रस प्यायला ये म्हणलं माय, तृथीयपंथीयाचा डायलॉग व्हायरल; सचिन कुमावतच्या नव्या गाण्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा
Ras Pyayla Ye Mhanal May : सध्या सचिन कुमावत याच्या नव्या गाण्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे.

Ras Pyayla Ye Mhanal May : सोशल मीडियावर सध्या 'रस प्यायला ये म्हणलं माय' (Ras Pyayla Ye Mhanal May), हा डायलॉग तुफान व्हायरल झालाय. तृतीयपंथीय हातात ऊसाच्या रसाचा ग्लास घेऊन 'रस प्यायला ये म्हणलं माय' (Ras Pyayla Ye Mhanal May) म्हणताना दिसत आहे, सुरुवातीला हे रील तुफान व्हायरल झालं होतं. दरम्यान, हा फक्त डायलॉगचं नाही तर सचिन कुमावत (Sachin Kumavat) याच गाणं देखील आहे.
सचिन कुमावत हा खान्देशातील एक प्रसिद्ध मराठी गायक, संगीतकार आणि निर्माता आहे. त्याच्या अहिराणी गाण्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. त्याचे 'बबल्या ईकस केसावर फुगे' हे गाणे विशेषतः उल्लेखनीय आहे, ज्याला यूट्यूबवर 24 कोटींपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले होते. दरम्यान, सचिनचं 'रस प्यायला ये म्हणलं माय' हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून इन्स्टाग्राम रील्स सचिन कुमावतचं हे गाणं धुमाकूळ घालत आहे.
सचिन कुमावत यांच्या नवीन गाण्यातील "रस प्यायला ये म्हणलं माय" हा तृतीयपंथीय पात्राचा डायलॉग सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या डायलॉगमुळे गाण्याला विशेष ओळख मिळाली असून, विविध प्लॅटफॉर्मवर याचे व्हिडिओ क्लिप्स मोठ्या प्रमाणावर शेअर केल्या जात आहेत. सध्या सोशल मीडियावर या डायलॉगच्या विविध मीम्स, रील्स आणि रिअॅक्शन व्हिडिओज पाहायला मिळत आहेत. विशेषतः तरुण वर्गात या डायलॉगची लोकप्रियता वाढत आहे. काहींनी या डायलॉगला त्यांच्या वैयक्तिक अनुभवांशी जोडले असून,त्यांनी देखील या गाण्यावर रील्स बनवण्यास सुरुवात केली आहे. या डायलॉगच्या लोकप्रियतेमुळे सचिन कुमावत यांचे गाणे अधिक चर्चेत आले आहे. त्यामुळे त्यांच्या आगामी प्रकल्पांबद्दलही चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
सामाजिक विषयांना स्पर्श करणाऱ्या अशा गाण्यांमुळे कलाकारांना केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न ठेवता, समाजप्रबोधनाची भूमिका बजावण्याची संधी मिळते. एकूणच, "रस प्यायला ये म्हणलं माय" हा डायलॉग केवळ एक संवाद न राहता, समाजातील तृतीयपंथीयांच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा ठरला आहे. त्यामुळेच तो आजच्या घडीला सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. सचिन कुमावत यांची गाणी सामाजिक विषयांवर आधारित असून, त्यांनी बेरोजगारीसारख्या मुद्द्यांवरही गाणी तयार केली आहेत. त्यांनी अनेक कलाकारांना संधी दिली असून, त्यांच्या गाण्यांमध्ये अण्णा सुरवाडे, कृष्णा जोशी, बाळू वाघ, संजय सोनवणे यांसारखे कलाकार सहभागी झाले आहेत.
सचिनच्या प्रसिद्ध गाण्यांमध्ये 'रस प्यायला ये म्हणलं माय' , 'तु बन मणी लाडी' , 'कानबाई चालानी सासरले' आणि 'जेठालाल मी बबिता तू' यांचा समावेश होतो. त्यांचे गाणे Apple Music वरही उपलब्ध आहेत, जसे की 'वाडी वाडी चंदन वाडी' आणि 'आहो मामी तुमची मुलगी लय सुंदर'.@sachinkumavat या यूट्यूब चॅनल वर सचिन कुमावतच्या नवीन गाण्यांचा आनंद घेता येऊ शकतो. अहिराणी गाण्यांच्या क्षेत्रात सचिन कुमावत यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून, त्यांनी या लोकसंगीताला नव्या उंचीवर नेले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या























