एक्स्प्लोर

Raid 2 Box Office Collection Day 23: 'रेड 2' ठरणार अजय देवगणची चौथी सर्वात मोठी फिल्म? कमाईच्या सर्वात मोठ्या टप्प्यापासून काही पावलं दूर

Raid 2 Box Office Collection Day 23: अजय देवगण स्टारर 'रेड 2 या चित्रपटानं 2025 विक्की कौशलचा चित्रपट वगळता सर्व चित्रपटांना मागे टाकलं आहे.

Raid 2 Box Office Collection Day 23: राजकुमार गुप्ता (Raj Kumar Gupta) दिग्दर्शित 'रेड 2' (Raid 2) 1 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. तेव्हापासून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) चांगलीच कमाई करत आहे. या चित्रपटाद्वारे अजय देवगणनं (Ajay Devgn) पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की, तो बॉक्स ऑफिसचा (Box Office Collection) राजा आहे आणि चित्रपट कसा हिट करायचा हे त्याला माहीत आहे. या चित्रपटानं प्रदर्शनाचे तीन आठवडे पूर्ण केले आहेत आणि चौथ्या आठवड्यात प्रवेश केला आहे. 'रेड 2'नं रिलीजच्या चौथ्या शुक्रवारी म्हणजेच, 23 व्या दिवशी किती कमाई केली? ते सविस्तर जाणून घेऊयात... 

'रेड 2'नं 23 व्या दिवशी किती कमाई केली?

'रेड 2 रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अजय देवगण स्टारर 'रेड 2 या चित्रपटानं 2025 विक्की कौशलचा चित्रपट वगळता सर्व चित्रपटांना मागे टाकलं आहे आणि वर्षातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपटही बनला आहे. एवढंच नाही तर, हा अजय देवगणच्या कारकिर्दीतील पाचवा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. इतके विक्रम केल्यानंतरही 'रेड 2' थांबत नाहीये आणि बॉक्स ऑफिसवर आपला ठसा उमटवत आहे. तीन आठवडे उत्तम कामगिरी केल्यानंतर, 'रेड 2' चौथ्या आठवड्यातही कमाई करत आहे. दरम्यान, 'रेड 2'ला टक्कर देण्यासाठी, राजकुमार रावचा 'भूल चुक माफ' देखील थिएटरमध्ये दाखल झाला आहे. 

  • 'रेड 2'नं रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 95.75 कोटी रुपये कमावले होते.
  • दुसऱ्या आठवड्यात 'रेड 2'चं कलेक्शन 40.6 कोटी रुपये होते.
  • तिसऱ्या आठवड्यात चित्रपटाने 20.5 कोटी रुपयांची कमाई केली.
  • सॅक्निल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'रेड 2'नं रिलीजच्या 23 व्या दिवशी 1 कोटी रुपये कमावले आहेत.
  • यासह, 'रेड 2' ची 23 दिवसांत एकूण कमाई आता 157.85 कोटी रुपये झाली आहे.

'रेड 2' अजय देवगणचा चौथा सर्वात मोठा चित्रपट बनेल का?

'रेड 2'नं चौथ्या शुक्रवारी आतापर्यंतचं सर्वात कमी कलेक्शन केलं आहे. हा अजय देवगणच्या कारकिर्दीतील पाचवा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. अभिनेत्याच्या चौथ्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा विक्रम 'गोलमाल अगेन'च्या नावावर आहे, जो 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि त्यानं 205.69 कोटी रुपये कमावले होते.

आता 'रेड 2'साठी 'गोलमाल अगेन'ला हरवणं सोपं नाही. पहिलं म्हणजे, त्याचं कलेक्शन दररोज घसरत चाललं आहे आणि दुसरं म्हणजे, अजयचा चौथा सर्वात मोठा चित्रपट बनण्यासाठी त्याला सुमारे 48 कोटी रुपयांच्या कलेक्शनची आवश्यकता आहे. घटत्या कमाईमुळे, 'रेड 2' ला हा आकडा गाठणं सोपा नाही. चौथ्या आठवड्यात चित्रपट कसा कामगिरी करतो? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Paresh Rawal Exits Hera Pheri 3: Confirmed! 'हेरा फेरी 3' मधून परेश रावल ऑफिशिअली एग्झिट; 14.89 कोटींचं सोसलं नुकसान, त्यासोबतच 15% व्याजासह 11 लाख रुपये केले परत!

महत्त्वाच्या बातम्या

Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
ZEE5 Marathi: मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
Anurag Kashyap Shubhra Shetty: एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
Hrithik Roshans Dating App: हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
Embed widget