एक्स्प्लोर

Prasad Vedpathak White Line Controversy: इकडे भाजप नगरसेवकानं पोलिसांत तक्रार केली, तिकडे प्रसाद वेदपाठक मनसेच्या सर्वात डॅशिंग नेत्याला जाऊन भेटला, जैनांच्या पांढऱ्या पट्टीचा वाद आता राजकीय आखाड्यात?

Prasad Vedpathak White Line Controversy: भाजप नगरसेवकानं प्रसाद वेदपाठक विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केलीय, अशातच आता प्रसाद वेदपाठकनं मनसेच्या सर्वात डॅशिंग नेत्याची भेट घेतली.

Prasad Vedpathak White Line Controversy: घाटकोपरमधल्या (Ghatkoper) सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर (Social Media Influencer) आणि युट्यूबर असलेल्या प्रसाद वेदपाठकच्या (Prasad Vedpathak) राहत्या सोसायटीत जैन साध्वींसाठी पांढरी पट्टी (Prasad Vedpathak White Line Row) काढण्यात आली. याच पट्टीवरुन प्रसाद वेदपाठक (Influencer Prasad Vedpathak) यानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत जाब विचारलेला. तसेच, स्वतःसोबत आपली पत्नी आणि आईच्या धार्मिक भावना दुखावल्याचा दावाही त्यानं केलेला. प्रसादचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि हे प्रकरण चर्चेत आलं. त्यानंतर बऱ्याच मतमतांतरानंतर सोसायटीतील ज्या जैन कुटुंबानं (Jain Family) पांढरी पट्टी काढलेली, ती पट्टी हटवण्यात आली. त्यानंतर मनसेनं हा मुद्दा लावून धरलेला. तसेच, काही दिवसांपूर्वी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक ट्वीट केलेलं. ते म्हणालेले की, "पांढरी पटी मारून सांस्कृतिक दहशतवाद  परसवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची या पुढे तोंड काळी करण्यात येतील..."

अशातच आता प्रसाद वेदपाठक यानं मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. तसेच,  मनसे नेते अविनाश जाधव, मनसे नेते संदीप देशपांडे यांचे आभार मानले आहेत. 

प्रसाद वेदपाठककडून सोशल मीडियावर अविनाश जाधव यांच्यासोबतचा फोटो शेअर (Prasad Vedpathak Share Photo With Avinash Vedpathak)

प्रसाद वेदपाठक यानं सोशल मीडियावर मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. प्रसाद वेदपाठक यानं अविनाश जाधव यांची भेट घेतली असून सोसायटीतील पांढऱ्या पट्टीच्या मुद्द्यावर दिलेल्या पाठिंब्यांसाठी आभार मानले आहेत. 

प्रसाद वेदपाठक यानं सोशल मीडियावर अविनाश जाधव यांच्यासोबतचा एक फोटो पोस्ट करत लिहिलंय की, "मनःपूर्वक धन्यवाद तुमच्या प्रेमासाठी आणि खंबीर पाठिंब्यासाठी. सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे, तुम्ही आम्हाला प्रेमाने 'पंछा' म्हणून हाक मारलीत, तसेच MNS Adhikrut आणि Sandeep Deshpande साहेब, तुमच्या पाठिंब्यासाठी आणि शुभेच्छांसाठी मनापासून आभार..."

प्रसाद वेदपाठकच्या सोसायटीतला पांढऱ्या पट्टीचा वाद नेमका काय? (Prasad Vedpathak White Line Controversy)

प्रसाद वेदपाठक याच्या सोसायटीत काही जैन समाजातील लोकांनी ही पांढऱ्या रंगाची पट्टी मारलेली. यावर प्रसाद वेदपाठक यानं प्रश्न उपस्थित करत आपल्या धार्मिक भावना दुखावल्याचं म्हटलं होतं. तसेच, आपल्या सोसायटीच्या आवारात अशी पांढरी पट्टी मारण्यात आली, त्यावेळी आपली परवानगी कुणीच घेतलेली नाही, असा दावाही प्रसाद वेदपाठक यानं केलेला. प्रसाद वेदपाठक यानं दिलेल्या माहितीनुसार, जैन धर्मगुरूंसाठी ही पट्टी मारण्यात आलेली. धार्मिक मान्यता पाळायच्या असतील तर त्या घरी पाळाव्यात सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारच्या कृत्यावर प्रसादनं आक्षेप नोंदवलेला. तसेच, हा धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, त्यामळे ही पट्टी लवकरात लवकर हटवावी, अशी मागणीही प्रसाद वेदपाठक यानं केलेली. त्यानंतर आता त्या पांढऱ्या पट्टीवर रंगकाम करून पट्टी हटवण्यात आल्याचंही प्रसाद वेदपाठकनं व्हिडीओ शेअर करुन सांगितलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

BJP Corporator Pravin Chheda On Prasad Vedpathak: बिल्डिंगमधील जैनांशी पंगा, पांढरी पट्टी हटवणं प्रसाद वेदपाठकला महागात पडलं; आधी इन्स्टा अकाऊंट सस्पेंड आता भाजप नगरसेवकांनी घेरलं, म्हणाले, 'हिंदूविरोधी...'

ABP Majha च्या बातम्या LIVE :

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Advertisement

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget