एक्स्प्लोर

Parinirvana : "धगधगत्या अग्नितून नव्या युगाचा प्रारंभ..."; प्रसाद ओकने शेअर केलं आगामी 'परिनिर्वाण' सिनेमाचं मोशन पोस्टर

Parinirvana : 'परिनिर्वाण' हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Prasad Oak Marathi Movie Parinirvana : मराठमोळा अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) अनेक दर्जेदार मराठी सिनेमे घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता नुकतचं त्याच्या आगामी 'परिनिर्वाण' (Parinirvana) सिनेमाचं मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 'परिनिर्वाण' सिनेमाच्या पोस्टर लॉन्च सोहळ्याला प्रसाद ओकने पत्नी मंजिरी ओकसह हजेरी लावली होती. 

संपूर्ण विश्वाचा श्वास रोखून धरणारा ऐतिहासिक क्षण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीदिनास 'महापरिनिर्वाण दिन' असे म्हटले जाते. 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी त्यांचे निर्वाण झाले. त्यांच्या निधनाने सर्वांना मोठा धक्का बसला होता. संपूर्ण विश्वाचा श्वास रोखून धरणारा हा ऐतिहासिक क्षण या सिनेमात दाखवण्यात येणार आहे. 

'परिनिर्वाण'च्या मोशन पोस्टरमध्ये 'भारतीय संविधानाचे शिल्पकार, संस्थापक, बहिष्कृत हितकारिणी सभा, प्रत्येक प्रौढ नागरिकाला मतदान अधिकार, भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे जनक, हिंदू कोड बिल, राष्ट्रनिर्माते भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर अशा गोष्टी लिहिलेल्या दिसत आहेत. तसेच या पोस्टपमध्ये असेही लिहिण्यात आले आहे,"6 डिसेंबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निर्वाण झाले आणि त्याच दिवशी सत्य घटनेवर आधारित एका कलावंताच्या आयुष्याचं स्वप्न, प्रेम, त्याग, संघर्ष, दु:ख. जतन केला त्याने इतिहासाचा अमूल्या ठेवा... एक कॅमेरामन, 3000 फुटांची रीळ आणि लाखो लोकांसोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 'निर्वाण यात्रा'. चित्रीकरणाच्या उद्देशाने झपाटलेला एक अवलिया कलाकार नामदेव व्हटकर". 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by PRASAD OAK : प्रसाद ओक (@oakprasad)

प्रसाद ओकने 'परिनिर्वाण' या सिनेमाचं मोशन पोस्टर शेअर करत लिहिलं आहे,"धगधगत्या अग्नीतून नव्या युगाचा प्रारंभ आहे... अंत नसून हा आरंभ आहे...!!! 'परिनिर्वाण' लवकरच". त्याच्या या पोस्टवर जय भीम... अंत नसून आरंभ आहे, हा चित्रपट सर्व भाषांमध्ये दाखवावा, आतुरता, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. तसेच अनेक सेलिब्रिटींनीदेखील कमेंट्स करत प्रसादला शुभेच्छा दिल्या आहेत. 

'परिनिर्वाण'चं मोशन पोस्टर रिलीज झाल्यानंतर हा सिनेमा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यावर आधारित आहे की नामदेव व्हटकरांच्या? असा प्रश्न नेटकरी उपस्थित करत आहेत. या सिनेमात प्रसाद ओक आणि अंजली पाटील मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. शैलेंद्र बागडेने कथा, पटकथा लिहिण्यासोबत या सिनेमाचं दिग्दर्शनदेखील केलं आहे. तर सुनील शेळके या सिनेमाची निर्मिती करत आहेत. 

संबंधित बातम्या

CM Eknath Shinde: प्रसाद ओक ते मंगेश देसाई, 'या' कलाकारांनी मुख्यमंत्र्यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

महत्त्वाच्या बातम्या

Dipali Sayyed : तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
Maharashtra Epstein Files Swaroop sawant: रुपाली चाकणकरांनी धाडली नोटीस, 'महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स' च्या दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमच्यावर दड'पण'
रुपाली चाकणकरांनी धाडली नोटीस, 'महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स' च्या दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमच्यावर दड'पण'
Facebook Dindis New Devotional Song: विठुरायाच्या नामात शिवरायांचा जयघोष! फेसबुक दिंडीने रिलीज केलं वर्षातलं सर्वात खास गाणं, एकदा ऐकाल तर ऐकतच राहाल
विठुरायाच्या नामात शिवरायांचा जयघोष! फेसबुक दिंडीने रिलीज केलं वर्षातलं सर्वात खास गाणं, एकदा ऐकाल तर ऐकतच राहाल
Amitabh Bachchan On French Football Team: 'फ्रान्सचा संघ, 11 खेळाडू... 10 काळे... 1 गोरा?'; FIFAच्या संघावर अमिताभ बच्चन यांची वर्णद्वेषी टिप्पणी; उफाळला वाद, नेटकरी भडकले
'फ्रान्सचा संघ, 11 खेळाडू... 10 काळे... 1 गोरा?'; FIFAच्या संघावर अमिताभ बच्चन यांची वर्णद्वेषी टिप्पणी; उफाळला वाद, नेटकरी भडकले

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
Dipali Sayyed : तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
SIP Calculator: दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
Embed widget