Single : दोन ‘सिंगल’ मिळून करणार सुपर धमाल! प्रथमेश परब-अभिनय बेर्डेच्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात
Single Marathi Movie : प्रथमेश परब, अभिनय बेर्डे, प्राजक्ता गायकवाड, अमोल कागणे 'सिंगल' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार असून, इतर कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.

Single Marathi Movie : अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) आणि अभिनय बेर्डेची (Abhinay Berde) जोडी पहिल्यांदाच एका धमाकेदार चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या जोडीसह प्राजक्ताही आगळ्या वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. आजवर प्रथमेशच्या सर्वच चित्रपटांना प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरले तर अभिनयच्या चित्रपटालाही प्रेक्षकांनी विशेष पसंती दर्शविली. एकत्र कधीही काम न केलेली ही तरुण कलाकारांची टीम उत्कंटावर्धक चित्रपटातून लवकरच समोर येणार आहे. 'सिंगल' (Single)असे चित्रपटाचे नाव असून प्रथमेश, अभिनय आणि प्राजक्ता गायकवाड या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहेत. नुकतेच निर्माते किरण कुमावत आणि हर्षवर्धन गायकवाड यांच्या ‘सिंगल’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करण्यात आले आहे.
चित्रपटाचे चित्रीकरण सुरू केले असून, याबाबत बोलताना ते म्हणाले की, ‘या चित्रपटाची उत्सुकता मला देखील लागून राहिली होती, नुकतीच चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात केली असून, हा कॉमेडी चित्रपट लवकरच प्रेक्षकांना हसवण्यास सज्ज होणार आहे.’
प्रथमेश परब, अभिनय बेर्डे, प्राजक्ता गायकवाड, अमोल कागणे 'सिंगल' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार असून, इतर कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. या चित्रपटाचा जॉनर कॉमेडी असल्याचे समोर आले असून, चित्रपटाची कथा ही महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुण मुलांच्या जीवनावर आधारली आहे.
आताची तरुण पिढी आणि त्यांचे विश्व याची धमाल मस्ती या चित्रपटात प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यास लवकरच सज्ज होत आहे. दिग्दर्शक चेतन चवडा, सागर पाठक दिग्दर्शित हा चित्रपट निर्माते किरण कुमावत, हर्षवर्धन गायकवाड, अमोल लक्ष्मण कागणे, गौरी सागर पाठक आणि सह-निर्माते सुमित कदम निर्मित असून हास्यकल्लोळ सादर करण्यास ते सज्ज झाले आहेत. प्रथमेश आणि अभिनय, प्राजक्ता, अमोल व्यतिरिक्त या चित्रपटात आणखी कोणते कलाकार कल्ला करणार हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.
हेही वाचा :
- Aditya Narayan : आदित्य नारायण बनला ‘बाबा’, पत्नी श्वेताने दिला मुलीला जन्म!
- Shanaya Kapoor : बॉलिवूड पदार्पणाआधीच बनलीये स्टार, कोण आहे शनाया कपूर? जाणून घ्या...
- Kiran Mane : मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा देणाऱ्या ‘अप्सरे’वर किरण माने कडाडले! नेमकं प्रकरण काय?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
