एक्स्प्लोर

Raja Shivaji: मानधनाची आकडेमोड थांबवा! 'राजा शिवाजी'त 'या' दिग्गज कलाकारांनी केलं मोफत काम ; रितेशने सांगितली नावं ..

आता खुद्द रितेश देशमुखनेच कलाकारांच्या मानधनाविषयी खुलासा केलाय. अनेक दिग्गज कलाकारांनी या चित्रपटात निशुल्क काम केलं आहे.

Riteish Deshmukh on Raja Shivaji Actors Fees:  गेल्या अनेक दिवसांपासून राजा शिवाजी या रितेश देशमुखच्या (Riteish Deshmukh) ऐतिहासिक चित्रपटाची चर्चा होती. 1 मे रोजी हा चित्रपट देशभरातील सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. अवघ्या चार दिवसात या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलंय. बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट जोरात चालताना दिसतोय. 100 कोटींचा बजेट असणारा मराठी चित्रपट अनेक दिग्गज मराठी व हिंदी कलाकारांच्या भूमिकांनी चर्चेत आहे. अभिषेक बच्चन,संजय दत्त,विद्या बालन,फरदीन खान,बोमन इराणी, रितेश देशमुख अशा तगड्या कलाकारांनी चित्रपटात काम करण्यासाठी किती मानधन घेतलं? याविषयी गेल्या काही दिवसांपासून मोठी चर्चा होती. अनेकांनी कलाकारांच्या मानधनावरून अंदाज बांधायला सुरुवात केली होती. आता खुद्द रितेश देशमुखनेच कलाकारांच्या मानधनाविषयी खुलासा केलाय. अनेक दिग्गज कलाकारांनी या चित्रपटात निशुल्क काम केलं आहे. कोणीही मानधन घेतलं नाही असं रितेशनं सांगितलं.

काय म्हणाला रितेश देशमुख ?

रितेश देशमुख म्हणाला ' खरं सांगतो तुम्हाला, अभिषेक बच्चन याने चित्रपटात मोफत काम केलं आहे. सलमान खान याने मोफत काम केलं आहे. विद्या बालन, बोमन इराणी यांनी मोफत काम केलंय चित्रपटात.जेनेलिया आणि रितेश देशमुख यांनी मोफत काम केलं आहे चित्रपटात. ही महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे. जेव्हा महाराजांचा विषय येतो तेव्हा सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आम्ही हा चित्रपट करण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे जे मानधनाचे तर्क लावले जात आहेत, ती कृपया लावू नका.आपल्या परीने जे काही होत असेल ते सगळ्यांनी करण्याचा प्रयत्न केलाय. फरदीन खाननेही चित्रपटात मोफत काम केलं आहे. जितके जास्त महाराजांवर चित्रपट निघतील तेवढे चांगलं आहे. वेगवेगळ्या नजरेतून हे चित्रपट लोकांसमोर येतील. यामुळे महाराज समजण्यास आपल्याला उपयोग होईल. ही गोष्ट लहान मुलांनी ही ऐकली आहे आणि आजी आजोबांनी हे ऐकली आहे.त्यामुळे आई-वडिलांनी त्यांच्या मुलांना घेऊन हा चित्रपट बघण्यासाठी जावं " असं रितेश म्हणाला.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vicky Somkuwar (@vicky.somkuwar.52)

'राजा शिवाजी' सिनेमाच्या कमाईचे आकडे

  • पहिला दिवस, 1 मे 2026 : 12.40 कोटी
  • दुसरा दिवस, 2 मे 2026 : 11.50 कोटी
  • तिसरा दिवस, 3 मे 2026 : 13.10 कोटी
  • चौथा दिवस, 4 मे 2026 : 5.60 कोटी

    एकूण कमाई : 42.60 कोटी

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget