(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ranveer Singh : 'भाई क्या कर रहा है?'; रणवीर सिंहच्या न्यूड फोटोशूटवर नेटकऱ्यांनी तयार केले भन्नाट मीम्स
रणवीरच्या (Ranveer Singh) न्यूड फोटोला कमेंट करुन अनेकांनी रणवीरला ट्रोल केलं आहे. काही नेटकऱ्यांनी तर रणवीरच्या या न्यूड फोटोवर भन्नाट मीम्स तयार केले आहेत.
Ranveer Singh : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) चित्रपटांमधील अभिनयाबरोबरच त्याच्या वेगवेगळ्या अतरंगी लूकमुळे देखील चर्चेत असतो. त्याच्या अतरंगी लूकला त्याच्या चाहत्यांची पसंती मिळते तर काही नेटकरी त्याला ट्रोल देखील करतात. आत्ता चक्क रणवीरनं न्यूड फोटोशूट केलं आहे. या न्यूड फोटोशूटमुळे रणवीर सिंह चर्चेत आहे. रणवीरने Paper magazine website च्या मॅगझीनच्या कव्हरसाठी न्यूड फोटोशूट केलेय. या रणवीरच्या न्यूड फोटोला कमेंट करुन अनेकांनी रणवीरला ट्रोल केलं आहे. काही नेटकऱ्यांनी तर रणवीरच्या या न्यूड फोटोवर भन्नाट मीम्स तयार केले आहेत. पाहा रणवीरच्या या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी तयार केलेले मजेशीर मीम्स-
एका युझरनं रणवीरच्या फोटोशूटवर एक मीम तयार केलेलं आहे. यामध्ये 'भाई क्या कर रहा है?' असं लिहिलेलं दिसत आहे. 'सध्या लोक रणवीरला असं विचारत आहेत', असं कॅप्शन या मीमला देण्यात आलं आहे.
People asking #RanveerSingh right now
— Priyanka Banubakode ↗️ (@PriyaBanubakode) July 21, 2022
😂😂😂 pic.twitter.com/xs0NJyfy6T
एक युझरनं रणवीरच्या न्यूड फोटोशूटमधील एक फोटो एडिट करुन मजेशीर मीम तयार केलं आहे. या मीममध्ये रणवीर हा एका जाळीवर चढताना दिसत आहे.
😂 Sorry, I'm not at all here to troll@RanveerOfficial
— Meena Choudhary (@MeenaC48) July 21, 2022
I just found this picture genuinely funny🤣 #ranveerified #ranveersingh pic.twitter.com/xtZh2alnIH
'रणवीरच्या फोटोवर लोकांची रिअॅक्शन' असं कॅप्शन लिहून एका युझरनं मीम शेअर केलेलं आहे. या मीममध्ये 'अरे, कहना क्या चाहते हो?' असं लिहिलं दिसत आहे.
People reacting on #RanveerSingh photos: pic.twitter.com/NslQnzEUao
— Priyanka Banubakode ↗️ (@PriyaBanubakode) July 21, 2022
'या भयानक गोष्टीवर मी फक्त हेच सांगू शकतो' असं कॅप्शन देऊन एका नेटकऱ्यानं मीम शेअर केलं आहे.
#RanveerSingh no words after this disaster only I can say !!!! pic.twitter.com/EpM8x2FMRI
— movie buffer (@moviebuffer999) July 21, 2022
रणवीरच्या आधी अनेक सेलिब्रिटींनी न्यूड फोटोशूट केलं आहे. मिलिंद सोमण, मधु सप्रे, आमिर खान, शर्लिन चोप्रा, पूजा बेदी,सपना भवनानी या सेलिब्रिटींनी न्यूड फोटोशूट केले होते.
हेही वाचा:
Ranveer Singh Bold Photos : फोटोशूटसाठी रणवीर सिंह झाला न्यूड, Bold Photos चा इंटरनेटवर धुमाकूळ