एक्स्प्लोर

मोठी बातमी : धर्मेंद्रंचं निधन, अंत्ययात्रा ते सनी देओलकडून मुखाग्नी, अर्ध्या तासात 'ही मॅन'ला निरोप, पवनहंस स्मशानभूमीत काय काय घडलं?

Dharmendra Passes Away: धर्मेंद्र यांच्या निधनाबाबत देओल कुटुंबीयांकडून माध्यमांना अधिकृत माहिती देण्यात आली नाही. पण, अवघ्या अर्ध्या तासांतच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Dharmendra Passes Away: बॉलिवूडचे (Bollywood) ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांनी वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कित्येक दिवसांपासून प्रकृती अस्वास्थामुळे धर्मेंद्र (Actor Dharmendra) यांच्यावर त्यांच्या राहत्या घरी उपचार सुरू होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. पण, धर्मेंद्र यांच्या निधनाबाबत देओल कुटुंबीयांकडून माध्यमांना अधिकृत माहिती देण्यात आली नाही. पण, अवघ्या अर्ध्या तासांतच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा थोरला लेक सनी देओलकडून त्यांना मुखाग्नी देण्यात आला. 

धर्मेंद्र यांच्या जुहू येथील राहत्या घरात सोमवारी साधारणतः साडेबाराच्या सुमारास एक रुग्णवाहिका पोहोचली. त्यावेळी चाहत्यांच्या काळजाची धाकधूक वाढलेली. धर्मेंद्र यांची प्रकृती नाजूक असल्याचं सांगितलं जाऊ लागलं. त्यावेळी धर्मेंद्र यांच्या घरी नातेवाईकांची रांग लागली. धर्मेंद्र यांच्या मुलीही जुहूतल्या घरी पोहोचल्या. याच दरम्यान, धर्मेंद्र यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तेवढ्याच विले पार्ले इथल्या पवनहंस स्मशानभूमीत हेमा मालिनी आणि ईशा देओल या दिसल्या. कुणाला काही कळण्यापूर्वीच सुपरस्टार धर्मेंद्र यांच्यावरील अंत्यसंस्कार उरकण्यात आलेले. अवघ्या अर्ध्या तासांतच धर्मेंद्र यांचा थोरला लेक सनी देओलनं मुखाग्नी दिला आणि तब्बल सहा दशकं सिनेसृष्टीवर राज्य करणारा बॉलिवूडचा ही-मॅन अनंतात विलिन झाला. 

राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास 

12 नोव्हेंबर रोजी धर्मेंद्र यांना त्यांच्या कुटुंबाच्या विनंतीवरून ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला. तेव्हापासून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. पण, धर्मेंद्र यांच्यावर ज्यावेळी उपचार सुरू होते. तेव्हा त्यांच्याबाबत अनेक अफवा पसरवण्यात आलेल्या. त्यावेळी देओल कुटुंबियांकडून माध्यमांवर आगपाखड करण्यात आलेली. सनी देओलनं घराबाहेर उभ्या असलेल्या पॅपाराझींना फटकारलंही होते. सनी देओलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला. तसेच, ईशा देओल, हेमा मालिनी यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करुन अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलेलं. दरम्यान, असं असलं तरीसुद्धा अद्याप देओल कुटुंबीयांकडून धर्मेंद्र यांच्या निधनाबाबत अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेलं नाही. 

'इक्‍कीस' चित्रपटातील धर्मेंद्र यांचं मोशन पोस्टर आणि व्हॉइस नोट प्रदर्शित

सोमवारी, 'इक्‍कीस' चित्रपटातील धर्मेंद्र यांच्या पात्राचं एक नवं मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलेलं. पोस्टमध्ये धर्मेंद्र यांची व्हॉइस नोट देखील समाविष्ट आहे. त्यांचा आवाज ऐकून चाहते इमोशनल झालेले. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Dharmendra Passes Away: बॉलिवूडचा 'ही-मॅन' काळाच्या पडद्याआड; सुपरस्टार धर्मेंद्र यांच निधन, 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

महत्त्वाच्या बातम्या

Tharala Tar Mag Marathi Serial Track: 'ठरलं तर मग'मध्ये सायलीला मिळाली खरी ओळख; मालिकेत मोठं अनपेक्षित वळण, पुढे काय घडणार?
'ठरलं तर मग'मध्ये सायलीला मिळाली खरी ओळख; मालिकेत मोठं अनपेक्षित वळण, पुढे काय घडणार?
Pravin Tarde Targets Trollers Over Shah Rukh Khan: 'मी किती हिंदुत्ववादी आहे, हे मला कुणी शिकवू नये...'; शाहरुखवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर प्रवीण तरडेंचं सणसणीत उत्तर, सलमान खानचा उल्लेख करत म्हणाले...
'मी किती हिंदुत्ववादी आहे, हे मला कुणी शिकवू नये...'; शाहरुखवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर प्रवीण तरडेंचं सणसणीत उत्तर, सलमान खानचा उल्लेख करत म्हणाले...
Nagraj Manjule Wife Gargi Kulkarni: 'खाशाबा'मध्ये झळकणार नागराज मंजुळेंची पत्नी; 'फँड्री', 'सैराट', 'झुंड'मध्ये महत्त्वाच्या भूमिका निभावणारी गार्गी कुलकर्णी कोण?
'खाशाबा'मध्ये झळकणार नागराज मंजुळेंची पत्नी; 'फँड्री', 'सैराट', 'झुंड'मध्ये महत्त्वाच्या भूमिका निभावणारी गार्गी कुलकर्णी कोण?
Amitabh Bachchan Purchase Land In Ayodhya Paid 15 Crore:
"मी अमिताभ, मला अयोध्येत जमीन घ्यायचीय..."; पहाटे 3 वाजता 'बिग बीं'नी फिरवलेला फोन, दुसऱ्या दिवशीच उरकून टाकला कोट्यवधींचा व्यवहार

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Railway Crime News: रेल्वेतील लाईट बंद करुन महिलांच्या शेजारी येऊन झोपले, शरीराला हात लावून किळसवाणे केले; नागपुरमधील कुटुंबीयांचा आयुष्यातील सर्वात वाईट अनुभव
रेल्वेतील लाईट बंद करुन महिलांच्या शेजारी येऊन झोपले, शरीराला हात लावून किळसवाणे केले; नागपुरमधील कुटुंबीयांचा आयुष्यातील सर्वात वाईट अनुभव
Nashik Rain: पालघरमध्ये एका दिवसात आभाळ फाटल्यासारखा पाऊस पाडणारा 'तो' भोवरा नाशिकच्या दिशेने न जाता दुसरीकडेच सरकला, आता महाराष्ट्रातील 'या' भागावर अतिवृष्टीचं संकट?
आभाळ फाटल्यासारखा पाऊस पाडणारा 'तो' भोवरा नाशिककडे न जाता दुसरीकडेच सरकला, आता महाराष्ट्रातील 'या' भागावर अतिवृष्टीचं संकट?
Pune News: पुणे शहरातील महापालिकेच्या तब्बल 101 शाळांना थेट रविवारपर्यंत सुट्टी जाहीर, महापौरांनी दिली माहिती, काय आहे कारण?
पुणे शहरातील महापालिकेच्या तब्बल 101 शाळांना थेट रविवारपर्यंत सुट्टी जाहीर, महापौरांनी दिली माहिती, काय आहे कारण?
Nashik Heavy Rain Alert: नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचं तांडव! पुढील 48 तास धोक्याचे, ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचं तांडव! पुढील 48 तास धोक्याचे, ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
Mumbai Rain Local Train Updates Marathi News: विरारपर्यंत लोकल सेवा पूर्ववत; पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील A टू Z अपडेट्स
विरारपर्यंत लोकल सेवा पूर्ववत; पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील A टू Z अपडेट्स,
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Embed widget