Swatantra Veer Savarkar : स्वातंत्रवीर सावरकरांच्या भूमिकेत दिसणार रणदीप हुडा! महेश मांजरेकर करणार दिग्दर्शन
'स्वातंत्रवीर सावरकर' (Swatantra Veer Savarkar) या चित्रपटामध्ये रणदीप हुडा (Randeep Hooda) हा प्रमुख भूमिका साकारणार आहे.
Swatantra Veer Savarkar : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) त्यांच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतात. त्यांचा 'स्वातंत्रवीर सावरकर' (Swatantra Veer Savarkar) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणदीप हुडा (Randeep Hooda) साकारणार आहे.
'स्वातंत्रवीर सावरकर' हा चित्रपट जून 2022 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे कथानक विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग हे लंडन, महाराष्ट्र, अंदमान आणि निकोबार येथे झालं आहे.
रणदीप हुडानं या चित्रपटामधील भूमिकेबद्दल एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, 'असे अनेक क्रांतीकारी आहेत ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल बऱ्याच चर्चा होत असतात. त्यांच्याबद्दल लोकांना काही गैरसमज आहेत. त्यामुळे त्यांची गोष्ट ही प्रेक्षकांच्या समोर मांडणे गरजेचे आहे. ' रणदीपनं या चित्रपटाबद्दल एक ट्वीट देखील शेअर केलं आहे. या ट्वीटला त्यानं कॅप्शन दिलं, 'काही गोष्टी या सांगितल्या जातात तर काही जगल्या जातात. '
Kuch kahaniyaan batayi jaati hai aur kuch jee jaati hain!
— Randeep Hooda (@RandeepHooda) March 23, 2022
Grateful, excited and honoured to be part of #SwatantraVeerSavarkar's biopic ✨@manjrekarmahesh @anandpandit63 @thisissandeeps @apmpictures @directorsamkhan @pandya_jay #RoopaPandit #LegendStudios pic.twitter.com/UWnkLjYULG
रणदीप हुडाची ही दुसरी बायोपिक असणार आहे. याआधी त्यानं सरबजीत या बायोपिकमध्ये प्रमुख भूमिका साकारली होती. 'स्वातंत्रवीर सावरकर' या चित्रपटाची निर्मीती आनंद पंडित यांनी केली असून दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं आहे.
हेही वाचा :
- 'द कश्मीर फाइल्समध्ये अनेक गोष्टी असत्य, पण..'. संजय राऊत थेटच बोलले
- The Kashmir Files : ‘द कश्मीर फाइल्स’च्या स्क्रीनिंगवेळी कोटात कलम 144, विवेक अग्निहोत्रींनी व्यक्त केला संताप!
- The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स' ला गर्दी कोणाची? भाजपची की सामान्य प्रेक्षकांची?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha