एक्स्प्लोर

Marathi Movie Updates : 'बाहुबली'च्या कालकेयची मराठीत एन्ट्री, अभिनेते प्रभाकर मराठी चित्रपटात झळकणार

Marathi Movie Aho Vikramaarka : 'कालकेय'च्या भूमिकेने प्रभाकर यांना नवी ओळख मिळाली. ही भूमिका साकारणारे अभिनेते प्रभाकर आता मराठी चित्रपटात दिसणार आहे.

Marathi Movie :  ‘बाहुबलीः द बिगिनिंग’ चित्रपटात प्रभास,  राणा दुग्गबती, अनुष्का शेट्टी, तमन्ना यांच्यासोबत खलनायक कालकेयची भूमिका चांगलीच गाजली होती. कालकेयच्या व्यक्तीरेखेने चित्रपटात आपली वेगळीच छाप सोडली होती. बाहुबली मध्ये धडकी भरवणाऱ्या कालकेयची भूमिका दाक्षिणात्य अभिनेता प्रभाकर यांनी साकारली होती.  या  'कालकेय'च्या भूमिकेने प्रभाकर यांना नवी ओळख मिळाली. ही भूमिका साकारणारे अभिनेते प्रभाकर  आता मराठी चित्रपटात दिसणार आहे.  आगामी 'अहो विक्रमार्का' या चित्रपटात प्रभाकर झळकणार आहे. 

देव गिल प्रॉडक्शन अंतर्गत ‘अहो विक्रमार्का’ हा चित्रपट मराठी व्यतिरिक्त इतर 5 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 30 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘अहो विक्रमार्का’ या अॅक्शनपटात अभिनेता प्रभाकर एका जबरदस्त भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ‘बेगाडा’ ही तगडी खलनायिका भूमिका साकारताना पहायला मिळणार आहे. 'अहो विक्रमार्का’ पहिला मराठी ब्लॉकबस्टर चित्रपट संपूर्ण भारतात 30 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. 

दिग्दर्शक राजामौली यांच्याबरोबर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेल्या त्रिकोटी पेटा दिग्दर्शित ‘अहो विक्रमार्का’ चित्रपटात इमोशन्स, सूडनाट्य, आणि ड्रामा असलेला ‘अहो विक्रमार्का’ जबरदस्त अॅक्शनपट  असणार आहे.  नायक खलनायकाची जुगलबंदी प्रेक्षकांसाठी नेहमीच मनोरंजक असते.आपल्या प्रभावी अदाकारीतून नायकाला जबर आव्हान देणारा खलनायक प्रेक्षकांनाही पहायला आवडतो. बलदंड  शरीरयष्टी, भारदस्त आवाजाच्या जोरावर भेदक नजर, आणि डायलॉग बोलण्याची अनोखी अदा या  जोरावर ‘बेगाडा’ हा खलनायक चित्रपटात जबरदस्त  रंग भरणार आहे. 

आरती देविंदर गिल, मिहिर कुलकर्णी आणि अश्विनी कुमार मिश्रा निर्मित या चित्रपटाची कथा पेनमेत्सा प्रसादवर्मा यांची आहे, तर संगीत रवी बसरूर आणि आर्को प्रावो मुखर्जी यांनी दिले आहे, छायांकन करम चावला आणि गुरु प्रसाद एन यांनी केले आहे आणि संकलन तम्मीराजू यांनी केले आहे.‘अहो विक्रमार्का' हा पहिला मराठी चित्रपट आहे, जो एकाच वेळी मराठी आणि तेलगु या दोन भाषेत चित्रित झाला आहे.

तेजस्विनी पंडितची महत्त्वाची भूमिका

अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) हिने आजवर वेगवेगळ्या भूमिकांमधून आपल्या अभिनयाचे सशक्त पैलू उलगडून दाखविले आहेत, प्रत्येक भूमिकेत स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारी तेजस्विनी आता दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही आपला ठसा उमटवण्यास सज्ज झाली आहे. तेजस्विनी आता ‘अहो विक्रमार्का’ या दाक्षिणात्य अॅक्शनपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात वीरांगणा 'भवानी' ही महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारत आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 19 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 10 PM 19 September 2024 : ABP MajhaAmit Thackeray Special Report : आणखी एक ठाकरे निवडणूक लढवणार? अमित ठाकरेंची जोरदार चर्चाBalasaheb Thorat on CM : मविआच्या सरकारमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री असेल, बाळासाहेब थोरातांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
Guru Vakri 2024 : अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Embed widget