एक्स्प्लोर

Raja Shivaji Salman Khan: 'सलमानच्या प्रश्नाने मी निरुत्तर झालो '; 'राजा शिवाजी' सिनेमात सलमान खानची एन्ट्री झाली कशी? रितेशने सगळं सांगितलं!

Raja Shivaji: ही एन्ट्री आहे सलमान खानची. राजा शिवाजी चित्रपटात सलमान खानही कॉमिओ करणार असल्याच्या चर्चा आहेत.

Raja Shivaji Salman Khan: अभिनेता रितेश देशमुखच्या राजा शिवाजी या चित्रपटाची सध्या मनोरंजनसृष्टीत एकच चर्चा आहे. मे 2026 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांच्या यादीतला हा बिगबजेट सिनेमा समजला जातोय. सुमारे 100 कोटींचं बजेट असणाऱ्या या चित्रपटात रितेश देशमुख, संजय दत्त, अभिषेक बच्चन यांच्यासह अनेक दमदार कलाकारांची स्टारकास्ट आहे. शिवाजी महाराजांच्या शौर्यावर आधारित असणाऱ्या या चित्रपटात मराठी इंडस्ट्रीसह बॉलीवूडच्या कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे.   पण या सगळ्या कलाकारांमध्ये आणखी एक सरप्राईज एन्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ही एन्ट्री आहे सलमान खानची. राजा शिवाजी चित्रपटात सलमान खानही कॉमिओ करणार असल्याच्या चर्चा आहेत. आता स्वतः रितेशने एका मुलाखतीत सलमान खान करणार असलेल्या भूमिकेविषयी सांगितलंय.

'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली?

'राजा शिवाजी' चित्रपटाच्या निमित्ताने महाराष्ट्र टाइम्स ला मुलाखत देताना रितेशने या सिनेमात सलमानच्या एन्ट्रीबद्दल सांगितलं. तो म्हणाला ' खरंतर सलमान भाऊ सिनेमात आहेतच. पण ते कोणती व्यक्तिरेखा किंवा भूमिका साकारणार आहेत ,हे मी आत्ता सांगणार नाही. 31 डिसेंबर 2024 रोजी आमची भेट झालेली. मी छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमा करतोय हे त्यांना माहीत होतं. त्यावेळी त्यांनी मला माझी भूमिका कोणती असं अचानक विचारलं. त्यावेळी मी अक्षरशः निरुत्तर झालेलो. तुझ्या सिनेमात मी असणारच असं देखील ते म्हणाले होते. " असं रितेशने सांगितलं.

रितेश देशमुख आणि सलमान खान यांच्या मैत्रीची कायम चर्चा असते. रितेशच्या प्रत्येक सिनेमात सलमान कॉमिओ करताना दिसतो. आआधी रितेशच्या वेळ आणि लय भारी सिनेमातही सलमान खान दिसला होता. आता 'राजा शिवाजी' सिनेमात तो कोणती भूमिका साकारणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष आहे. अनेक जण तर जिवा महालाची भूमिका साकारणार असल्याचे बोलतायत. पण अद्याप या भूमिकेबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. येत्या एक मे रोजी राजा शिवाजी हा चित्रपट सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 

राजा शिवाजी चित्रपटातील कलाकार

राजा शिवाजी सिनेमात अभिषेक बच्चन महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तो संभाजी शहाजी भोसले यांचे पात्र साकारतोय.तर संजय दत्त अफजलखानाच्या भूमिकेत दिसणार असल्याचा वृत्त आहे.रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. तर जेनेलिया देशमुख ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी महाराणी सईबाई यांची भूमिका साकारणार आहेत. फरदीन खान शहाजहाच्या भूमिकेत दिसणार आहेत. महेश मांजरेकर हे लखुजी जाधव यांच्या भूमिकेत तर विद्या बालन ताजल मुखिदरात या भूमिकेत दिसणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Priya Berde Post: भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
Zoya Akhtar on Zindagi Na Milegi Dobara 2: 15 वर्षांनंतर 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'चा सीक्वेल? झोया अख्तरने दिली मोठी अपडेट 
15 वर्षांनंतर 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'चा सीक्वेल? झोया अख्तरने दिली मोठी अपडेट 

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Embed widget