Dharmendra Cremation: कडेकोट बंदोबस्तात धर्मेंद्र यांच्यावर करण्यात आले अंत्यसंस्कार; 'या' स्टार किडलाही गेटवर अडवलं, अखेर फोनवर बोलून आत सोडलं
Dharmendra Cremation: कडेकोट बंदोबस्तात धर्मेंद्र यांच्यावर करण्यात आले अंत्यसंस्कार; 'या' स्टार किडलाही गेटवर अडवलं, अखेर फोनवर बोलल्यानंतर आत सोडलं

Dharmendra Cremation: तब्बल सहा दशकं बॉलिवूडवर (Bollywood News) राज्य करणाऱ्या धर्मेंद्र (Dharmendra) यांनी अखेरचा श्वास घेतला आणि संपूर्ण सिनेसृष्टी पोरकी झाली. 24 नोव्हेंबर रोजी धर्मेंद्र यांचं निधन (Dharmendra Passes Away) झालं. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विले पार्ले येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पण, धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी सुरक्षा व्यवस्था एवढी कडेकोट होती की, मीडिया, पॅपाराझी किंवा चाहत्यांना आत जाऊच दिलं गेलं नाही. अशातच आता एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये राज बब्बर (Raj Babbar) यांचा मुलगा गेटवर थांबला आहे. त्याला गेटवरच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अडवलं असून आत सोडतच नसल्याचं दिसतंय.
एवढंच काय तर, तिथे असलेले पॅपाराझीसुद्धा 'राज बब्बर यांच्या मुलाला जाऊ द्या...', असे मागून ओरडत आहेत. पण, सुरक्षा कर्मचारी त्यासा आत सोडायला तयार नव्हते. अखेर तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीला कुणाला तरी बोलवताना आणि नंतर आर्य बब्बर (Aarya Babbar) यांना त्यांच्याशी बोलायला सांगितल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय. आर्य त्या व्यक्तीशी बोलतो आणि त्यानंतरच त्याला आत सोडलं जातं.
View this post on Instagram
मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्मशानभूमीबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी होती, त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. अनेक बॉलिवूड स्टार त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले. धर्मेंद्र यांच्या पत्नी हेमा मालिनी आपल्या पतीला अखेरचा निरोप देण्यासाठी स्मशानभूमीत पोहोचल्या. मुलगी ईशा देओल देखील वडिलांना अंतिम निरोप देण्यासाठी स्मशानभूमीत उपस्थित होती. वडिलांना गमावल्याचं दुःख ईशाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं आणि तिच्या डोळ्यात अश्रू होते. धर्मेंद्र यांचा नातू करण देओल देखील आजोबांना अखेरचा निरोप देण्यासाठी पोहोचलेला.
दरम्यान, अनेक मोठे बॉलिवूड स्टार धर्मेंद्र यांना निरोप देण्यासाठी स्मशानभूमीत पोहोचले. हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अमिताभ बच्चन त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन आणि नातू अगस्त्य नंदा यांच्यासोबत आपल्या लाडक्या 'वीरू'ला अखेरचा अलविदा म्हणण्यासाठी पोहोचलेले. आमिर खान देखील तिथे उपस्थित होता. विद्या बालनचा पती सिद्धार्थ रॉय कपूर देखील त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























