एक्स्प्लोर

Boney Kapoor : अक्षय कुमारवर मात करत नोएडा फिल्म सिटीसाठी बोली बोनी कपूर यांनी जिंकली, 230 एकरमध्ये तयार होणार भव्य फिल्मसिटी

Boney Kapoor :  बोनी कपूर यांनी नोएडा फिल्म सिटीसाठीची बोली जिंकली असून बोनी कपूर आता या ठिकणी फिल्म सिटी उभारणार आहेत. 

Boney Kapoor :  चित्रपट निर्माते बोनी कपूर (Boney Kapoor) यांच्या नेतृत्वाखाली ग्रेटर नोएडामध्ये फिल्म सिटी बनवण्याची तयारी आता जोरात सुरू होणार आहे. बोनी कपूरच्या कन्सोर्टियमने यमुना एक्स्प्रेस वेवर 230 एकरमध्ये पसरलेल्या फिल्म सिटीचे संचालन करण्याचा परवाना जिंकला आहे. नोएडा फिल्म सिटीच्या बांधकामासाठी अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि निर्माता भूषण कुमार यांना बोनी कपूर यांनी मागे टाकले. या फिल्म सिटीच्या बांधकामासाठी बोनी कपूरच्या कन्सोर्टियम, बेबू प्रोजेक्ट्स एलएलपीने अक्षय कुमार आणि केसी बोकाडिया यांच्या कंपनीपेक्षा जास्त बोली लावून टेंडर जिंकले होते. 

फिल्म सिटी यमुना एक्सप्रेसवेच्या बाजूने 230 एकरमध्ये पसरलेली आहे.  त्यातच आता हे स्पष्ट झाले आहे की, यमुना एक्सप्रेसवे औद्योगिक विकास प्राधिकरणाच्या अखत्यारीत येणारी ही फिल्म सिटी पुढील 99 वर्षे बोनी कपूर यांच्या कंपनीद्वारे चालविली जाईल. टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, फिल्म सिटीमध्ये एक फिल्म युनिव्हर्सिटी, सिनेमा म्युझियम आणि हेलिपॅड यासह इतर सुविधा असतील. नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, ही फिल्म सिटी आगामी नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अवघ्या 6 किमी अंतरावर आहे.

या कंपन्यांनी जूनमध्ये दिले होते टेंडर

सुपर कॅसेट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड (टी-सीरीज), सुपरसोनिक टेक्नोबिल्ड प्रायव्हेट लिमिटेड (दिनेश विजनची मॅडॉक फिल्म्स, अक्षय कुमारची केप ऑफ गुड फिल्म्स एलएलपी, आणि इतर), बेव्यू प्रोजेक्ट्स एलएलपी (बोनी कपूर, रिअल इस्टेट कंपनी भुतानी ग्रुप आणि नोएडा सायबर पार्क) , आणि 4 Lions Films Pvt Ltd (चित्रपट निर्माते के.सी. बोकाडिया आणि इतरांच्या पाठिंब्याने) यांनी ग्रीनफिल्ड प्रकल्पासाठी त्यांचे सादरीकरण जूनमध्ये उत्तर प्रदेश सरकारच्या अधिकाऱ्यांना दिले होते.Bayview Projects LLP आता जमीन ताब्यात घेण्यासाठी यमुना एक्सप्रेसवे औद्योगिक विकास प्राधिकरणासोबत जूनमध्ये सवलत करारावर स्वाक्षरी करेल. करारावर स्वाक्षरी केल्यानंतर बांधकाम सुरू करण्यासाठी त्यांच्याकडे सहा महिन्यांचा कालावधी असेल.

अशी असणार फिल्म सिटी

येथे पसरलेल्या 230 एकरांपैकी 155 एकर जागा केवळ चित्रपट उद्योगासाठी राखीव आहे ठेवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 5 एकर व्यावसायिक विकासासाठी राखीव असणार आहे. या फिल्मसिटीमध्ये सिनेमा म्युझियम, फिल्म युनिव्हर्सिटी आणि हेलिपॅड अशा इतर सुविधा असतील.

ही बातमी वाचा : 

Duniyadari Movie : ''तेरी मेरी यारी, पुन्हा पाहूया दुनियादारी', 11 वर्षांनी श्रेयस, मिनू, दिग्या सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Temperature Alert: नंदूरबार 40.8 अंशांना टेकलं, नाशकात उष्माघात कक्ष स्थापन, उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण, तुमच्या शहरात किती तापमान?
नंदूरबार 40.8 अंशांना टेकलं, नाशकात उष्माघात कक्ष स्थापन, उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण, तुमच्या शहरात किती तापमान?
Udayanraje Bhosale on Nitesh Rane : मी नॉनव्हेज खात नाही, ज्याला खायचं त्यांनी खावं; उदयनराजेंनी मंत्री नितेश राणेंनाही उघडं पाडलं
मी नॉनव्हेज खात नाही, ज्याला खायचं त्यांनी खावं; उदयनराजेंनी मंत्री नितेश राणेंनाही उघडं पाडलं
Video : माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही; जयंत पाटलांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
Video : माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही; जयंत पाटलांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
होलिकेच्या राखेचे आध्यात्मिक महत्त्व आणि श्रद्धा!
होलिकेच्या राखेचे आध्यात्मिक महत्त्व आणि श्रद्धा!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prashant Koratkar Court Update | प्रशांत कोरटकरला, कोल्हापूर सत्र न्यायालयाचा  दिलासा, प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नसल्याचं कोर्टाचं म्हणणंSantosh Deshmukh Wife Statement News | वाल्मिक अण्णा जिवंत सोडणार नाही असं विष्णू चाटे म्हणालेला, संतोष देशमुखांच्या पत्नीचा जबाबABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 12 March 2025 दुपारी ३ च्या हेडलाईन्सFadnavis vs Danve : शक्तिपीठ महामार्गाची गरज काय? देवेंद्र फडणवीसांनी समजावून सांगितलं!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Temperature Alert: नंदूरबार 40.8 अंशांना टेकलं, नाशकात उष्माघात कक्ष स्थापन, उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण, तुमच्या शहरात किती तापमान?
नंदूरबार 40.8 अंशांना टेकलं, नाशकात उष्माघात कक्ष स्थापन, उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण, तुमच्या शहरात किती तापमान?
Udayanraje Bhosale on Nitesh Rane : मी नॉनव्हेज खात नाही, ज्याला खायचं त्यांनी खावं; उदयनराजेंनी मंत्री नितेश राणेंनाही उघडं पाडलं
मी नॉनव्हेज खात नाही, ज्याला खायचं त्यांनी खावं; उदयनराजेंनी मंत्री नितेश राणेंनाही उघडं पाडलं
Video : माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही; जयंत पाटलांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
Video : माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही; जयंत पाटलांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
होलिकेच्या राखेचे आध्यात्मिक महत्त्व आणि श्रद्धा!
होलिकेच्या राखेचे आध्यात्मिक महत्त्व आणि श्रद्धा!
Shaktipeeth Expressway : मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असेल पण, शक्तिपीठ नकोच, बंटी पाटलांची आग्रही भूमिका, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असेल पण, शक्तिपीठ नकोच, बंटी पाटलांची आग्रही भूमिका, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
स्टॉक मार्केटच्या घसरण्यामागील 3 प्रमुख कारणे
स्टॉक मार्केटच्या घसरण्यामागील 3 प्रमुख कारणे
मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असेल पण, शक्तिपीठ नकोच, बंटी पाटलांची आग्रही भूमिका, फडणवीस म्हणाले...
मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असेल पण, शक्तिपीठ नकोच, बंटी पाटलांची आग्रही भूमिका, फडणवीस म्हणाले...
समृद्धी महामार्गानं गेलं की बायको घरी वाट बघते...एवढा बोगस रस्ता, वडेट्टीवारांचा हल्लाबोल, शक्तिपीठ महामार्गाला विरोध 
समृद्धी महामार्गानं गेलं की बायको घरी वाट बघते...एवढा बोगस रस्ता, वडेट्टीवारांचा हल्लाबोल, शक्तिपीठ महामार्गाला विरोध 
Embed widget