एक्स्प्लोर

Pushpa 2 Box Office Collection Day 14: 'पुष्पा 2'नं झटपट मोडला 'बाहुबली 2'चा पहिला रेकॉर्ड, पण दुसरा मोडताना दिवसा दिसले तारे

Pushpa 2 Box Office Collecion Day 14: अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर अनेक धमाकेदार रेकॉर्ड मोडले आहेत. पण, प्रभासच्या बाहुबली 2 पेक्षा अजूनही 'पुष्पा 2' खूप मागे आहे.

Pushpa 2 Box Office Collecion Day 14: अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) चित्रपट 'पुष्पा 2' (Pushpa 2) रिलीज होऊन 14 दिवस झाले आहेत आणि अवघ्या काही दिवसांत या चित्रपटानं भारतीय चित्रपट उद्योगातील बॉक्स ऑफिसवरील (Box Office) जवळपास सर्वच्या सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.

5 डिसेंबर रोजी तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदीमध्ये रिलीज झालेल्या पुष्पा 2 (Pushpa 2 : The Rule) नं रिलीजच्या अकराव्या दिवशी KGF 2 (859.7 कोटी) च्या लाईफटाईम कलेक्शनला (Lifetime Collection) मागे टाकले आणि भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला. या चित्रपटानं 'बाहुबली  2'चा देखील एक रेकॉर्ड मोडला. पण, दुसरा रेकॉर्ड मोडताना वाईल्ड फायर पुष्पाला देखील दिवसा तारे पाहावे लागले आहेत. 

'पुष्पा 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन

'पुष्पा 2' नं रिलीज होण्याच्या एक दिवस आधी म्हणजेच, 4 डिसेंबर रोजी 10.65 कोटी रुपये कमावलेले. यानंतर, पहिल्या दिवसापासून आजपर्यंत चित्रपटानं दररोज कोट्यवधींची कमाई करत, अनेक दिग्गजांना दिवसा तारे दाखवले. पण,  बाहुबली 2 चे रेकॉर्ड मोडताना मात्र, वाईल्ड फायर पुष्पाला दिवसा तारे दिसले आहेत. हे आकडे Secnilk वर उपलब्ध असलेल्या डेटानुसार आहेत आणि रात्री 11 वाजेपर्यंत आहेत. चित्रपटाच्या एकूण कलेक्शन आणि आजच्या कलेक्शनशी संबंधित आकडे अंतिम नाहीत. हे सुरुवातीचे आकडे असून यामध्ये बदल होऊ शकतो.

View this post on Instagram
 
A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

बाहुबली 2 च्या बॉक्स ऑफिस रेकॉर्डपेक्षा पुष्पा 2 किती मागे?

'पुष्पा 2' आता वीकडेमध्ये पोहोचला आहे. यामुळे चित्रपटाची रोजची कमाई जरी कमी झाली असली, तरी आजही चित्रपट दररोज 20 कोटींहून अधिक कमाई करत आहे. पुष्पा 2 नं बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड मोडले असतील, पण 2017 मध्ये एसएस राजामौली यांच्या बाहुबली या चित्रपटानं बनवलेल्या चित्रपटासमोर अजूनही डोंगरासारखा विक्रम रचला आहे.

Sacknilk च्या रिपोर्टनुसार, प्रभासचा सुपरडुपर हिट चित्रपट बाहुबली 2 नं भारतात 1030.42 कोटी रुपयांचं लाईफटाईम कलेक्शन केलं होतं. बॉक्स ऑफिसवर अजूनही सुरु असलेला पुष्पा 2 चा दबदबा पाहता हा विक्रमही लवकरच मोडीत निघेल असं वाटते आहे. खरं तर बाहुबली 2 चा लाईफटाईम कलेक्शनचा रेकॉर्ड वाईल्ड फायर पुष्पा अगदी सहज मोडीत काढेल, असं वाटलं होतं. पण, पुष्पा 2 अजूनही बाहुबलीला मागे टाकण्याच्या प्रयत्नात असल्याचं पाहायला मिळत आहे. 

चित्रपटानं मोडला बाहुबली 2 चा रेकॉर्ड

एकूण कमाईच्या बाबतीत पुष्पा 2 अजूनही बाहुबली 2 च्या मागे असला तरी हिंदीतील कलेक्शनच्या बाबतीत या चित्रपटानं प्रभासच्या चित्रपटाचा विक्रम मोडला आहे. बाहुबली 2 नं हिंदीमध्ये 510.99 कोटी रुपये कमावले होते, तर पुष्पा 2 नं आतापर्यंत हिंदीमध्ये 591.1 कोटी रुपये कमावले आहेत. पुष्पा 2 नं शाहरुख खानचा हिंदीत सर्वाधिक कमाई करणाऱ्या जवान चित्रपटाचा विक्रमही मोडला आहे. जवानानं 582.31 कोटी रुपये कमावले होते. जी आता पुष्पा 2 च्या मागे आहे.

दरम्यान, पुष्पा 2 हा 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा: द राइज' या चित्रपटाचा पुढचा भाग आहे. या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन सुकुमार आणि अल्लू अर्जुन यांनी केलं आहे, दोन्ही चित्रपटांमध्ये रश्मिका मंदाना आणि फहद फासिल महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. चित्रपटाची कथा चंदनाची तस्करी करणाऱ्या आणि सर्वात शक्तिशाली माफिया बनणाऱ्या पुष्पा राजची आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Pushpa 2 BO Collection In Hindi Day 14: 'पुष्पा 2'नं 14 व्या दिवशी इतिहास रचला; 600 कोटींचा टप्पा ओलांडला, आजवर सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MSRTC : एसटीची भाडेवाढ होणार, महामंडळाकडून 14.95 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव, राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार
एसटीची भाडेवाढ होणार, महामंडळाकडून 14.95 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव, राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार
Amit Shah : आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gateway of India Mumbai : मुंबई- एलिफंटाकडे निघालेली प्रवासी बोट बुडाली, मृतांचा आकडा 13वरABP Majha Headlines : 7 AM : 19 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  19 डिसेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :19 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MSRTC : एसटीची भाडेवाढ होणार, महामंडळाकडून 14.95 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव, राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार
एसटीची भाडेवाढ होणार, महामंडळाकडून 14.95 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव, राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार
Amit Shah : आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Maharashtra Cabinet Allocation: मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जुनीच खाती; अजितदादांच्या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार?
दत्तामामा भरणे- मकरंद पाटलांना लॉटरी, खातेवाटपात जॅकपॉट लागला; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार?
Fact Check : संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
कांद्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, बळीराजाला बसतोय फटका, सध्या किती दरानं विकतोय कांदा?  
कांद्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, बळीराजाला बसतोय फटका, सध्या किती दरानं विकतोय कांदा?  
Prakash Ambedkar : सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला शासनाने पैसे अन् नोकरी द्यावी; प्रकाश आंबेडकरांची मागणी, सरकारवरही व्यक्त केला संताप
सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला शासनाने पैसे अन् नोकरी द्यावी; प्रकाश आंबेडकरांची मागणी, सरकारवरही व्यक्त केला संताप
Embed widget