Paresh Rawal Exits Hera Pheri 3: Confirmed! 'हेरा फेरी 3' मधून परेश रावल ऑफिशिअली एग्झिट; 14.89 कोटींचं सोसलं नुकसान, त्यासोबतच 15% व्याजासह 11 लाख रुपये केले परत!
Paresh Rawal Exits Hera Pheri 3: अखेर परेश रावल 'हेरा फेरी 3' चा भाग नसल्याची पुष्टी झाली आहे. त्यांनी निर्मात्यांना व्याजासह संपूर्ण पैसे परत केले आहेत.

Paresh Rawal Exits Hera Pheri 3: राजू, श्याम आणि बाबू भैय्या लवकरच 'हेरा फेरी 3' (Hera Pheri 3) मधून चाहत्यांच्या भेटीला येणार, ही बातमी समोर आली आणि चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. पण, हा आनंद फार काळ टिकला नाही. काही दिवसांतच बाबू भैय्यांची भूमिका साकारणाऱ्या परेश रावल यांनी 'हेरा फेरी 3'मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. परेश रावल (Paresh Rawal) यांची समजूत काढण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. पण, काहीच फरक पडला नाही. कारण, परेश रावल त्यांनी घेतलेल्या निर्णयावर ठाम होते. अशातच आता आणखी एक महत्त्वाची बाब समोर येत आहे. बॉलीवूड हंगामाच्या वृत्तानुसार, यानंतर वाद वाढत गेला आणि चित्रपटाच्या निर्मिती संस्थेने, केप ऑफ गुड फिल्म्सने परेश रावल यांच्याविरुद्ध 25 कोटींचा खटला दाखल केला. हे प्रॉडक्शन हाऊस अक्षय कुमारचं (Akshay Kumar) आहे. परेश रावल यांनी स्वतः याची पुष्टी केली आहे.
याबाबत अक्षय कुमारच्या लीगल टीमनं एक निवेदन जारी केलं. आता चित्रपटाबद्दल आणखी एक मोठी गोष्ट समोर आली आहे की, परेश रावल यांनी प्रोडक्शन हाऊसकडून सायनिंग अमाउंट म्हणून घेतलेले सर्व पैसे व्याजासह परत केले आहेत.
परेश रावल यांनी स्वाक्षरीची रक्कम व्याजासह परत केली
बॉलीवूड हंगामानं एका सूत्राच्या हवाल्यानं सांगितलं की, "परेश रावल यांनी 15 टक्के वार्षिक व्याजदरासह 11 लाख रुपयांच्या कराराची रक्कम परत केली आहे. याशिवाय, त्यांनी हेरा फेरी सीरिजमधून बाहेर पडण्यासाठी काही पैसे वाढवून देखील दिले आहेत."
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आउटलेटनं लिहिलंय की, "परेश रावल यांना टर्म शीटनुसार 11 लाख रुपये देण्यात आले होते. चित्रपटात काम करण्यासाठी त्यांना एकूण 15 कोटी रुपये देण्यात येणार होते. या टर्म शीटमध्ये असंही नमूद करण्यात आलं होतं की, उर्वरित रक्कम म्हणजेच, 14 कोटी 89 लाख रुपये चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर एका महिन्यानं मिळतील."
सूत्रांनी असंही सांगितलंय की, चित्रपटाचं चित्रीकरण पुढील वर्षी सुरू होणार आहे आणि तो 2026 च्या अखेरीस किंवा 2027 च्या सुरुवातीला प्रदर्शित होऊ शकतो. याचा अर्थ परेश रावल यांना त्यांचे उर्वरित पैसे मिळवण्यासाठी सुमारे 2 वर्ष वाट पहावी लागणार होती.
दरम्यान, 'हेरा फेरी' सीरिजमधील पहिला चित्रपट 2000 मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. यामध्ये अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल या त्रिकुटानं गाजवला. यानंतर 2006 मध्ये 'फिर हेरा फेरी' हा सिक्वेल आला. यामध्येही राजू, श्याम आणि बाबू भैया हे तिघेही दिसले. या चित्रपटांची गणना कल्ट कॉमेडीमध्ये केली जाते आणि म्हणूनच 'हेरा फेरी 3' बद्दल लोकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Salman Khan च्या घरात मध्यरात्री का घुसलेली महिला? पोलीस चौकशीत ईशा छाबडाचा धक्कादायक खुलासा























