Parineeti Chopra Announces Pregnancy: लग्नाच्या दोन वर्षांनी परिणीती-राघव चड्ढांकडे आनंदाची बातमी; गोळाबेरीज करुन शेअर केली गूड न्यूज
Parineeti Chopra Announces Pregnancy: परिणीतीनं गूड न्यूज शेअर केली आहे. लग्नाच्या दोन वर्षांनी राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा आता आई-बाबा होणार आहेत.

Parineeti Chopra Announces Pregnancy: बॉलिवूड (Bollywood News) अभिनेत्री परिणीती चोप्रानं (Bollywood Actress Parineeti Chopra) चाहत्यांसोबत गूड न्यूज शेअर केली आहे. अलिकडेच तिनं सोशल मीडियावर चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. लग्नाच्या दोन वर्षांनी राघव चड्ढा (Raghav Chadha) आणि परिणीती चोप्रा आता आई-बाबा होणार आहेत. यासंदर्बात परिणीतीनं सोशल मीडियावर एक क्युट पोस्ट शेअर केली आहे.
परिणीतीने इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये एक खास केक दिसत आहे. या केकवर चिमुकल्या पावलांच्या खुणा आहेत आणि त्यावर लिहिलंय की, "1+1=3'... अशा पद्धतीनं हटके पोस्ट शेअर करुन परिणीतीनं गूड न्यूज शेअर केली आहे. पोस्टमध्ये परिणीतीनं थेट गरोदरपणाबाबत कोणताही उल्लेख केलेला नाही. पण, तरीसुद्धा तिनं शेअर केलेल्या फोटोतून तिची गूड न्यूज चाहत्यांपर्यंत पोहोचली आहे.
परिणीतीनं तिच्या पोस्टसोबत एक व्हिडीओही पोस्ट शेअर केला आहे. ज्यामध्ये ती तिचा पती राघव चड्ढासोबत परदेशात फिरताना दिसतेय. दोघेही एकमेकांमध्ये पुरते हरवल्याचं पाहायला मिळत आहे. हात धरून चालताना दिसत आहेत. या पोस्टसोबत तिने कॅप्शन लिहिलंय की, "हमारी छोटी सी दुनिया रास्ते में है… बेहिसाब रूप से धन्य महसूस कर रही हूं...."
View this post on Instagram
चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
परिणीती आणि राघव यांनी त्यांच्या गरोदरपणाची घोषणा करताच, त्यांच्या चाहत्यांनी आणि अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये त्यांचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली. या आनंदाच्या बातमीसाठी जोडप्याचं अभिनंदन करताना सोनम कपूरने लिहिलंय की, "अभिनंदन डार्लिंग" तर अनन्या पांडेनं लिहिलंय की, "ओह... अभिनंदन परी" याशिवाय, इतर अनेक सेलिब्रिटींनी या जोडप्याचं अभिनंदन केलंय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























