RRR : आरआरआर रिलीज होण्याआधी थिएटरच्या स्क्रिनसमोर ठोकले खिळे; जाणून घ्या कारण
25 मार्च रोजी आरआरआर (RRR) हा चित्रपट रिलीज होणार आहे.
RRR : आरआरआर (RRR) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेनं वाट पाहात आहेत. आलिया भट्ट (Alia Bhatt), अजय देवगन (Ajay Devgn), ज्युनियर एनटीआर (Jr NTR) आणि राम चरण (Ram Charan) अशी तगडी स्टार कास्ट या चित्रपटामध्ये काम करणार आहे. 25 मार्च रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. चित्रपटामधील शोले गाणं काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालं. या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली. हा चित्रपट रिलीज होण्याआधी चित्रपटगृहाच्या मालकांनी मोठा निर्णय घेतला आहे.
थिएटरच्या मालकांनी आरआरआर रिलीज होण्याआधी चित्रपटगृहांमधील स्क्रिनसमोर खिळे ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. ANI नं नुकतच एक ट्वीट शेअर केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी थिएटरचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. या फोटोमध्ये आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील वेंकटेश्वरलु अन्नपूर्णा थिएटरमध्ये स्क्रिन समोर खिळे ठोकण्यात आलेले दिसत आहेत. थिएटमधील कर्मचाऱ्यानं सांगितलं की, 'आम्ही स्क्रिन समोर खिळे ठोकले आहेत, कारण हा चित्रपट पाहिल्यानंतर लोक उत्साहित होतील आणि स्क्रिन समोरच्या पोडियमवर चढतील. त्यामुळे स्क्रिनला नुकसान होऊ शकते. '
Vijaywada, Andhra Pradesh | Ahead of #RRRMovie release, 'Venkateswarlu Annapurna Theatre' places nail fencing before the screen to restrict audience, "We have taken such steps as people might get excited, climb the podium, which can damage the screen," says theatre in-charge pic.twitter.com/x42Frb5OCb
— ANI (@ANI) March 24, 2022
'आरआरआर' बिग बजेट चित्रपट
रिपोर्टनुसार, आरआरआर हा चित्रपट तयार करण्यासाठी 400 कोटी रूपये खर्च करण्यात आले. या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी राम चरण आणि ज्युनियर एनटीआरनं 45 कोची रूपये मानधन घेतलं आहे तर आलियनं नऊ कोटी मानधन घेतलं. अजय देवगणनं या चित्रपटात कमी वेळासाठी स्क्रिन शेअर करणार आहे. त्यानं या चित्रपटासाठी 25 कोटी फी घेतली आहे.
संबंधित बातम्या
- TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
- Dasvi Trailer: दसवीचा ट्रेलर पाहिल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले...
- The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स' सिनेमा पाहण्यासाठी गेलेल्या महिलेकडून रिक्षा चालकाने भाडं घेतलं नाही, विवेक अग्निहोत्रीने मानले आभार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha