Alia-Ranbir Welcome Baby Girl: आलिया आणि रणबीरला कन्यारत्न; सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव
रणबीर (Ranbir Kapoor) आणि आलिया (Alia Bhatt) हे आई-बाबा झाले आहेत. आलिया आणि रणबीरला कन्यारत्न झालं आहे.
Alia Bhatt Ranbir Kapoor: अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. रणबीर आणि आलिया हे आई-बाबा झाले आहेत. आलिया आणि रणबीरला कन्यारत्न झालं आहे. आलियानं सर एच एन रिलायन्स रुग्णालयात ( Sir H. N. Reliance Foundation Hospital ) बाळाला जन्म दिला. आलियाला आज (5 नोव्हेंबर) सकाळी रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलं होतं.
आलिया रणबीरची लव्हस्टोरी
आलिया आणि रणबीरनं 14 एप्रिल 2022 रोजी लग्नगाठ बांधली. आलिया आणि रणबीरनं लग्नाआधी एकमेकांना पाच वर्ष डेट केले. ‘ब्रह्मास्त्र’ च्या सेटवर आलिया आणि रणबीरची पहिली भेट झाली. आलियानं काही महिन्यांपूर्वी एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमध्ये आलिया आणि रणबीर दिसत आहेत. हा फोटो शेअर करुन आलियानं त्याला, 'आमचं बाळ लवकरच येत आहे', असं कॅप्शन दिलं. आता आलिया आणि रणबीर यांना एका चिमुकल्या मुलीचे आई-बाबा झाले आहेत. सोशल मीडियावर आलिया आणि रणबीरचे चाहते त्यांना शुभेच्छा देत आहेत.
आलिया घेणार ब्रेक
बाळाच्या जन्मानंतर आलिया भट्ट आता एका वर्षाचा ब्रेक घेणार आहे. आलिया भट्टने मॅटरनिटी लीव्हवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. बाळासोबत जास्तीत जास्त वेळ घालवता यावा यासाठी आलियाने हा निर्णय घेतला आहे. ब्रेकवर जाण्यासाठी आलियाने आगामी सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं आहे.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी आलिया आणि रणबीरचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटातील आलिया आणि रणबीरच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आलिया गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बेबी बंप फ्लॉन्स करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत होती. आता आलिया आणि रणबीरला कन्यारत्न झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक जण त्यांना शुभेच्छा देत आहेत.
आता आलिया आणि रणवीर सिंहचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूडमध्ये झळकल्यानंतर आलिया आता हॉलिवूडमध्ये पदार्पण करायला सज्ज आहे. तिचा 'हार्ट ऑफ स्टोन' हा हॉलिवूड सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: