4 बॉयफ्रेंड ठेव, दारुही पाजली; बॉलिवूडच्या सुपरस्टार अभिनेत्याचे लेकीला अजब सल्ले, स्वत:च केला होता खुलासा
Rajesh Khannas Lessons for Twinkle: ट्विंकल खन्नाने वडील राजेश खन्नांचे अजब आणि मजेशीर सल्ले शेअर मुलाखतीद्वारे शेअर केले.

Rajesh Khannas Lessons for Twinkle: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते राजेश खन्ना आणि ट्विंकल खन्ना या बाप लेकीची जोडी खूप प्रसिद्ध होती. राजेश खन्ना यांनी त्यांची मुलगी ट्विंकल खन्ना हिचे संगोपन अतिशय अनोख्या आणि खास पद्धतीने केले होते. त्यांनी त्यांच्या लाडक्या मुलीला असे अनेक सल्ले दिले होते, जे फार कमी वडील त्यांच्या मुलींना देऊ शकतात. राजेश खन्ना बॉलिवूडवर दीर्घकाळ राज्य केले. त्यांची मुलगी ट्विंकलने चित्रपटसृष्टीत नशीब आजमावले, पण तिला फारसे यश मिळाले नाही. तिने अभिनय सोडला असून, ट्विंकल सध्या लेखिका बनली आहे. ही अभिनेत्री सोशल मीडियावरही सक्रीय असते. तिनं अलिकडे एका मुलाखतीत वडिलांनी दिलेल्या अजब सल्ल्याविषयी माहिती दिली. डेटिंगपासून पतीवर लक्ष ठेवण्यापर्यंत राजेश खन्ना यांनी मुलीला कोणकोणते सल्ले दिलेत? जाणून घेऊयात.
अलिकडेच ट्विंकल खन्नाने खुलासा केला होता की, तिच्या वडिलांनी तिला डेटिंगचा सर्वोत्तम सल्ला दिला होता. मन कधीही दुखावले जाऊ नये, यासाठी तिच्या वडिलांनी डेटिंगविषयी अजब सल्ला दिला होता. "त्यांनी मला सांगितलं होतं की, एका वेळी चार बॉयफ्रेंड ठेव. जेणेकरून कधीही मन दुखावले जाणार नाही. माझे वडील असे एकमेव व्यक्ती आहेत, जे माझं मन दुखावू शकतात", असं ट्विंकल खन्ना म्हणाली.
पतीवर लक्ष ठेवण्याचा सल्ला
View this post on Instagram
सुपरस्टार राजेश खन्ना यांनी त्यांची मुलगी ट्विंकल खन्नाला तिचा पती अक्षय कुमारवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला होता. हा सल्ला अभिनेत्रीला मस्करीत देण्यात आला होता. त्यांनी सांगितलं की, अक्षय कुमार हा 'हेरा फेरी' करणारा माणूस आहे. त्याला नियंत्रणात ठेवले पाहिजे. जास्त स्ट्रिक्ट राहणं गरजेचं नाही. अन्यथा नातेसंबंधात ताण येऊ शकतो, असं राजेश खन्ना यांनी ट्विंकल खन्नाला सल्ला दिला होता.
2019 मध्ये फादर्स डे निमित्त ट्विंकल खन्नाने तिचे वडील राजेश खन्ना यांच्याबद्दल लेख लिहिला होता. तिने यादरम्यान, एक ह्रदयस्पर्शी किस्सा शेअर केला होता. ज्यामध्ये तिने तिच्या वडिलांचे वर्णन आतापर्यंतचे सर्वात छान व़डील असे केले. अभिनेत्री पुढे लिहिले की, "त्यांनी मला नेहमीच समान वागणूक दिली. विशेष म्हणजे मला दारूचा पहिला घोट देणारेही ते पहिले व्यक्त होते. त्यांनीच पहिल्यांदा माझ्या हातात स्कॉर्चचा ग्लास दिला होता", असा खुलासा अभिनेत्रीने केला.
महत्त्वाच्या इतर बातम्या:























