Rahul Deshpande : 'तिला के-पॉप जास्त आवडतं', शास्रीय गायक राहुल देशपांडेने सांगितला लेकीचा मजेशीर किस्सा
Rahul Deshpande : कट्यार काळजात घुसली सारख्या चित्रपटांमध्ये राहुलने गायलेली गाणी आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये राहुलने लेकीचा एक मजेशीर किस्सा सांगितला आहे.
![Rahul Deshpande : 'तिला के-पॉप जास्त आवडतं', शास्रीय गायक राहुल देशपांडेने सांगितला लेकीचा मजेशीर किस्सा Rahul Deshpande Classical Singer daughter Renuka Loves K Pop BTS Band said in an interview detail marathi news Rahul Deshpande : 'तिला के-पॉप जास्त आवडतं', शास्रीय गायक राहुल देशपांडेने सांगितला लेकीचा मजेशीर किस्सा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/17/1d967f4c03595cc39d6d8059ddce461e1710662149089720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Rahul Deshpande : गायक आणि अभिनेता राहुल देशपांडे (Rahul Deshpande) हा नुकताच अमलताश (Amaltash) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आजपर्यंत अनेक गाण्यांची पर्वणी राहुलने प्रेक्षकांना दिली आहे. त्याचप्रमाणे त्याच्या अभिनयानेही त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यातच आता पुन्हा एकदा अमलताश या चित्रपटाच्या माध्यमातून राहुलच्या चाहत्यांना संगीत आणि त्याच्या अभिनयाचा झलक पाहायला मिळणार आहे. पण शास्रीय गाण्यात पारंगत असलेल्या राहुलच्या लेकीला मात्र के-पॉपच्या गाण्यांचं वेड आहे. याचा एक मेजशीर राहुलने नुकताच सांगितला आहे.
कट्यार काळजात घुसली सारख्या चित्रपटांमध्ये राहुलने गायलेली गाणी आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये राहुलने लेकीचा एक मजेशीर किस्सा सांगितला आहे. रेडिओ सिटी मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राहुलने हा किस्सा सांगितला. यावेळी त्याच्या लेकीला के-पॉप फार आवडतं आणि ती त्याची चाहती आहे. घरातही ती तिच गाणा म्हणते, असं म्हटलं.
तिला के-पॉपचा शो पाहायचा होता - राहुल देशपांडे
तिला सगळ्यात कोणता बँन्ड आवडत असेल तर तो बीटीएसचा आहे. ते अजिबात मला पसंतीस पडत नाही. ते चांगलं आहे, की वाईट आहे हे मी सांगणार नाही. एक दिवस ती खूप चिडून बसली आणि दिवसभर रडत होती, तिला तो बीटीएसचा शो पाहायचा आहे. सिंगापूरला तो शो होता. तिची आई खूप चिडली तिच्यावर. तेव्हा मी तिला सांगितलं, की हरकत नाही बाळा जेव्हा मला जमेल तेव्हा मी तुला नक्की दाखवेन. ते पाहून ती आता डान्स वैगरे पण करायला लागली आहे. त्यामुळे तिला ते के-पॉप भयंकर आवडतं, असं राहुलने सांगितलं.
'अमलताश' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला
या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेसह राहुल देशपांडेने दिग्दर्शनाची देखील धुरा सांभाळली आहे. तसेच या चित्रपटाचे लेखन सुहास देसले यांनी केलंय. राहुल देशपांडेसह या चित्रपटामध्ये पल्लवी परांजपे, प्रतिभा पाध्ये, दीप्ती माटे, त्रिशा कुंटे हे कलाकार देखील प्रमुख भूमिकेत पाहायला मिळाले आहेत. तसेच या चित्रपटामधून प्रेक्षकांना संगीताची देखील पर्वणी मिळतेय. मुग्धा श्रीकांत देसाई प्रस्तुत, दर्शन प्रॉडक्शन्स, मीडिअम स्ट्रॉन्ग प्रॉडक्शन्स आणि वन फाईन डे यांची निर्मिती असून अभिनेता जितेंद्र जोशी याने देखील या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे. तसेच या सिनेमाची गोष्ट देखील संगीतावर आधारित आहे. या चित्रपटच्या माध्यमातून अनेक नवे कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला आलेत.
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)