एक्स्प्लोर

Rashmika Mandanna, Varun Dhawan : समुद्र किनारी ‘अरेबिक कुथु’वर रश्मिकासह वरुण धवनचे ठुमके, व्हिडीओ पाहिलात का?

Rashmika Mandanna, Varun Dhawan Dance : अभिनेता वरुण धवनने रश्मिका मंदनाचा बीचवर डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये दोघेही खूप क्यूट दिसत आहेत.

Rashmika Mandanna, Varun Dhawan : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि अभिनेत्री रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) यांची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. मात्र, हे दोघे कोणत्या प्रोजेक्टवर एकत्र काम करत आहेत, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. रश्मिका मंदनाने वरुण धवनसोबतचे काही फोटो पोस्ट केले होते, जे पाहिल्यानंतर चाहते दोघांची धमाल पाहून खूप खूश झाले आणि दोघांना एकत्र पाहण्याची उत्सुकता व्यक्त केली. आता अभिनेता वरुण धवनने रश्मिका मंदनाचा बीचवर डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये दोघेही खूप क्यूट दिसत आहेत.

वरुण धवनने त्याच्या इंस्टाग्रामवर नॅशनल क्रश रश्मिका मंदनासोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघे समुद्रकिनारी उभे राहून डान्स करत आहेत. वरुण धवन आणि रश्मिका मंदना साऊथ सुपरस्टार थलपथी विजयचा चित्रपट 'बीस्ट'चे गाणे अरेबी कुथुवर डान्स करत आहेत.

दोघांच्या जोडीला चाहत्यांची पसंती!

हा व्हिडीओ शेअर करत वरुण धवनने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'यो हबीबो, वाळूवर नाचतानाचे काही क्षण'. दोघांची केमिस्ट्री सोशल मीडियावर खूप पसंत केली जात आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 10 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत आणि कमेंट बॉक्समध्ये चाहते सतत हार्ट इमोजी पोस्ट करत आहेत. थलपथी विजयच्या 'बीस्ट' चित्रपटातील ‘अरबी कुथू | हलामथी हबीबो’ हे गाणे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. रश्मिका आणि वरुण व्यतिरिक्त समंथा रुथ प्रभूनेही थलपथी विजयच्या या गाण्यावर डान्स केला आहे.

रश्मिकाचं बॉलिवूड पदार्पण!

रश्मिका मंदना ही दक्षिण चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे आणि तिने हिंदी चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वीच बॉलिवूड प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. रश्मिका मंदना 'मिशन मजनू' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

या चित्रपटाशिवाय रश्मिका 'गुडबॉय' चित्रपटातही दिसणार आहे. ज्यामध्ये तिला अमिताभ बच्चन आणि नीना गुप्ता यांसारख्या स्टार्ससोबत स्क्रीन स्पेस शेअर करण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय वरुण धवनच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले, तर तो करण जोहरचा चित्रपट 'जुग-जुग जियो' आणि दिनेश विजानच्या 'भेडिया' चित्रपटात दिसणार आहे.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा
RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Mumbai Lok Sabha Elections : शिवसेना दुभंगल्यानंतरची पहिली निवडणूक, मुंबईमध्ये कुणाचा झेंडा फडकणार?Sharad Pawar Vs Ajit Pawar Special Report : Pune Car Accident Special Report : दोघांना चिरडणाऱ्या धनाढ्य बापाच्या मुलाला काही तासात जामीनCM Eknath Shinde यांच्या मुख्यमंत्रीपदाला कुणाचा विरोध होता? मुद्दा पुन्हा का चर्चेत आला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा
RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय
मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय
पावसाने राजस्थानचे टेन्शन वाढवले, अखेरच्या सामन्यात काय होणार?
पावसाने राजस्थानचे टेन्शन वाढवले, अखेरच्या सामन्यात काय होणार?
Embed widget