एक्स्प्लोर

प्राजक्ता गायकवाडची सोयरीक जुळली; फोटो पोस्ट करत आनंदाची बातमी केली शेअर, कुणासोबत साताजन्माची गाठ बांधणार?

सोशल मीडियावर फोटो शेअर करुन प्राजक्ता गायकवाडनं चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. प्राजक्तानं सोशल मीडियावर फोटो शेअर करताना कॅप्शन दिलंय की, "प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा…".

Prajakta Gaikwad Getting Married Soon: 'स्वराज्यरक्षक संभाजी' (Swarajyarakshak Sambhaji) मालिकेत महाराणी येसूबाईंची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Marathi Actress Prajakta Gaikwad) सध्या तिच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. प्राजक्तानं 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलेली. तेव्हापासून ती अवघ्या महाराष्ट्रात छत्रपतींची युवराज्ञी म्हणूनच ओळखली जाऊ लागली. ज्यावेळी विक्की कौशलचा 'छावा' सिनेमा रिलीज झाला, त्यावेळी त्यातल्या येसूबाईंची भूमिका साकारणाऱ्या रश्मिकाला पाहून सर्वांना प्राजक्ताचीच आठवण झाली, अक्षरशः दोघींची तुलना करुन प्राजक्ताच बरी, अशी प्रतिक्रियाही चाहत्यांनी दिलेली. अशातच आजही लाखो तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेल्या प्राजक्ता गायकवाडन आपल्या चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. 

काही दिवसांपूर्वी प्राजक्तानं तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केलेले. त्या फोटोंमध्ये पाहुण्यामंडळींच्या गराड्यात प्राजक्ता बसलेली दिसली. तसेच, प्राजक्तानं पारंपरिक साज केलेला. हे फोटो पाहून प्राजक्ताचं ठरलं, अशा चर्चा सोशल मीडियावर सुरू झालेल्या. चाहत्यांनी तिच्या फोटोंवर अभिनंदनाचा वर्षावही सुरू केला. पण, प्राजक्तानं मात्र यासंदर्भात कोणताही खुलासा केला नव्हता. अशातच आता प्राजक्तानं तिच्या ऑफिशिअल इन्स्टा अकाउंटवरुन फोटो पोस्ट केले आहेत. फोटो पोस्ट करुन प्राजक्तानं चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prajakta Gaikwad (@prajaktaa.gaikwad)

प्राजक्तानं पोस्ट करत दिली आनंदाची बातमी 

प्राजक्ता गायकवाडनं सोशल मीडियावर चार फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये प्राजक्ता हात जोडून उभी आहे. तिनं पारंपरिक साज केला आहे. तर, तिच्या कपाळावर हळदीकुंकू लावलेलं आहे. तर, तिच्या अवतीभवती खूप नातेवाईत आहेत. याशिवाय प्राजक्ताच्या गळ्यात मोठा हार घातला आहे. प्राजक्ताच्या फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधलं आहेच, पण त्याहीपेक्षा तिनं हे फोटो शेअर करताना दिलेलं कॅप्शन पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.  

प्राजक्तानं सोशल मीडियावर फोटो शेअर करताना कॅप्शन दिलंय की, "प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा…". त्यासोबतच तिनं एक हॅशटॅगही दिला आहे. #ठरलं... असं प्राजक्तानं पोस्टमध्ये लिहिलं आहे.  प्राजक्तानं लग्न ठरल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. प्राजक्तानं साताजन्माची गाठ कुणासोबत बांधायचं ठरवलं आहे, याबाबत मात्र अद्याप काही माहिती मिळालेली नाही. त्यामुळे प्राजक्तानं जोडीदार म्हणून कुणाची निवड केलीय? हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते अधीर झाले आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Aishwarya Narkar On Ashok Saraf: 'तेव्हा मी अगदीच नवखी होते, त्यावेळी त्यांनी कॅमेऱ्यासमोर...'; ऐश्वर्या नारकरांनी सांगितला अशोक सराफांसोबत काम करताना आलेला 'तो' अनुभव

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget