एक्स्प्लोर

Maajhi Bay Go : 'माझी बायगो'ने केली रसिकांवर जादू, गाण्याने पार केला 100 मिलीयन व्ह्यूजचा टप्पा!

Maajhi Bay Go Song : प्रशांत नाकतीच्या (Prashant Nakti) 'माझी बायगो' (Maajhi Bay Go) या गाण्याने तब्बल 100 मिलीयन व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे.

Maajhi Bay Go : संगीत विश्वात 'मिलीनीयर' म्हणून ओळख असणाऱ्या संगीतकार प्रशांत नाकतीच्या (Prashant Nakti) 'माझी बायगो' (Maajhi Bay Go) या गाण्याने तब्बल 100 मिलीयन व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे मराठी इंडस्ट्रीत या गाण्याची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. नुकतचं 'नादखुळा म्युझिक' प्रस्तुत 'आपलीच हवा' गाणं देखील प्रदर्शित झालं आहे. याआधी 'नादखुळा म्युझिक' लेबलच्या 'आपली यारी' गाण्याला अवघ्या 12 तासांमध्येच दशलक्ष व्ह्यूज मिळाले होते.

आपल्या वेगवेगळ्या गाण्यांनी तरूणाईला मोहात पाडणाऱ्या प्रशांतने अगदी कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. ‘माझी बायगो’ या गाण्याचे गीत-संगीत प्रशांत नाकतीने केले असून, गायिका सोनाली सोनावणे आणि गायक केवल वाळंज यांच्या सुरेल आवाजामुळे हे गाणं लोकांच्या पसंतीस पडलं. या प्रेमगीतामध्ये निक शिंदे आणि श्रद्धा पवार हे कलाकार आहेत.

प्रेक्षकांचा खूप मोठा वाटा!

संगीतकार प्रशांत नाकती 'माझी बायगो' गाण्याच्या घवघवीत यशाविषयी बोलताना सांगतो की, ‘100 मिलीयन हा आकडा खूप मोठा आहे. मराठीमध्ये हातावर मोजण्या इतकीच गाणी आहेत, ज्यांना इतके व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्यामागे माझ्यासोबत, गायक, कलाकार व संपूर्ण टीमची खूप मेहनत आहे. तसेच 100 मिलीयन होण्यामागे प्रेक्षकांचा खूप मोठा वाटा आहे. प्रेक्षकांचे मी मनापासून आभार मानतो की, त्यांनी या गाण्याला भरभरून प्रेम दिलं. आणि 100 मिलीयन त्यांच्याशिवाय होणं शक्यचं नव्हतं. असचं प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळो हीच सदिच्छा!’

खूप भारी वाटतं!

पुढे तो सांगतो की, ‘खूप आनंद वाटतो आहे की, हे आमचं पहिलचं गाणं आहे ज्या गाण्याने एका वर्षात 100  मिलीयन व्ह्यूजचा आकडा पार केला. हे गाणं 2021चं नंबर वन गाणं होतं. 2021मध्ये रिलीज झालेल्या सिनेमातील किंवा अल्बमधील गाण्यांमध्ये हे एकमेव गाणं आहे, ज्या गाण्याला 100 मिलीयन मिळाले आहेत. तसेच, सगळ्यात जास्त लाईक्स देखील माझी बायगो गाण्याला आहेत. हे गाणं जेव्हा रिलीज झालं, तेव्हा युट्यूबवर हे नंबर वन गाणं म्हणून ट्रेंड झालं होतं. तो क्षण खूप भारी असतो जेव्हा आपण बनवलेलं मराठी गाणं नंबर वन म्हणून ट्रेंड होतं. इंस्टाग्राम या सोशल मीडिया अॅपवर रील्स हे फिचर आलं, तेव्हा 1 लाख रिल्स या गाण्यावर बनवले होते. या गाण्याने आम्हाला खूप आठवणींसोबतच, अनेक रेकॉर्ड दिलेले आहेत. गेल्यावर्षी मार्चमध्येच हे गाणं रिलीज केलं होतं. एक वर्ष उलटूनही या गाण्याला मिळणारा प्रतिसाद पाहून माझा आनंद गगनात मावत नाही आहे.’

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 जुलै 2024 : ABP MajhaTOP 25 : दिवसभरातील टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 02 July 2024 : ABP MajhaRahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं?Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
Embed widget