Rashmika Mandanna Vijay Deverakonda: वेडिंग वेन्यू ठरला, मुहूर्तही काढला; रश्मिका, विजयची लगीनघाई, 'या' दिवशी, प्रसिद्ध शहरात बांधणार लग्नगाठ
Rashmika Mandanna Vijay Deverakonda: रश्मिका आणि विजय यांनी दसऱ्याच्या एक दिवसानंतर 3 ऑक्टोबर 2025 रोजी हैदराबादमध्ये साखरपुडा उरकलेला. आता दोघे लग्नही एका खासगी सोहळ्यात करणार आहेत.

Rashmika Mandanna Vijay Deverakonda: साऊथची सुपरस्टार (South Actress) अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि सुपरस्टार अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत. अशातच आता हे जोडपं लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. रश्मिका आणि विजयनं ऑक्टोबरमध्ये कुटुंबियांच्या उपस्थितीत गुपचूप साखरपुडा उरकला होता. अशातच आता हे जोडपं 2026 मध्ये म्हणजेच, नव्या वर्षात आपली लग्नगाठ बांधणार असल्याचं बोलंल जात आहे. तसेच, रश्मिका आणि विजय यांचा वेडिंग वेन्यू आणि मुहूर्त समोर आला आहे.
रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची तारीख आणि ठिकाणाबाबत सुत्रांनी माहिती दिली आहे. हिंदुस्तान टाईम्सनं दिलेल्या माहितीनुसार, "रश्मिका आणि विजय 26 फेब्रुवारी 2026 रोजी उदयपूरमधील एका राजवाड्यात लग्न करणार आहेत. त्यांनी एक ऐतिहासिक महाल निश्चित केला आहे. साखरपुड्याप्रमाणेच, दोघेही लग्नही एका खाजगी सोहळ्यात करणार आहेत. फक्त त्यांचे नातेवाईक आणि जवळचे मित्र या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत..."
रश्मिका, विजयनं ऑक्टोबरमध्ये उरकलेला साखरपुडा
रश्मिका आणि विजय यांनी दसऱ्याच्या एक दिवसानंतर 3 ऑक्टोबर 2025 रोजी हैदराबादमध्ये साखरपुडा उरकलेला. दोघांपैकी कोणीही या बातमीला दुजोरा दिला नसला तरी, विजयच्या टीमनं हिंदुस्थान टाईम्सला याबाबत माहिती दिलेली. सांगितले. अशातच आता हे जोडपं फेब्रुवारीमध्ये लग्न करणार असल्याची माहिती मिळतेय.
रश्मिका आणि विजयच्या साखरपुड्याला फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यच उपस्थित होते. दरम्यान, 'द गर्लफ्रेंड' या मालिकेत विजय देवरकोंडानं रश्मिकाच्या हाताला सर्वांसमोर किस केलेलं. रश्मिका आणि विजय यांनी 2018 मध्ये 'गीता गोविंदम' चित्रपटात काम केलेलं. त्यानंतर ते 2019 मध्ये 'डियर कॉम्रेड'मध्ये दिसलेले. तेव्हापासून त्यांच्या नात्याबद्दलच्या अफवा पसरत होत्या. त्याचप्रमाणे चाहत्यांचा दावा आहे की, ते एकत्र व्हेकेशन एन्जॉय करतात, पण त्यांचे फोटो वेगवेगळे पोस्ट करतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























