Pushpa 2 Box Office Collection Day 15: 'पुष्पा 2' 600 कोटींहून अधिक कमाई करणारा पहिला हिंदी चित्रपट; आतापर्यंतची एकूण कमाई किती?
Pushpa 2 Box Office Collection Day 15: अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 लवकरच बाहुबली 2 च्या लाईफटाईम कलेक्शनला मागे टाकेल. याशिवाय हिंदी कलेक्शनच्या बाबतीतही या चित्रपटानं मोठा विक्रम केला आहे.
Pushpa 2 Box Office Collection Day 15: 2021 मध्ये रिलीज झालेला 'पुष्पा द राइज' सुपरहिट ठरला होता. 3 वर्षांनंतर दिग्दर्शक सुकुमार यांनी त्याच टीमसोबत 'पुष्पा 2: द रुल' चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित केला आहे. हा चित्रपट 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आणि तो प्रदर्शित होताच एकामागून एक सर्व मोठे रेकॉर्ड मोडत बॉक्स ऑफिसवर खराखुरा राज्य करणारा सिनेमा ठरला.
चित्रपट प्रदर्शित होऊन 15 दिवस झाले आहेत आणि चित्रपटानं आतापर्यंत भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत दुसरा क्रमांक पटकावला आहे. आता फक्त एकच चित्रपट शिल्लक आहे, ज्याचा बॉक्स ऑफिस रेकॉर्ड तोडणं बाकी आहे. आणि तो चित्रपट म्हणजे, प्रभासचा बाहुबली 2, जो 2017 साली आला होता.
पुष्पा 2 चं बॉक्स ऑफिस कलेक्शन
चित्रपटाच्या 15व्या दिवसाच्या कमाईशी संदर्भातले सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत. जाणून घेऊया, या चित्रपटानं प्रीमियरच्या दिवशी 10.65 कोटी रुपये कमावल्यानंतर दररोज किती कमाई केली आहे. हे आकडे Secnilk वर उपलब्ध असलेल्या डेटानुसार आहेत आणि सकाळी 10:40 पर्यंत आहेत.
View this post on Instagram
बाहुबलीच्या रेकॉर्डपेक्षा 'पुष्पा 2' किती मागे आहे?
Sacknilk नुसार, एसएस राजामौली यांच्या बाहुबली चित्रपटानं 2017 मध्ये भारतीय बॉक्स ऑफिसवर 1030.42 कोटी रुपयांची कमाई केली होती. सध्या हा विक्रम पार करण्यासाठी पुष्पा 2 ला आणखी काही दिवस लागतील, पण कमाईचा वेग पाहता, बाहुबलीचा लाईफटाईम रेकॉर्ड पुष्पा 2 येत्या दिवसांत अगदी सहज मोडेल, असंच दिसतंय. बाहुबली 2 चा रेकॉर्ड मोडला, तर पुष्पा 2 आणखी एक नवा विक्रम रचणार आहे. खरं तर, यानंतर पुष्पा 2 भारतातील आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर येईल.
हिंदीमध्ये 600 कोटींचा टप्पा पार करणारा 'पुष्पा 2' हा पहिला चित्रपट
पुष्पा 2 नं रिलीजच्या 14 व्या दिवशी 600 कोटींचा टप्पा पार केला. या चित्रपटानं आतापर्यंत हिंदीत 607.6 कोटींची कमाई केली आहे. यासह हा चित्रपट 600 कोटींचा टप्पा पार करणारा हिंदीतील पहिला चित्रपट ठरला आहे. याआधी हिंदीमध्ये सर्वाधिक कमाईचा विक्रम शाहरुख खानच्या जवान या चित्रपटाच्या नावावर होता, ज्यानं 2023 मध्ये हिंदी आवृत्तीमध्ये 582.31 कोटी रुपये कमावले होते.
पुष्पा 2 ची स्टारकास्ट
पुष्पा 2 मध्ये, अल्लू अर्जुन पुष्पाराजच्या भूमिकेत आहे, ज्याच्या विरुद्ध रश्मिका मंदाना श्रीवल्लीच्या भूमिकेत दिसत आहे. दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली आहे. याशिवाय मल्याळम चित्रपट स्टार फहाद फासिल देखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :