'मी मंगळसूत्र घालीन किंवा नाही घालणार,धमकी वजा सूचना समजा...'; 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
Marathi Actress Social Media Post : मराठी अभिनेत्रीने नुकतच मंगळसूत्रावर केलेली एक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. नेमकी काय आहे ती पोस्ट सविस्तर जाणून घेऊयात.
Radhika Deshpande Social Media Post : अभिनेत्री मुग्धा गोडबोलेने (Mugdha Godbole) क्षिती जोगची (Kshitee Jog) नुकतीच एक मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये क्षितीने मंगळसूत्रावर भाष्य केलं आहे. त्यानंतर क्षितीला बऱ्याच प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. त्यानंतर आता पुन्हा एका मराठी अभिनेत्री मंगळसूत्रावरील पोस्ट चर्चेत आली आहे. या अभिनेत्री मंगळसूत्रावर सध्या सुरु असलेल्या परिस्थितीवर भाष्य करत तिचं मत मांडलं आहे.
अभिनेत्री राधिका देशपांडे हीने तिच्या सोशल मीडियावर मंगळसूत्रावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिने अनेक गोष्टी परखडपणे मांडल्याचं पाहायला मिळतंय. अभिनेत्री क्षिती जोगचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर अश्लील कमेंट्स केल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर मुग्धा गोडबोल हिने देखील त्यावर चोख उत्तर दिलं. त्यानंतर पुन्हा एका मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत आल्याचं पाहायला मिळतंय.
राधिका देशपांडेने नेमकं काय म्हटलं?
मी माझ्या मंगळसूत्राचं वजन करू देणार नाही.मी मंगळसूत्र घालीन किंवा नाही घालणार. माझं लग्नं नुकतंच झालं असो किंवा नसो, माझा नवरा माझा आहे आणि मी त्याची बायको आहे ह्याची आठवण तुम्हाला करून देण्यासाठी मी मंगळसूत्र घालत नसते. त्यामुळे आत्ताच सांगते मी माझ्या मंगळसूत्राचं वजन करू देणार नाही. फरक पडतो. मुळात मंगळसूत्र कशासाठी, कोणासाठी, केंव्हा, कधी, कशाला ह्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला का देऊ? अशी सुरुवात राधिकाने तिच्या पोस्टमध्ये केली आहे.
आम्ही स्त्रिया मंगळसूत्राला जीवापाड जपतो - राधिका देशपांडे
धमकी वजा सूचना समजा. उत्तर द्यायची वेळ नाही पण आज मला प्रश्न नक्कीच पडला आहे. कोण होतात हे स्त्री धनाचा हिशोब, झडती, माहिती घेणारे? हे सगळं घेऊन माझं सोनं वाटून द्यायला तो सत्यनारायणाचा प्रसाद आहे? माझं सोनं हे माझं आहे, ते सौभाग्याचं लेणं आहे. आम्ही स्त्रिया सहज बोलता बोलता त्याला ‘प्रीटी ज्वेलरी‘ असं बोलून जातो. पण बहुतांश भारतीय स्त्रियांकरता सोनं, जे आई-वडिलांनी, सासु-सासऱ्यांनी दिलं आहे, जे तिच्या किंवा नवऱ्याच्या परिश्रमातून विकत घेतलं आहे, अशा सोन्याचं वजन किती बरं असेल? काही गोष्टी आकड्यात मोजता येत नसतात. अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेल्यांना ते नाही कळायचं. आम्ही स्त्रिया मंगळसूत्राला जीवापाड जपतो. काळजी पोटी ते ठराविक ठिकाणी घालत नाही. माझ्या घरात तर मंगळसूत्र ठेवायची एक स्वतंत्र जागा आहे. घर घ्यायची वेळ आली तेंव्हा मी माझं सोन विकलं पण मंगळसूत्र मुठीतून सुटलं नाही. आणि ह्या धनाचा हिशोब आणि वाटप आम्ही होऊ द्यायचा, ह्या डाव्या नेत्यांच्या आणि त्यांच्या पार्टीच्या धोरणांच्या पूर्णत्वा करता! मागे टिकली/बिंदी वरून चर्चा उधळली, इतक्यात मंगळसूत्र चर्चेचा विषय ठरलं तर उद्या लग्न संस्कृती वर काहीतरी घणाघाती बोलतील. तर “मी माझ्या मंगळसूत्राचं वजन करू देणार नाही!” विषय संपला, अशी पोस्ट राधिकाने केली आहे.
याचसोबत राधिकाने तिच्या लग्नातील एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो तिच्या लग्नातला असून विधींच्या आधीचा आहे. म्हणून त्या फोटोमध्ये तिने मंगळसूत्र घातले नाही. त्याचप्रमाणे तिने या फोटोला हे कॅप्शन दिले आहे.
View this post on Instagram