मेहेंदी है रचने वाली...'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडच्या ब्रायडल मेहेंदीची एकच चर्चा, Video Viral
दोघांचं लग्न सोहळा पुण्यात पार पडणार असून त्यांच्या लग्न सोहळ्याला सिरे इंडस्ट्री आणि राजकीय क्षेत्रातले दिग्गज सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत.

Prajakta Gaikwad: सध्या मनोरंजनाच्या दुनियेत दिमाखदार लग्न सोहळ्यांची एकच चर्चा आहे. बिग बॉस मराठीचा पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण याचा लग्नसोहळा पार पडल्यानंतर आता मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) हिच्या लग्न सोहळ्याची चर्चा रंगलीय. नुकतेच तिच्या लग्नापूर्वीच्या विधींनी चाहत्यांचं लक्ष वेधलंय. तिच्या मेहेंदी सोहळ्याचे व्हिडिओ सध्या समोर येतायत. तिच्या लूकवर,लग्नाच्या तयारीवर चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणाऱ्या प्राजक्ताच्या होणाऱ्या नवऱ्याचं नावही शंभूराज आहे.
प्राजक्ता गायकवाड हिच्या लग्नाची गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. प्राजक्ताचा होणारा नवरा शंभूराज खुटवड हा उद्योगपती आणि पैलवान आहे. खुटवड कुटुंब पुण्यातलं असून राजकारणातही सक्रिय आहे. प्राजक्ता आणि शंभूराज यांचा साखरपुडा 7 ऑगस्ट 2025 रोजी थाटामाटात पार पडला होता.
प्राजक्ताच्या ब्रायडल मेहेंदीची एकच चर्चा
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सध्या तिच्या लग्नाच्या विधींमध्ये व्यस्त आहे. पण तिच्या लग्नापूर्वीच्या विधींनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. नुकताच तिच्या ब्रायडल मेहंदी सोहळ्याची चर्चा रंगली आहे. प्राजक्ताचे ब्रायडल मेहंदी सोहळा चाहत्यांसाठी आकर्षणाचा विषय ठरतोय. तिचा मेहंदी कलरचा लहंगा आणि तिच्या ब्रायडल मेहेंदी डिझाइन चाहत्यांना प्रचंड आवडतेय. मेहंदी कलरच्या लेहेंग्यात ती अतिशय सुंदर दिसतेय. विशेष म्हणजे तिच्या मेहंदीच्या कार्यक्रमात तिचा होणारा नवराही दिसतोय. त्यानंही ' प्राजक्ता का दुल्हा ' असं नाव मेहंदीत कोरलंय. दोघंही एकत्र गोड दिसतायत. प्राजक्ता अतिशय मिनिमल मेक-अप आणि ज्वेलरीत दिसतेय.
View this post on Instagram
कधी आहे लग्न?
प्राजक्ता आणि शंभुराजे यांचे लग्नात दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. 2 डिसेंबर मंगळवारी दुपारी 12 वाजून 24 मिनिटांनी प्राजक्ता लग्न गाठ बांधणार आहे. दोघांचं लग्न सोहळा पुण्यात पार पडणार असून त्यांच्या लग्न सोहळ्याला सिरे इंडस्ट्री आणि राजकीय क्षेत्रातले दिग्गज सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत.
सूरज चव्हाण- संजनाचा विवाह संपन्न
बिग बॉस सीजन 5 विजेता सुरज चव्हाण काल 29 नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकला. अतिशय थाटामाटात 'झापुक झुपुक' सुरज चव्हाणच्या (Suraj Chavhan) लग्नाचा बार उडाला. सुरजच्या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून एकच चर्चा आहे. त्याच्या लग्नातील हळद, मेहंदी, प्री-वेडिंग शूट ते अगदी वरातीपर्यंतचे फोटो चाहत्यांनी अक्षरशः उचलून धरले होते. घोड्यावर नवरदेव म्हणून लग्नमंडपात गुलीगत एन्ट्री घेतलेला सुरज गर्दीतून वाट काढत पुढे गेला. बोहल्यावर चढला आणि उपस्थित असंख्य जवळच्या लोकांनी जल्लोषात त्याचं लग्न लावलं.























