Priyanka Barve :अदिती राव हैदरला पसंती ते पण प्रियांका बर्वेची विना ऑडिशन निवड, नकारही दिला तरी कशी मिळाली 'मुघल-ए-आझम'ची अनारकली?
Priyanka Barve : गायिका प्रियांका बर्वे ही तिच्या मुघल-ए-आझम या नाटकामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. तिने तिच्या या नाटकाचा अनुभव सांगितला आहे.
Priyanka Barve : जवळपास 63 वर्षांपूर्वी भारतीय सिनेसृष्टीतमध्ये एक कलाकृती सादर करण्यात आली आणि ती अजरामर झाली. अगदी हल्लीच्या काळातही या कलाकृतीची गाणी, ती गोष्ट प्रेक्षकांना तितकीच भावते. ती अजरामर कलाकृती म्हणजे मुघल-ए-आझम हा सिनेमा. या सिनेमाचे दिग्दर्शन के आसिफ यांनी केलं होतं. त्याचप्रमाणे या चित्रपटात दिलीप कुमारसोबत पृथ्वीराज कपूर, मधुबाला आणि दुर्गा खोटे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. ही अजरामर कलाकृती सध्या रंगभूमीवरही तिची छाप सोडतेय. विशेष म्हणजे या कलाकृतीमध्ये मराठमोळी गायिका प्रियांका बर्वे (Priyanaka Barve) ही अनारकलीच्या भूमिकेत आहे.
'मुघल-ए-आझम : द म्युझिकल' हे नाटक सध्या भारतातच नव्हे तर जगभरातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. यामध्ये मराठमोळी गायिका प्रियांका बर्वे महत्त्वाच्या भूमिकेत आहे. तिने नुकतच सौमित्र पोटे यांच्या मित्रम्हणे या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये याविषयीचा अनुभव सांगितला आहे. विशेष म्हणजे प्रियांकाची या भूमिकेसाठी ही निवड कोणत्याही प्रकारची ऑडीशन न घेता झाली होती.
'मी सुरुवातीला नाही म्हटलं होतं'
प्रियांकाने तिचा अनुभव सांगाताना म्हटलं की, 'जेव्हा माझ्याकडे मुघल ए आझमसारखी संधी आली तेव्हा मी सुरुवातीला त्यांना नाही असं सांगितलं. मुकेश छाब्रिया यांनी यासाठी कास्टिंग केलं होतं. यासाठी अदिती राव हैदरीचं ऑडिशन झालं होतं, कारण तिला त्यावेळी थोडं गाणं येत होतं, दिसायलाही ती सुंदर आहे. पण तेव्हा फिरोझ सर म्हणाले की आपल्याला यासाठी सिंगरच हवी आहे, जी दिसायला सुंदर आहे, उत्तम अभिनय करु शकते. त्यामुळे मी एकमेव अशी आहे की, जिची ऑडिशन नाही झाली.बाकी सगळ्यांची ऑडीशन घेऊन ते या नाटकात आलेले आहेत. त्यांना संजय डावरा यांनी सांगितलं की अशी अशी पुण्यातली मुलगी आहे, जी संगीत नाटकं करते. उत्तम गाते, दिसते सुंदर. मग त्यांनी माझे युट्युबर काही व्हिडिओ बघितले तेव्हाचे जे काही होते ते.मग त्यांनी मला बोलावलं. तेव्हा ते मला म्हणले की मी तुझा ऑलरेडी फॅन झालोय, इतकी छान तू गातेस तर तुला हे करायला आवडेल का?'
अनारकलीच्या भूमिकेसाठी विचारणा
'मला त्याचं दडपण आलं होतं. म्हणजे असं झालं की, कोण आहेत ही लोकं, कोण आहेत हे कलाकार, काय करणार आहेत, सहा महिन्यांची कमिटमेंट त्यांनी मागितली होती.तेव्हा माझा अमेरिकेचा दौरा ठरला होता. मी त्यांना सांगितलं की तुम्हाला कळवते,पण मी त्यांना काही सांगितलच नाही. मग संजयचा मला फोन आला की, प्रियांका वेडी आहेस का, अनारकलीच्या भूमिकेसाठी तुला विचारत आहेत, मुख्य भूमिका असणार आहे. नॅशनल लेवलचं हे नाटक होणार आहे, त्यामुळे तू विचार कर. मला फिरोझ सरांचा पुन्हा फोन आला की, तू काही विचार केलास का? त्यांनी मला परत भेटायला बोलावलं. मी माझ्या नवऱ्यालाही हे सांगून निघाले होते की, जाऊन भेटते आणि नाही म्हणून येते', असं प्रियांकाने सांगितलं.
आयुष्यात एकदाच येणारी ही संधी - प्रियांका बर्वे
पुढे प्रियांकाने म्हटलं की, 'त्यानंतर मी जेव्हा तिकडे गेले, तिथे मला त्यांनी कल्पना दिली की हे नक्की काय आहे. मग माझ्या लक्षात आलं की ह्याच तर संधीची मी वाट पाहत होते. सगळं जुळूनही आलं होतं. तेव्हा कळालं की ही आयुष्यात एकदाच येणारी ही संधी आहे. मी हो म्हटलं आणि त्यांनी मला हातात स्क्रिप्ट दिली. ते म्हणाले की वाचून दाखव किंवा घरी जाऊन आरामत वाच आणि मला करुन दाखव. मी ते बघितलं तिथे अनारकलीच्या एक एक ओळी होत्या फक्त. मला असं झालं की अरे हे तर काय सोप्पंय.पण मी जेव्हा ते वाचायला गेले तेव्हा ते पूर्ण उर्दू होतं. मग मी घरी जाऊन ते वाचलं आणि त्यांना ते करुन दाखवलं.'