एक्स्प्लोर

Rajinikanth On Dhurandhar 2: 'धुरंधर 2'वर फिदा झाला इंडस्ट्रीचा दिग्गज, आदित्य धरला म्हणाला, 'बॉक्स ऑफिसचा बाप'; सिनेमावर स्तुतिसुमनं उधळताना म्हणाला...

Rajinikanth On Dhurandhar 2: सिनेसृष्टीचे थलायवा रजनिकांत यांनीही आता 'धुरंधर 2'वर स्तुतिसुमनं उधळलीत. त्यासोबतच हा सिनेमा 'मस्ट वॉच' असल्याचंही सांगितलं.  याशिवाय त्यांनी प्रत्येक भारतीयानं हा सिनेमा पाहावा अशी शिफारसही केलीय.

Rajinikanth On Dhurandhar 2: आदित्य धर (Aditya Dhar) दिग्दर्शित 'धुरंधर 2' (Dhurandhar 2) सिनेमा गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) धुमाकूळ घालतोय. या सिनेमानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अल्लू अर्जुन (Allu Arjun), महेश बाबू (Mahesh Babu), अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि विजय देवराकोंडा (Vijay Deverakonda) यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनीही सोशल मीडियावर या सिनेमाचं उघडपणे कौतुक केलं आहे. अशातच आता सिनेसृष्टीचे थलायवा रजनिकांत (Rajinikanth) यांनीही आता 'धुरंधर 2'वर स्तुतिसुमनं उधळली आहेत. त्यासोबतच हा सिनेमा 'मस्ट वॉच' असल्याचंही सांगितलं.  याशिवाय त्यांनी प्रत्येक भारतीयानं हा सिनेमा पाहावा अशी शिफारसही केली आहे. 

रजनिकांत यांनी केला 'धुरंधर 2'चा रिव्यू (Rajinikanth Reviews Dhurandhar : The Revenge)

23 मार्च रोजी, रजनीकांत यांनी त्यांच्या ट्विटरवर लिहिलंय की, "काय जबरदस्त फिल्म आहे... #Dhurandhar2!!! आदित्य धर बॉक्स ऑफिसचा बाप!!! रणवीर आणि पूरी कास्ट आणि क्रू ला खूप खूप शुभेच्छा... प्रत्येक भारतीयाने नक्कीच पाहण्यासारखा सिनेमा... जय हिंद..."

रजनीकांत यांच्या ट्वीटनंतर आता सिनेमाबद्दलती चर्चा आणि उत्सुकता पुन्हा एकदा शिगेला पोहोचल्याचं दिसून येतंय. यावर प्रतिक्रिया देताना आदित्य धर यांनी लिहिलंय की, या रिव्यूनंतर, सिनेमाबद्दलची चर्चा आणि उत्सुकता पुन्हा एकदा शिगेला पोहोचल्याचं दिसून येतंय. यावर प्रतिक्रिया देताना आदित्य धरनं लिहिलंय की, "सर, आम्ही सर्वजण मनोरंजनाचं मोजमाप केवळ एकाच निकषावर करत मोठे झालो आहोत, आणि तो निकष म्हणजे तुम्हीच... अनेक दशकं आम्हाला शिट्ट्या वाजवायला, हसायला, रडायला आणि जीवनातील भव्यतेचा अनुभव घ्यायला लावल्यानंतर, आजही त्याच शैलीनं आणि कौशल्यानं हे सर्व करणं, ही खरोखरच एक जादू आहे. म्हणूनच, जेव्हा तुम्ही 'धुरंधर 2' ला 'मस्ट वॉच' सिनेमा म्हणता, तेव्हा तो माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा 'सुपरस्टार' क्षण असल्याचं मला वाटतं. ज्या व्यक्तीनं आम्हाला सर्वांना मोठी स्वप्न पाहायला शिकवलं, त्याच व्यक्तीचा हा आशीर्वाद असल्याचं मला जाणवतं. सर, मी तुमचा किती ऋणी आहे, हे मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. या गोष्टीनं माझ्या हृदयाला खरोखरंच स्पर्श केलाय... जय हिंद..."


Rajinikanth On Dhurandhar 2: 'धुरंधर 2'वर फिदा झाला इंडस्ट्रीचा दिग्गज, आदित्य धरला म्हणाला, 'बॉक्स ऑफिसचा बाप'; सिनेमावर स्तुतिसुमनं उधळताना म्हणाला...

'धुरंधर 2'च्या यशावर काय म्हणाला, आदित्य धर? (Aditya Dhar On Dhurandhar 2 Success)

19 मार्च रोजी, सिने निर्मात्यांनी मुंबईत या सिनेमासाठी एक विशेष स्क्रीनिंग आयोजित केली होती. ज्याला सिनेमातील कलाकार आणि क्रू उपस्थित होती. प्रदर्शनानंतर, आदित्यनं सर्वांचे आभार मानले आणि सिनेमाच्या यशाविषयी आपले विचार मांडले. आदित्य म्हणाला की, "ज्यांनी ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, त्या सर्वांचे मी आभार मानतो, ज्योति देशपांडे यांच्यापासून ते, अर्थातच, माझे विभागप्रमुख (HODs), सहकारी कलाकार, अभिनेते आणि ज्या प्रत्येक व्यक्तीनं या सिनेमासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलंय, त्या प्रत्येकाचे..." अभिनेता पुढे बोलताना म्हणाला की, "आम्हाला मिळणाऱ्या सर्व प्रतिक्रिया पाहून, आणि अगदी त्या 'मीम्स' पाहूनही! मला खूप आनंद झाला आहे; पण ज्यांनी इथे येऊन आम्हाला पाठिंबा दिला आणि या प्रवासाचा एक भाग बनले, त्या सर्वांप्रती मला मनापासून कृतज्ञता व्यक्त करायचीय. तुमच्याशिवाय यातील काहीच शक्य झालं नसतं. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार..."

'धुरंधर 2'ची 5 दिवसांत 750 कोटींहून अधिक कमाई 

'धुरंधर : द रिवेंज'नं जगभरात एकूण 751.97 कोटींची जबरदस्त कमाई केली आहे, ज्यामध्ये 541.97 कोटी भारतातून आणि 210 कोटींची कमाई विदेशातून केली आहे. फिल्मचं भारतातलं नेट कलेक्शन 457.12 कोटी आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Dhurandhar 2 PM Narendra Modi Cameo: 'धुरंधर 2'मधून सर्वात मोठं सरप्राइज; सिनेमात पंतप्रधान मोदींचा कॅमिओ, सोशल मीडियावर 'तो' सीन व्हायरल

महत्त्वाच्या बातम्या

Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
ZEE5 Marathi: मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Embed widget