एक्स्प्लोर
रानू मंडलच्या मेकओव्हरचे फोटो व्हायरल; नेटकऱ्यांनी केले भन्नाट मीम्स
सोशल मीडियामुळे काही लोक अगदी काही मिनिटांमध्ये सेलिब्रिटी झाले आहेत. त्यामध्ये डान्सिंग अंकल, प्रिया वॉरिअर यांसारखी नाव आपल्याला माहितच आहेत. पण काही दिवसांपूर्वी रेल्वे स्टेशनवर गाणाऱ्या रानू मंडलचाही व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता.
मुंबई : सोशल मीडियामुळे काही लोक अगदी काही मिनिटांमध्ये सेलिब्रिटी झाले आहेत. त्यामध्ये डान्सिंग अंकल, प्रिया वॉरिअर यांसारखी नाव आपल्याला माहितच आहेत. पण काही दिवसांपूर्वी रेल्वे स्टेशनवर गाणाऱ्या रानू मंडलचाही व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. एवढच नाहीतर स्टेशनवर गाणारी रानू मंडल थेट हिमेश रेशमियाच्या स्टुडिओमध्ये पोहोचली आणि एक नाहीतर चक्क तीन गाणी रेकॉर्ड केली.
एका रात्रीत इंटरनेट सेन्सेशन बनलेली रानू मंडल सध्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. काही दिवसांपूर्वी एका फॅनवर चिडल्यामुळे रानू मंडलवर नेटकऱ्यांनी टिकेची अगदी तोफच डागली होती. पण आता तिच्या ट्रोल होण्यामागील कारण म्हणजे, तिने केलेला मेकअप. यावेळी सोशल मीडियावर रानू मंडलचे काही फोटो सतत व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये रानू फार बदललेली दिसत आहे.
व्हायरल होणाऱ्या या फोटोमध्ये रानू मंडल लेहंग्यामध्ये दिसत असून तिने मेकअप केला आहे. रानूचा हा नवा अवतार पाहून नेटकऱ्यांनी तिला 'द नन', 'जोकर' आणि 'गेम ऑफ थ्रोन्स' यांसारखी अनेक नावं ठेवत आहेत. एका यूजरने कमेंटमध्ये असं लिहिलं आहे की, 'जर होळीच्या दिवशी कोणी कधीच न जाणारा सोनेरी रंग माझ्या चेहऱ्यावर लावला तर' , आणखी एका यूजरने लिहिलं आहे की, 'रानू द लेडी जोकर'.
दरम्यान, रानू मंडलला पश्चिम बंगालमधील रानाघाट रेल्वे स्टेशनवर लता मंगेशकरांचं प्रसिद्ध गाणं 'एक प्यार का नगमा है' हे गाणं गायल्यामुळे प्रसिद्धी मिळाली होती. यानंतर बॉलिवूडचा गायक-संगीतकार हिमेश रेशमियाने आपला चित्रपट 'हैप्पी हार्डी ओर हीर'साठी रानूच्या आवाजात गाणीही रेकॉर्ड करून घेतली आहेत.
इंटरनेट सेन्सेशन रानू मंडल मागील काही दिवसांपासून एखाद्या कारणामुळे ट्रोलिंगची शिकार झाली आहे. मागील आठवड्यात आपल्या फॅनसोबत केलेल्या गैरव्यवहाराप्रकरणी रानू चर्चेत होतीच. या फॅनने रानूसोबत एक सेल्फी घेण्यासाठी तिच्या पाठीला स्पर्श केला होता. त्यावरून रानू चिडली होती. आता रानू आपल्या मेकअपमुळे चर्चेत आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीड
क्रीडा
क्रीडा
Advertisement