प्रसाद ओक लवकरच होणार सासरेबुवा; मोठ्या लेकाचा पार पडला साखरपुडा, मंजिरीची होणारी सून कोण?
Marathi Actor Prasad Oaks Elder Son Sarthak Engaged: प्रसाद ओक यांचा मोठा मुलगा सार्थक ओक याचा साखरपुडा पार पडला आहे.

Marathi Actor Prasad Oaks Elder Son Sarthak Engaged: सध्या सर्वत्र लगीनघाई सुरू आहे. अनेक घरांमध्ये लग्नसाठीची लगबग पाहायला मिळत आहे. बोहल्यावर चढण्यापूर्वी काही ठिकाणी साखरपुड्याचे कार्यक्रम होताना दिसत आहे. मराठी इंडस्ट्रीतील कलाकार प्रसाद ओक यांच्याही घरी लवकरच सनईचौघडे वाजणार आहे. कारण अभिनेता, निर्माते आणि दिग्दर्शक प्रसाद ओक यांचे चिरंजीव लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. प्रसाद ओक आणि मंजिरी ओक यांचा मोठा मुलगा सार्थक लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. काल 19 जानेवारी रोजी सार्थकचा साखरपुडा पार पडला. या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या फोटोंवर सेलिब्रिटी तसेच चाहत्यांनी कमेंट करून शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रसाद आणि मंजिरी ओक या दोघांचा मोठा मुलगा सार्थक ओक लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. कालच त्याचा थाटामाटात साखरपुडा झाला. मात्र, प्रसाद ओक यांची होणारी होणारी सून कोण? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोस्टमध्ये संपूर्ण ओक फॅमिली एकत्र दिसत आहे. सगळे एकाच फ्रेममध्ये खूप आनंदात दिसत आहेत. साखरपुड्याच्या खास प्रसंगी सार्थकने फिकट पिस्ता रंगाची सफारी सूट परिधान केली आहे. तर, त्याच्या होणाऱ्या पत्नीने फिकट गुलाबी रंगाचा घागरा परिधान केला आहे. दोघेही एकत्र खूप सुरेख दिसत आहेत.
तर, होणारे सासू - सासरे अर्थात प्रसाद ओक आणि मंजिरी ओक देखील फार सुरेख दिसत आहेत. प्रसादने फिकट हिरव्या रंगाचा कुर्ता घातला आहे. तर, मंजिरीने निळ्या रंगाची साडी नेसली आहे. दोघांची जोडी खूप सुंदर दिसत आहे. तर, प्रसाद ओक यांच्या धाकट्या मुलानं हिरव्या रंगाची शेरवानी घातली आहे. सगळे एकत्र खूप आनंदात दिसत आहे. प्रसाद ओक यांच्या मुलाच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला अनेक मराठी सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
अभिनेत्री अमृता खानविलकर देखील उपस्थित होती. तिनं तिचे फोटो शेअर केले आहेत. तिनं या फोटोतून साखरपुड्यातील खास लूक शेअर केला आहे. तसेच अभिनेता समीर चौघुलेला देखील आमंत्रण होतं. त्यानं देखील साखरपुड्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. दरम्यान, सार्थकचं नेमकं कधी लग्न होणार? याची तारीख अद्याप समोर आलेली नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
'फक्त बेडवर पुरुष हवा, पण लग्न…' तब्बूचं कथित विधान व्हायरल; अभिनेत्रीने खरंच असं म्हटलं का?
























