Priyadarshini Indalkar : 'त्या' दहशतवादी कृत्याचा तीव्र निषेध; महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रियदर्शिनी इंदलकर भडकली
Pune : पुणे विद्यापीठातील (Pune University) ललित कला केंद्राकडून (Lalit Kala Kendra) काही दिवसांपूर्वी 'जब वी मेट' हे नाटक सादर करण्यात आले होते. या नाटकावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) आक्षेप घेत बंद असलेल्या ललित कला केंद्राची तोडफोड केली.
Pune : पुणे विद्यापीठातील (Pune University) ललित कला केंद्राकडून (Lalit Kala Kendra) काही दिवसांपूर्वी 'जब वी मेट' हे नाटक सादर करण्यात आले होते. या नाटकावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) आक्षेप घेत बंद असलेल्या ललित कला केंद्राची तोडफोड केली. यावर आता महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर (Priyadarshini Indalkar) चांगलीच भडकली आहे. इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून तिने या प्रकारवर प्रतिक्रिया दिला आहे.
काय म्हणाली प्रियदर्शनी?
अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर हिने इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून या प्रकारावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून तिने अभाविपच्या कृत्याचा निषेध केलाय. "ललित कला केंद्र, पुणे येथील विद्यार्थी कलावंतांवर हल्ला करुन नाटक बंद पाडणाऱ्या दहशतवादी कृत्याचा तीव्र निषेध.."अशी प्रतिक्रिया प्रियदर्शनी इंदलकर हिने व्यक्त केली आहे. तिची ही इन्स्टाग्राम स्टोरी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
ललित कला केंद्राचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील हे केंद्र आहे. या कला केंद्रात विद्यार्थ्यांकडून 'जब वी मेट' हे नाटक सादर करण्यात आले होते. अभाविपने या नाटकावर आक्षेप घेतला. त्यानंतर पोलिसांनी ललित कला केंद्राचे प्रमुख प्रवीण भोळे यांच्यासह 6 जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर या 6 जणांना न्यायालयात हजरही करण्यात आले होते.
प्रवीण भोळे यांच्यासह 6 जणांना न्यायालयीन कोठडी
पोलीस कोठडी सुनावण्याची मागणी करण्यात येत असतानाच आरोपींना न्यायालयाने न्यायलयीन कोठडी सुनावली. त्यानंतर पुणे ललित कला केंद्रामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून तोडफोड करण्यात आली होती. बंद असलेल्या कला केंद्राच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. शिवाय यावेळी शाई देखील फेकण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी अभाविपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलय.
कोण आहे प्रियदर्शनी?
अभिनेत्री प्रियदर्शनी इदलकर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी शोमधून लोकप्रिय झाली. वेगवेगळ्या भूमिका साकरत तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली. तिला सावित्रीची लेक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. प्रियदर्शनी मूळची पुण्याची आहे. तिने इटीव्ही मराठीवरिल अफलातून लिटिल मास्टर्स या शोमधून पदार्पण केले होते.
View this post on Instagram
इतर महत्वाच्या बातम्या