Viral Video : "राॅकी और रानी की प्रेककहानी" चित्रटाच्या स्क्रिनिंग दरम्यान रणवीर-आलियाने दिले प्रेक्षकांना सरप्राईज
"राॅकी और रानी की प्रेककहानी" चित्रटाच्या स्क्रिनिंग दरम्यान रणवीर-आलियाने प्रेक्षकांना अचानक तिथे जाऊन मोठे सरप्राईज दिले आहे आणि हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
Ranveer Singh And Alia Bhatt Surprise Fans : आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट सध्या थिएटरमध्ये आहे. त्याचा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई करत आहे. रणवीर - आलियाची जोडी प्रेक्षकांना चांगलीच पसंतीस पडत आहे. सोशल मिडीयावर या चित्रपटाची जोरदर चर्चा सुरू आहे. चित्रपटाचे प्रमोशन देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
अशातच चित्रपटाच्या प्रमोशनकरता रणवीर - आलिया आणि करण जोहर मुंबईतील एका थिएटरमध्ये गेले होते. अचानक तिथे जाऊन त्यांनी चाहत्यांना सरप्राईज दिले.आता या तिघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये आलिया आणि रणवीर स्वत: तिथे आल्याचे प्रेक्षकांना समजताच सर्वजण आपापल्या जागेवरून उठताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. लोकांनी त्या दोघांसोबत फोटो काढले. तसेच या दरम्यान आलियाने प्रेक्षकांना प्रश्न विचारला की, कसा आहे चित्रपट? त्यावेळी प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. रणवीर - आलियाने व्हिडीओ सोशल मिडीयावर हा व्हिडीओ शेअर करत "दिलेल्या एवढ्या प्रेमाकरता खूप खूप प्रेम" असे लिहिले आहे. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून अनेक लोकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. नेटकऱ्यांनी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाचे रिव्ह्यू सोशल मीडियावर शेअर करायला सुरुवात केली आहे. रणवीर सिंह आणि आलिया भट्टा यांचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट काही नेटकऱ्यांना आवडला आहे .नेटकऱ्यांनी रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटामधील रणवीर आणि आलियाच्या केमिस्ट्रीचे कौतुक केले आहे.
View this post on Instagram
'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मधून करण जोहरने सात वर्षांनी दिग्दर्शनात पुनरागमन केले आहे. या चित्रपटाचं कथानक इशिता मोईत्रा, शशांक खेतान आणि सुमित रॉय यांनी लिहिले आहे. धर्मा प्रॉडक्शन आणि वायकॉम18 स्टुडिओज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट परस्परविरोधी व्यक्तिमत्त्व असलेल्या जोडप्यावर आधारित आहे जे प्रेमात पडतात आणि लग्न करण्यापूर्वी तीन महिने एकमेकांच्या कुटुंबासोबत राहण्याचा निर्णय घेतात.
या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांच्यासोबतच जया बच्चन, धर्मेंद्र, क्षिती जोग, शबाना आझमी या कलाकारांनी महत्वाची भूमिका साकारली आहे.या चित्रपटाचं कथानक इशिता मोईत्रा, शशांक खेतान आणि सुमित रॉय यांनी लिहिले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या