एक्स्प्लोर

Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम

Pune Junnar Crime News : आई-वडील ज्यावेळेला दुपारी घरी आले त्यावेळेला घरात त्यांची ती चिमुरडी दिसली नाही, त्यांनी नंतर इकडे तिकडे शोधाशोध केली, पण ती सापडली नाही.

पुणे : पुण्यातल्या जुन्नर तालुक्यामधील पिंपळवंडी गावामध्ये नऊ वर्षीय चिमुरडीवरती अत्याचार करण्यात आला आणि या नराधामाने त्यानंतर तिची हत्या केली. नराधमाला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. मात्र पिंपळवंडीचे ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत. त्यांनी काही काळासाठी पुणे नाशिक महामार्ग रोखून धरला होता, आता वाहतूक सुरळीत झाली आहे, परंतु त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. ज्यांच्या शेतालगत ही सगळी घटना घडली त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. एबीपी माझाशी बोलताना ते म्हणाले, काल मंगळवार दिनांक 18 रोजी ही दुर्दैवी घटना या पिंपळवंडी जुन्नर तालुक्यामध्ये घडलेली होती आणि जी पीडित मुलगी (Pune Junnar Crime News) आहे तिचे आई-वडील रोजच्याप्रमाणे शेतावर मोल मजुरी करण्यासाठी कामावर गेले होते. त्याच्यानंतर जी पीडित मुलगी आहे, तिला कांजण्या झालेल्या होत्या आणि म्हणून त्या मुलीला त्यांनी शाळेत पाठवलेलं नव्हतं आणि शाळेत न पाठवल्यामुळे ती एकटीच घरी होती. एकटी ती घरी होती. आई-वडील ज्यावेळेला दुपारी घरी आले त्यावेळेला घरात त्यांची ती चिमुरडी दिसली नाही, त्यांनी नंतर इकडे तिकडे शोधाशोध केली, पण ती सापडली नाही.(Pune Junnar Crime News)

Pune Junnar Crime News : ज्या मैत्रिणी होत्या त्यांच्याकडे चौकशी केली

शेजारी जी घर आहेत त्या घरांमध्ये जाऊन तिच्या ज्या मैत्रिणी होत्या त्यांच्याकडे चौकशी केली. त्यांनी सांगितलं आम्हाला ती भेटलेली नाही. त्याच्यानंतर त्या चिमुरडीच्या आईवडीलांनी ग्रामस्थांना कल्पना दिली, फोन करून एक कैलास बर्डे म्हणून त्यांच्याकडे तो कामाला असतो, त्याला त्यांनी फोन केला म्हटले माझी मुलगी घरी होती परंतु आता दिसत नाहीये, म्हणून त्यांनी ग्रामस्थांना फोन करून सांगितलं, नंतर तरी आम्ही म्हटलं इथं बिबट्या मोठ्या प्रमाणात येत असतात, त्याच्यामुळे जवळच ओढा आहे. पुढे जर ओढ्याजवळ गेली असेल किंवा तशा प्रकारे जर काही घटना घडलेली असेल तर म्हणून आम्ही सगळ्या ग्रामस्थांनी तिथे उसाच शेत, टोमॅटोचे काही जुने प्लॉट, इतर काही बागायताचे क्षेत्र, ओढा अशा ठिकाणी ग्रामस्थांनी आणि तिच्या आई वडिलांनी त्यांच्या नातेवाईकांनी शोधाशोध चालू केली, परंतु त्याच्यात काही यश आलं नाही, हे साधारणत दीड नंतर शोधाशोध करायला चालू झालं आणि साधारणत ही घटना दोन अडीचला त्यांनी लोकांना सांगायला सुरुवात केली, त्याच्यानंतर साधारण साडेतीन पर्यंत त्यांनी तिथे शोधाशोध चालू केली, नंतर मग लोक बोलले या घटनेत बिबट्याचा संशय येत नाही म्हणून आपण पोलीस स्टेशनला तक्रार देऊया. मग त्यांना पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला लावली.Pune Junnar Crime News

Pune Junnar Crime News : जमलेल्या त्या सर्व लोकांमध्ये बरोबर बसून होता

पोलीस डिपार्टमेंट एवढं तत्पर आहे की त्यांनी लगेच 16-17 कर्मचारी पिंपळवंडीला पाठवले आणि ते म्हणाले सीसीटीव्ही कॅमेरे चेक करू आणि दोन माणसं त्यांची डिपार्टमेंटची सीसीटीव्ही कॅमेरा चेक करत होती. वेगवेगळ्या ठिकाणी आणि बाकीची जी लोक होती ती पुन्हा ओढे, नाले, उसाची शेत, सीसीटीव्ही चेक करण्याची वेळ साधारण चार साडेचारच्या दरम्यान असेल, त्याच्यानंतर इकडे तिकडे चेक केलं, परंतु साडे पाच पावणे सहाच्या दरम्यान सीसीटीव्ही चेक करायचं नियोजन त्यांनी केलं, तर गावात एक सीसीटीव्ही एक मेंबरच्या घरी आहे, तिथे कॅमेरे बसवलेले तिथे चेक करायला लागले, आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे, जमलेल्या त्या सर्व लोकांमध्ये नराधम आरोपी बरोबर बसून होता, जेव्हा शोधाशोध सुरू होती, तेव्हा हा नराधम सर्वांसोबत स्टूलवर बसलेला होता. कुठल्याही प्रकारचा गुन्हा केलेल्याचा त्याच्या चेहऱ्यावर काहीही जाणवत नव्हतं, असंही त्यांनी पुढे सांगितलं.

Pune Junnar Crime News : साडे पाच पावणे सहा वाजेपर्यंत तर तोपर्यंत एक सायकल आली 

सीसीटीव्ही चेक करत असताना तो ज्यावेळेला तिथं बसलेला होता. त्यावेळेला तो सायकलवर कॅमेऱ्यातून जाताना दिसला. त्यानी आठवण करून दिली सगळ्यांना का हे बघा मी सायकलवर चाललोय, त्यालाच परमेश्वराने बुद्धी दिली असावी तूच तुझं कबूल कर आता त्याच्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे असं वळून पाहिलं, तेव्हा पहिला क्लू मिळाला. नंतर माझ्या घरी ज्यावेळेला कॅमेरा चेक करायला गेलो तर असा एक उतार आहे, आम्ही चेक केलं साधारणत दीड वाजल्यापासून कॅमेरा स्टार्ट केला, तर तोपर्यंत जोपर्यंत आम्ही चेक करत होतो, साडे पाच पावणे सहा वाजेपर्यंत तर तोपर्यंत एक सायकल आली आणि अशी पटकन लेफ्ट साईडला वळालेली दिसली, आम्हाला पण कॅमेरेच्या जास्त दूर असल्यामुळे व्यवस्थित दिसला नाही. पण साहेबांच्या निरीक्षणातून तो सुटला नाही साहेबांनी त्याला फोर व्हीलर मध्ये टाकला. दोन अधिकारी कर्मचारी त्याच्याबरोबर आणि ते त्याला फिरवत होते. तो वेगवेगळी माहिती सांगत होता. मळ्यात गेलो असं तसं, तेव्हा संशय आला, तो शेतात गेल्याचं सांगत होता, पण तो परत येताना आपल्याला कॅमेरात दिसला पाहिजे. पण कॅमेरामध्ये तो मुळात जाताना दिसला नाही तर यायचा सावलच आला नाही, तिथे पोलिसांचा संशय जास्त बळावला त्याच्यानंतर त्याला ताब्यात घेतलं. पोलीसांनी खाक्या दाखवला, पावणे आठ वाजले असतील त्यावेळेला एक फोन आला म्हटले त्यांनी कबूल केलेले, तुम्ही आहे तिथून इकडे या निघून, तर आम्ही सगळे तिथे गेलो, त्या मग ते स्पॉट दाखव, त्यांनी तो स्पॉट दाखवला, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिशाच्या वडिलांचा जबाब सीबीआयकडे नोंद; दोन दिवसांतच FIR दाखल होणार, आरोपींना अटक करण्याची मागणी
दिशाच्या वडिलांचा जबाब सीबीआयकडे नोंद; दोन दिवसांतच FIR दाखल होणार, आरोपींना अटक करण्याची मागणी
टँकरच्या धडकेत तीन मित्रांचा मृत्यू; बीड महामार्गावरील दुर्घटना, रस्ते कामावरुन नागरिकांचा संताप
टँकरच्या धडकेत तीन मित्रांचा मृत्यू; बीड महामार्गावरील दुर्घटना, रस्ते कामावरुन नागरिकांचा संताप
पैसे वसूल तरीही कारवाई सुरुच राहणार! ईडी पुन्हा मल्ल्याभोवती फास आवळणार! नेमकं प्रकरण काय?  
पैसे वसूल तरीही कारवाई सुरुच राहणार! ईडी पुन्हा मल्ल्याभोवती फास आवळणार! नेमकं प्रकरण काय?  
Rohit Gavit : मोठी बातमी, शिवसेना आमदार राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावित याला पोलिसांकडून अटक, पालघरमधील रुग्णालयातील मारहाण प्रकरण भोवलं
राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावित याला पोलिसांकडून अटक, पालघरमधील रुग्णालयातील मारहाण प्रकरण भोवलं
Advertisement

व्हिडीओ

Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका
Nitin Gadkari On Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग १६-१७ वर्षे रखडल्याबद्दल लाज वाटते, उद्घाटनाला जाणार नाही
Eknath Shinde Visit London : साहेबांच्या देशात... साहेबाच्या भाषेत... | Special Report ABP Majha
Dahi Handi Obscene Dance FIR : दहीहंडीत नृत्यांगणा, टीकेवरुन गुन्हा | Spcial Report ABP Majha
Devendra Fadnavis: डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा, हातात वीणा; देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती, पाहा VIDEO
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
होर्मुझनंतर आता आणखी एक तेलमार्ग संकटात; हौथी बंडखोरांनी अल मंदेब ताब्यात घेतला, आशिया आणि युरोप दरम्यान महत्त्वाचा सागरी मार्ग, कोणाची जहाजे सोडणार अन् कोणता नाही हे सुद्धा जाहीर केलं!
होर्मुझनंतर आता आणखी एक तेलमार्ग संकटात; हौथी बंडखोरांनी अल मंदेब ताब्यात घेतला, आशिया आणि युरोप दरम्यान महत्त्वाचा सागरी मार्ग, कोणाची जहाजे सोडणार अन् कोणता नाही हे सुद्धा जाहीर केलं!
Video: इस्रायलने लेबनॉनमधील 2 किमी लांबीचा बोगदा तब्बल 1100 टन स्फोटकांनी उडवला; स्फोटानंतर 4.1 तीव्रतेचा भूकंपासारखा झटका
Video: इस्रायलने लेबनॉनमधील 2 किमी लांबीचा बोगदा तब्बल 1100 टन स्फोटकांनी उडवला; स्फोटानंतर 4.1 तीव्रतेचा भूकंपासारखा झटका
OneTag: मोबाईल सिमप्रमाणे फास्टॅग सुद्धा पोर्ट करता येणार, स्टिकर न बदलता बँक बदलण्यासाठी 'वनटॅग' सेवा
मोबाईल सिमप्रमाणे फास्टॅग सुद्धा पोर्ट करता येणार, स्टिकर न बदलता बँक बदलण्यासाठी 'वनटॅग' सेवा
मुंबईकर गणपतीसाठी गावी निघाला, ट्रॅफिकमध्ये अडकला; पश्चिम द्रुतगती महामार्गावर 40 मिनिटांच्या प्रवासासाठी 2 तास
मुंबईकर गणपतीसाठी गावी निघाला, ट्रॅफिकमध्ये अडकला; पश्चिम द्रुतगती महामार्गावर 40 मिनिटांच्या प्रवासासाठी 2 तास
दिशाच्या वडिलांचा जबाब सीबीआयकडे नोंद; दोन दिवसांतच FIR दाखल होणार, आरोपींना अटक करण्याची मागणी
दिशाच्या वडिलांचा जबाब सीबीआयकडे नोंद; दोन दिवसांतच FIR दाखल होणार, आरोपींना अटक करण्याची मागणी
मोदी म्हणाले, जगाची निम्मी लोकसंख्या BRICS मध्ये; तिकडं रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन युरोपवर बरसले, म्हणाले, 'जी7 ला 'ग्रुप ऑफ सेव्हन' का म्हटलं जातं कळत नाही..'
मोदी म्हणाले, जगाची निम्मी लोकसंख्या BRICS मध्ये; तिकडं रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन युरोपवर बरसले, म्हणाले, 'जी7 ला 'ग्रुप ऑफ सेव्हन' का म्हटलं जातं कळत नाही..'
Video: B.Sc पास बेरोजगार आरोपीनं SBI बँकेत कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात चटणी फेकत ₹4.53 लाख लूटले, पोलिसांनी तब्बल 1 किमी पाठलाग करत पकडलं, नागुपरातील थरार

Embed widget