मला माहितीये.. तू आहेस! 'दिल बेचारा' रिलीज आधी रियाच्या पोस्टने माहौल इमोशनल
सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बरोबर 40 दिवसांनी हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. ही घटना घडल्यानंतर इतके दिवस उलटूनही अद्याप त्याच्या आत्महत्येचा तपास चालू आहे. अशातच हा चित्रपट येत असल्याने नेटकऱ्यांमध्ये सध्या कमालीची उत्सुकता आहे.
मुंबई : आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. आज जगात कितीही घडामोडी घडल्या तरी संपूर्ण ऑनलाईन विश्वाचं लक्ष लागलं आहे ते सुशांतसिंह राजपूतचा सिनेमा येण्याकडे. आज सायंकाळी साडेसात वाजता त्याचा 'दिल बेचारा' हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. डिस्ने हॉटस्टारवर तो दिसेल. सुशांतचा हा शेवटचा चित्रपट असल्यामुळे या सिनेमाकडे प्रत्येकजण सहानुभूतीने पाहातो आहे. अशातच त्याची मैत्रीण-प्रेयसी रिया चक्रवर्तीने चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधी काही तास इन्स्टावर पोस्ट लिहून सगळा माहौल इमोशनल केला आहे.
रियाची इन्स्टा पोस्ट सध्या खूप व्हायरल होते आहे. त्यावर तिने लिहिलेला मजकूर खूप वाचला जातोय. त्याला इंडस्ट्रीतल्या अनेक मान्यवरांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. रिया या आपल्या पोस्टमध्ये म्हणते, तू माझ्या सोबत इथे आहेस. मला माहिती आहे तू आहेस. मी तुझ्या प्रेमाला सेलिब्रेट करेन. तू माझ्या आयुष्याचा हिरो आहेस. मला माहिती आहे, तू आमच्यासोबत हे पाहशील. रियाने ही पोस्ट करताना दिल बेचारा चित्रपटातला एक फोटो पोस्ट केला आहे.
सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बरोबर 40 दिवसांनी हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. ही घटना घडल्यानंतर इतके दिवस उलटूनही अद्याप त्याच्या आत्महत्येचा तपास चालू आहे. अशातच हा चित्रपट येत असल्याने नेटकऱ्यांमध्ये सध्या कमालीची उत्सुकता आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर हिंदी इंडस्ट्रीत असलेला नेपोटिझम, आऊटसायडर्सना मिळणारी वागणूक चर्चेत आली. यातून सलमान खान, करण जोहर, आदित्य चोप्रा, महेश भट यांसारख्या मंडळींच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. सुशांत अशा मिळणाऱ्या वागणुकीमुळे त्रस्त होता, हे समोर येऊ लागल्याने सुशांतसारख्या होतकरू मुलांना पाठिंबा देण्याचा कल वाढतो आहे. म्हणून त्याचा हा चित्रपट पाहा असं आवाहन केलं गेलं आहे.
'दिल बेचारा' आज रिलीज होणार, सिनेमाच्या शेवटी सुशांतला अनोखी आदरांजली
इंडस्ट्रीतल्या अनेक कलाकारांनी दिल बेचारा प्रमोटही केला आहे. विवेक ओबेरॉय, विकी कौशल, राजकुमार राव, आयुष्मान खुराना, भूमी पेडणेकर, क्रिती सनॉन आदी अनेकांनी आपआपल्या सोशल मिडियाद्वारे या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. त्याचवेळी हा चित्रपट पाहण्याचं आवाहनही केलं आहे. त्याला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे. हा चित्रपट साडेसात वाजता ऑनलाईनवर आल्यानंतर सुशांतप्रेमींच्या त्या सिनेमावर उड्या पडतील यात शंका नाही. अर्थात त्यानंतर तो सिनेमा ओटीटीवर असणार आहेच. त्यामुळे त्यानंतर कधीही हा सिनेमा पाहता येणार आहे.
'दिल बेचारा'चा लाईव्ह रिव्ह्यू 'एबीपी माझा' फेसबुक पेजवर रात्री 10 वाजता
एबीपी माझाच्या ऑनलाईन कुटुंबासाठी या सिनेमाचा फेसबुकवर लाईव्ह रिव्हूय केला जाणार आहे. रात्री 10 वाजता हा रिव्हूय फेसबुकवरच्या माझाच्या पेजवर जाऊन पाहता येणार आहे. सुशांतसिंह राजपूत याचा हा शेवटचा सिनेमा असल्यामुळे नेटकऱ्यांमध्ये या चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता आहे. अनेकांना चित्रपटाबद्दल फार माहिती नसली तरी सुशांतची पडद्यावरची शेवटची इनिंग पाहण्यासाठी प्रत्येकजण आतुर झाल आहे. त्यांची ही उत्सुकता लक्षात घेऊन ही समीक्षा लाईव्ह केली जाईल. रात्री बरोबर 10 वाजता हा रिव्हूय लाईव्ह होईल. त्यावेळी प्रेक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरंही दिली जातील.
मुकेश छाब्रा हा कास्टिंग डिरेक्टर सुशांतचा घनिष्ट मित्र होता. त्याने हा चित्रपट बनवला असून त्याचा हा पहिलाच सिनेमा. या सिनेमाला ए.आर. रेहमानचं संगीत असून त्यात संजना संघी या अभिनेत्रीने काम केलं आहे. प्रसिद्ध हॉलिवूडपट फॉल्ट इन आवर स्टार्स या सिनेमावर हा चित्रपट बेतला आहे.
सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी वांद्र्यातील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येने एकच खळबळ उडाली होती. सिनेविश्वातच नाही तर सर्वच स्तरातून हळहळही व्यक्त करण्यात आली होती. त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. पण मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आतापर्यंत जवळपास अनेकांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. यामध्ये निर्माता दिग्दर्शक संजय लीला भन्साली, यशराज फिल्म्सचे मालक आणि निर्माते आदित्य चोप्रा यांचाही समावेश आहे.
- संबंधित बातम्या
- आयुष्यभर तुझ्यावर प्रेम करेन! सुशांतच्या आत्महत्येनंतर रिया चक्रवर्तीची भावनिक पोस्ट
- काय सांगता हुबेहुब सुशांत सिंह राजपूत?; सोशल मीडियावर 'या' तरूणाचे फोटो व्हायरल
- Dil Bechara Trailer | सुशांत सिंह राजपूतच्या 'दिल बेचारा'च्या ट्रेलरचा रेकॉर्ड; 'एवेंजर्स एंडगेम'लाही टाकलं मागे
- सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी सलमान खानची चौकशी होणार?