एक्स्प्लोर

Nasrapur: पुण्यातील नसरापूर प्रकरणी रितेश देशमुखचा संताप, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शिक्षेची आठवण, म्हणाला..

Riteish Deshmukh reaction on Nasrapur Crime Case: नरसापूर घटनेवर रितेश देशमुखनं तीव्र संताप व्यक्त केला.

Riteish Deshmukh reaction on Nasrapur Crime Case: पुण्यातील भोर तालु्क्यातील नसरापूर (Narsapur) येथे घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण राज्यातून रोष व्यक्त केला जात आहे.  एका 65 वर्षाच्या नराधमाने  4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला. यानंतर त्यानं चिमुरडीची दगडाने ठेचून हत्या केली. ही घटना उघडकीस येताच सर्व स्तरातून रोष व्यक्त केला जात आहे. या संतप्त घटनेविरोधात  अभिनेता रितेश देशमुखनेही तीव्र संताप व्यक्त केला. रितेश  देशमुख (Riteish Deshmukh) सध्या त्याचा आगामी 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) सिनेमामुळे चर्चेत आहे.  आज तो पुण्यातील प्रसिद्ध  श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथे दर्शनासाठी गेला होता.  यावेळी माध्यमांशी संवाद साधताना नसरापूर प्रकरणावर त्यानं प्रतिक्रिया दिली. तसेच आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. 

नसरापूर प्रकरणावर रितेश देशमुख नेमकं काय म्हणाला? (Riteish Deshmukh reaction on Nasrapur)

माध्यमांशी संवाद साधताना रितेश देशमुखने नसरापूर प्रकरणी संताप व्यक्त केला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील शिक्षेचा संर्दभ देत आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली. 'छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील चौरंग करण्याच्या शिक्षेची आज आठवण झाली.  आपल्या राज्यात किंवा देशात अशा गोष्टी घडतात, तेव्हा खरंच खूप राग येतो.  एवढा राग येतो की, आपल्या हातात गोष्टी असूनही, आपण  काहीच करु शकत नाही'. 

'नसरापूर प्रकरणी लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा' - रितेश देशमुख (Riteish Deshmukh expresses anger over the shocking Nasrapur crime)

'आपण फक्त एवढीच इच्छा व्यक्त करू शकतो की, सरकार, पोलीस आणि कोर्टाने या प्रकरणी लवकरात लवकर निर्णय घ्यावा. आरोपीवर कठोर कारवाई करणं, अतिशय गरजेचं आहे. कारवाई केली तर, भीती आणि दरारा कायम अशा व्यक्तींच्या मनात राहेल, जे असे कृत्य करण्याचा विचार करतात', असं रितेश देशमुख म्हणाला. 'अशा गोष्टी घडतात तेव्हा वाईट वाटतं, धक्का बसतो. जनआक्रोश होणं हे साहजिकच आहे. फास्टट्रॅकवर निर्णय घेतला की, लोकांमध्ये नक्कीच याचा दबदबा राहेल, असं मला वाटतं ', असंही रितेश देशमुख म्हणाला.

'पूर्वीचे घेतले जाणारे निर्णय, शिक्षा वेगळे होते. तो काळ आणि हा काळ वेगळा आहे, हे पण आपण समजून घेणं गरजेचं आहे.  आताचे नियम वेगळे आहेत. आपला संविधान आहे. जे काही आहे,  नियमात राहून करावं लागतं. आपल्याकडे नियम आहेत. पण मला असं वाटतं की, अशा प्रकरणात जेवढ्या लवकरात लवकर निर्णय घेण्यात येतात, तेवढे बरे असतात',  असंही रितेश देशमुख म्हणाला. 

महत्त्वाच्या बातम्या

Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
ZEE5 Marathi: मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशात तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशात तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Embed widget