Pushpa 2 Box Office Collection Day 1: 'पुष्पा 2'च्या वादळात बॉक्स ऑफिस गुरफटलं; देशाचा हाईएस्ट ओपनर ठरला अल्लू अर्जुनचा ब्लॉकबस्टर, पहिल्या दिवशी कितीचं कलेक्शन?
Pushpa 2 Box Office Collection: अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटानं जबरदस्त ओपनिंग घेतली आहे. सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड मोडत हा चित्रपट आतापर्यंतचा हाईएस्ट ओपनर ठरला आहे.
Pushpa 2 Box Office Collection Day 1: तीन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अल्लू अर्जुन (Allu Arjun), रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) स्टारर पुष्पाचा सीक्वेल 'पुष्पा 2: द रुल' (Pushpa 2: The Rule) चित्रपटगृहात रिलीज झाला आणि चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली. 5 डिसेंबरला रिलीज झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. खरंतर रिलीजपूर्वीच अॅडव्हान्स बुकिंगमध्ये पुष्पा 2 नं बक्कळ गल्ल करत अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले होते. त्याचवेळी रिलीज झाल्यावर पुष्पा 2 सर्व रेकॉर्ड मोडीत काढणार हे स्पष्ट झालं होतं. आणि तसंच झालं. पुष्पानं पहिल्यात दिवशी अनेक रेकॉर्ड ब्रेक केले. 'पुष्पा 2' ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी दमदार ओपनिंग केली आणि आतापर्यंतच्या हाईएस्ट ओपनरचा रेकॉर्डही आपल्या नावे केला. माहितीय का? पहिल्या दिवशी पुष्पानं किती कोटींचा गल्ला केला?
'पुष्पा 2'नं रिलीजच्या पहिल्या दिवशी किती कमाई केली?
'पुष्पा 2' नं रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. बरं, चित्रपटाच्या पोस्टरपासून ते टीझर, ट्रेलर आणि गाण्यांपर्यंत प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती, याचा पुरावा ॲडव्हान्स बुकिंगमध्ये पाहायला मिळाला. खरं तर, चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचा प्री-तिकीट सेलही बंपर होता. आणि हा ॲक्शन थ्रिलर चित्रपटगृहात दाखल होताच तो पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
सकाळपासून रात्रीचे सर्वच्या सर्व शो हाऊसफुल्ल होते आणि थिएटर्समध्ये प्रत्येक सीनवर प्रेक्षक कधी टाळ्या, तर कधी शिट्ट्या वाजवताना दिसले. 'पुष्पा 2'साठी प्रेक्षकांमध्ये जो उत्साह पाहायला मिळाला, तो आजवर कदाचितच कोणत्या चित्रपटासाठी पाहायला मिळाला असेल. यासोबतच 'पुष्पा 2'वर पहिल्याच दिवशी नोटांचा पाऊस पडला की, यापूर्वीच्या चित्रपटांचे अनेक रेकॉर्ड्स पुष्पाच्या रेकॉर्ड्सच्या प्रवाहात वाहून गेले. तसेच, आता पुष्पानं ओपनिंग डेच्या दिवशी जमवलेल्या गल्ल्याचे आकडे समोर आले आहेत.
- Saknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'पुष्पा 2' नं बुधवारी तेलुगू भाषेत 10.1 कोटी रुपये जमा केले.
- या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी म्हणजेच, गुरुवारी सर्व भाषांसह 165 कोटी रुपयांची कमाई केली.
- यातील तेलुगू चित्रपटानं सर्वाधिक 85 कोटींचं कलेक्शन केलं.
- या चित्रपटानं हिंदीमध्ये 67 कोटी रुपये, तामिळमध्ये 7 कोटी रुपये, कन्नडमध्ये 1 कोटी रुपये आणि मल्याळममध्ये 5 कोटी रुपयांची कमाई केली.
- यासह पुष्पा 2 नं पहिल्या दिवशी 175.1 कोटींची कमाई केली आहे. (यामध्ये चित्रपटाच्या तेलुगु पेड रिव्ह्यूचा डेटा देखील समाविष्ट आहे)
- हे प्राथमिक आकडे असले तरी अधिकृत डेटा आल्यानंतर त्यात थोडे बदल होऊ शकतात.
'पुष्पा 2' ठरला हाईएस्ट ओपनर
'पुष्पा 2' नं शाहरुख खानच्या पठाण (57 कोटी) आणि जवान (75 कोटी), प्रभासच्या कल्की 2898 एडी (95 कोटी), यशच्या KGF 2 (116 कोटी), रणबीर कपूरचा अॅनिमल (63.80 कोटी), ज्युनियर एनटीआर आणि रामचरणच्या RRR (163 कोटी), बाहुबली 2 (121 कोटी) यासह सर्व चित्रपटांचं ओपनिंग डे कलेक्शन धुळीस मिसळलं आणि यासोबतच हा चित्रपट आतापर्यंतचा सर्वात मोठा ओपनर ठरला आहे.
पहिल्याच विकेंडला 250 कोटींचा आकडा पार करणार 'पुष्पा 2'
'पुष्पा 2'ची क्रेझ प्रेक्षकांच्या डोक्यावर जणू भूत बनून बसली आहे. या चित्रपटानं पहिल्याच दिवशी 170 कोटींहून अधिक कमाई करून इतिहास रचला आहे. वीकेंडला चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ओपनिंग वीकेंडला हा चित्रपट 250 कोटींचा टप्पा पार करेल आणि आणखी एक नवा बेंचमार्क सेट प्रस्थापित करेल अशी अपेक्षा आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :