTgI9
— Sumit Bhujbal (@SumitBhujb19648) July 20, 2025
व्हायरल व्हिडिओमध्ये नेमकं काय घडलं?
व्हायरल व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन मुंबईतील त्यांच्या बंगल्याबाहेर पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पायजमा आणि खांद्यावर शाल घेतलेले दिसतात. ते बंगल्याबाहेर येत असतानाच, जेव्हा त्यांना कॅमेरा आपल्याकडे वळलेला दिसतो, तेव्हा त्यांचा चेहऱ्यावरील भाव अचानक बदलतो.
पॅपराझींवर व्यक्त केला राग
व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन पॅपराझींवर चिडलेले दिसतात. त्यांना "ए व्हिडिओ मत निकालो, बंद करो" असं म्हणताना ते खूप रागात दिसतात. त्यांचा हा राग पाहून फक्त चाहतेच नव्हे, तर पॅपराझी देखील आश्चर्यचकित झाले.
*अमिताभ बच्चन फोटोग्राफरला पाहाताच भडकले, म्हणाले; 'व्हिडीओ नका काढू, बंद करा'* pic.twitter.com/ycKOGHTgI9
— Sumit Bhujbal (@SumitBhujb19648) July 20, 2025
ही घटना नेमकी कधी घडली?
या घटनेची नेमकी तारीख किंवा वेळ स्पष्ट नाही, पण हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे आणि अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. जे लोक अमिताभ बच्चन यांना जवळून ओळखतात, त्यांना माहीत आहे की ते फोटोग्राफर्सशी नेहमीच सौजन्याने वागतात – बहुधा हात जोडून किंवा नम्रतेने मान हलवून त्याना अभिवादन करतात.
‘अश्वत्थामा’च्या भूमिकेत दिसले होते अमिताभ बच्चन
अमिताभ बच्चन यांना नुकतीच प्रदर्शित झालेल्या ‘कल्कि 2898 ए.डी.’ या चित्रपटात पाहिलं गेलं होतं. त्यांनी या चित्रपटात ‘अश्वत्थामा’ ही महत्त्वाची भूमिका साकारली होती, जी प्रेक्षकांनी खूपच पसंत केली. महाभारतावर आधारित या चित्रपटात प्रभास, दीपिका पादुकोण आणि कमल हासन यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. आता बिग बी या चित्रपटाच्या सिक्वेलमध्येही दिसणार आहेत.
‘ब्रह्मास्त्र पार्ट 2’ मध्ये देखील झळकणार
‘कल्कि 2898 ए.डी. 2’ व्यतिरिक्त अमिताभ बच्चन लवकरच रणबीर कपूरसोबत ‘ब्रह्मास्त्र पार्ट 2’ मध्येही झळकणार आहेत. या चित्रपटाबद्दल अजून फारशी माहिती समोर आलेली नाही, पण प्रेक्षकांमध्ये त्याबद्दल उत्सुकता नक्कीच वाढत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
























