एक्स्प्लोर

Raja Shivaji: राजा शिवाजी’ ठरणार गेमचेंजर! अभिषेक बच्चनच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; भूमिकेची जोरदार चर्चा

त्याच्या या भूमिकेमुळे इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय नव्या पिढीसमोर भव्य स्वरूपात साकारला जाणार आहे.

Raja Shivaji: जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित ‘राजा शिवाजी’ हा बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपट सध्या चित्रपटसृष्टीत चर्चेचा विषय ठरत आहे. रितेश देशमुख आणि अभिषेक बच्चन या दोन अष्टपैलू आणि दमदार कलाकारांना एकत्र आणणारा हा प्रकल्प केवळ भव्यतेसाठीच नाही, तर त्यामागील भावनिक आणि ऐतिहासिक आशयासाठीही विशेष ठरत आहे. अभिषेकसाठी ‘राजा शिवाजी’ हा त्याच्या कारकिर्दीतील पहिलाच मराठी चित्रपट असून, हा त्याच्या सिनेमाच्या प्रवासातील एक धाडसी आणि महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. या चित्रपटात अभिषेक हा छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रमी पण तुलनेने कमी चर्चेत राहिलेले ज्येष्ठ बंधू संभाजी शहाजी राजे भोसले यांची भूमिका साकारत आहे. त्याच्या या भूमिकेमुळे इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय नव्या पिढीसमोर भव्य स्वरूपात साकारला जाणार आहे.

अभिषेक दिसणार प्रभावी अवतारात

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘राजा शिवाजी’च्या दमदार ‘फर्स्ट लूक टीझर’मध्ये अभिषेक एका पूर्णपणे वेगळ्या आणि प्रभावी अवतारात दिसून येतो. योद्ध्याचा साज चढवलेला पेहराव, रणांगणावरची त्याची दमदार उपस्थिती आणि बंधुप्रेमाची झलक दाखवणारा भावनिक आविष्कार यामुळे हा टीझर प्रेक्षकांना अक्षरशः भारावून टाकतो. या झलकमधून हा चित्रपट केवळ युद्धांवर आधारित नसून, भावना, नातेसंबंध आणि इतिहासाचा भव्य पट मांडणारा सिनेअनुभव ठरणार आहे, याची स्पष्ट चाहूल लागते.

भूमिकेविषयी अभिषेक म्हणाला..

आपल्या पहिल्या मराठी चित्रपटाबद्दल बोलताना अभिषेक म्हणाला, “हा माझा पहिलाच मराठी चित्रपट आहे आणि याचा भाग होणे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. रितेशचे छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवण्याचे स्वप्न अनेक वर्षांपासून आहे. मी त्याला जवळपास २५ वर्षांपासून ओळखतो. लातूरमध्ये माझ्या ‘जमीन’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आमची पहिली भेट झाली. त्या वेळी मी अजय देवगण सोबत शूटिंग करत होतो आणि तो आम्हाला भेटायला आला होता. तिथूनच आमच्या मैत्रीची सुरुवात झाली आणि पुढे आम्ही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले,” असे त्याने सांगितले.

तो पुढे म्हणाला की, एकदा रितेशच्या घरी भेट दिली असता त्याने अभिनयाच्या पलीकडे जाऊन दिग्दर्शन करण्याचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट साकारण्याचे आपले स्वप्न त्याच्या समोर मांडले होते. “हे असे स्वप्न आहे जे त्याने अनेक वर्षे जपले आणि त्यासाठी सातत्याने मेहनत घेतली,” असेही त्याने नमूद केले.

अंगावर रोमांच उभे करणारा टीझर 

‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक टीझर ३१ मार्च रोजी डिजिटल माध्यमांवर प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. भव्य दृश्यरचना, ॲक्शनने भरलेले प्रसंग, ऐतिहासिक वातावरण आणि तीव्रता यामुळे हा टीझर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. अनेकांनी या झलकचे वर्णन “अंगावर रोमांच उभे करणारा अनुभव”, “भव्य दृश्यसोहळा” आणि “परिपूर्ण सिनेमा” असे करत भरभरून कौतुक केले आहे.

अभिषेकने रितेशच्या दिग्दर्शनाचे कौतुक करत म्हटले की, “त्याने कदाचित आजवरचा सर्वात महत्त्वाकांक्षी मराठी चित्रपट साकारला आहे. एक दिग्दर्शक म्हणून त्याची क्षमता किती आहे, याबद्दल मला कोणतीही शंका नाही. तो असे काहीतरी निर्माण करणार आहे, जे मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक मैलाचा दगड ठरेल. या प्रकल्पाचा भाग होता आल्याबद्दल मला प्रचंड आनंद आहे आणि मला वाटते की हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण क्षण ठरेल,” असे त्याने सांगितले.

दिग्गज कलाकारांची फौज

सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल यांचे दमदार संगीत आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार संतोष सिवन यांचे अप्रतिम छायांकन या चित्रपटाला वेगळीच उंची प्रदान करत आहे. प्रत्येक फ्रेममध्ये भव्यता आणि ऐतिहासिक वास्तवतेची झलक जाणवते. या चित्रपटात संजय दत्त, अभिषेक, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जिनिलिया देशमुख आणि स्वतः रितेश यांसारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश आहे, ज्यामुळे या चित्रपटाचा आवाका अधिकच भव्य झाला आहे.

‘जिओ स्टुडिओज’द्वारे सादर करण्यात आलेला आणि ‘मुंबई फिल्म कंपनी’च्या बॅनरखाली ज्योती देशपांडे व जिनिलिया देशमुख यांनी निर्मित केलेला ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट १ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये मराठी, हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. भारतीय इतिहासाचा गौरवशाली वारसा नव्या पिढीसमोर भव्यतेने आणि भावनिकतेने उलगडणारा हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय सिनेअनुभव ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Bollywood Actor in Jalna School: जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
Friday Release This Week: सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
Aadesh Bandekar On Puja Birari: 'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'

व्हिडीओ

Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget