Kangana Ranaut On India Pakistan War : ब्लडी कॉक्रोच! दहशतवाद्यांनी भरलेला देश, जगाच्या नकाशावरून पुसून टाकलं पाहिजे; कंगना रनौत पाकिस्तानवर संतापली
Kangana Ranaut On India Pakistan War : भारत आणि पाकिस्तानमधील युद्धादरम्यान अभिनेत्री आणि भाजप नेत्या कंगना रनौतने पाकिस्तानवर आपला राग व्यक्त केला आहे.

Kangana Ranaut On India Pakistan War : अभिनेत्री ते नेत्यापर्यंतचा प्रवास केलेली कंगना रनौत (Kangana Ranaut) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ती तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. आता पुन्हा एकदा तिने तिच्या ठाम राजकीय भूमिकेमुळे लक्ष वेधून घेतलं आहे. भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाच्या (India Pakistan Tensio) पार्श्वभूमीवर कंगनाने पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत हिने तिच्या इन्स्टाग्राम (Instagram) स्टोरीजवर पाकिस्तानला "आतंकवाद्यांनी भरलेला एक वाईट देश" असे म्हटले असून, "त्याला जगाच्या नकाशावरून कायमचं नष्ट केलं पाहिजे" असे देखील म्हटले आहे.
भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर'नंतर (Operation Sindoor) घाबरलेल्या पाकिस्तानने (Pakistan) 8 मे रोजी भारताच्या अनेक भागांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे हल्ला करण्याचा नापाक प्रयत्न केला, मात्र भारतीय सशस्त्र दलांनी हे सर्व प्रयत्न हाणून पाडले. हे ड्रोन हल्ले जम्मू आणि काश्मीरमधील जम्मू, सांबा, सतवारी आणि उधमपूर, पंजाबमधील अमृतसर आणि जालंधर तसेच राजस्थानमधील बीकानेर आणि जैसलमेर या भागांमध्ये करण्यात आले होते. पाकिस्तानच्या या भ्याड कृत्यांनंतर कंगना रणौत हिने तिच्या इन्स्टाग्रामवर WION या वृत्तवाहिनीच्या एका रिपोर्टला रीपोस्ट केलं आहे.
ब्लडी कॉक्रोच! दहशतवाद्यांनी भरलेला देश
या रिपोर्टमध्ये 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानच्या भूमिकेबद्दल संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये पाकिस्तानकडे चौकशी करण्यात आली होती. या रिपोर्टसोबत कंगनाने पाकिस्तानविरोधात तीव्र प्रतिक्रिया देत लिहिलं आहे – “ब्लडी कॉक्रोच... भीषण, दहशतवाद्यांनी भरलेला वाईट देश... जगाच्या नकाशावरून पुसून टाकलं पाहिजे,” असे म्हणत तिने आपला संताप व्यक्त केलाय.

कंगनाकडून S-400 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीचं कौतुक
यापूर्वी कंगनाने एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये भारतीय S-400 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीचं कौतुक करण्यात आलं होतं. एका इतर पोस्टमध्ये तिने जम्मूच्या नागरिकांना धोका असूनही खंबीर राहण्याचं आवाहन केलं होतं. तिने त्या पोस्टमध्ये लिहिलं होतं, जम्मू लक्ष्यावर! भारतीय हवाई संरक्षण प्रणालीने जम्मूमध्ये पाकिस्तानी ड्रोन नष्ट केला. खंबीर राहा जम्मू!, असे तिने म्हटले होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या























