Pankaj Tripathi : हॉटेलमध्ये काम, छोटे छोटे रोल; वासेपूरचा कुरेशी ते मिर्झापूरचा कालीन भैय्या; पंकज त्रिपाठीचा संघर्षमय प्रवास
Pankaj Tripathi : पंकज त्रिपाठी 4 ऑक्टोंबर 2004 मध्ये मुंबईत दाखल झाला. त्यापूर्वी त्याने एका समारंभात पुजाऱ्याचेही काम केले होते. मात्र, त्याने पुजारी म्हणून केवळ एक दिवसच काम केलं. त्यानंतर पंकज त्रिपाठी पटणा या शहरात पुन्हा मेडिकलचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी गेला.
Pankaj Tripathi : बॉलिवूडमध्ये आजवर अनेक अभिनेत्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. अनेक अभिनेते बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या जोरावर आपले वर्चस्व निर्माण करतात. आपली कारकिर्द सुखकर बनवतात. मात्र, शारुख खान, नवाजुद्दीन, पासून पंकज त्रिपाठीपर्यंतच्या अनेक अभिनेत्यांनी बॉलिवूडमध्ये कोणतीही पाश्वभूमी नसताना आपल्या कारकिर्दीत मोठं यश मिळवलं. पंकज त्रिपाठीने सुरुवातीला हॉटेलमध्ये काम केलं. छोटे-छोटे रोल केले. आज तो ओटीटीचा सर्वांत मोठा स्टार बनलाय. त्याच्या संघर्षमय प्रवासाबाबत जाणून घेऊयात...
हॉटेलमध्ये काम ते विद्यार्थ्यांचा नेता
पंकज त्रिपाठी 4 ऑक्टोंबर 2004 मध्ये मुंबईत दाखल झाला. त्यापूर्वी त्याने एका समारंभात पुजाऱ्याचेही काम केले होते. मात्र, त्याने पुजारी म्हणून केवळ एक दिवसच काम केलं. त्यानंतर पंकज त्रिपाठी पटणा या शहरात पुन्हा मेडिकलचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी गेला. मात्र, तेथे जाऊन विद्यार्थ्यांचा नेता झाला. त्यानंतर त्रिपाठीने तेथेच एका हॉटेलात काम सुरु केलं. तिथे त्याने वेगवेगळे भारतीय पदार्थ बनवण्यात सुरुवात केली आणि शिकतही राहिला. 2004 मध्ये पंकजने पहिल्या हिंदी सिनेमात काम केलं होतं. अभिषेक बच्चनची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमात पंकज त्रिपाठी छोटा रोल केला होता. या सिनेमाचे पंकजला क्रेडिट देखील मिळाले नव्हते. विजय राज सोबत पंकज अनेक वर्षे काम करत होता
कोणतीही पार्श्वभूमी नसताना बॉलिवूडमध्ये मोठे यश
पंकज त्रिपाठी पटना, दिल्ली, मुंबई आणि गुजरात असे अनेक राज्य फिरत राहिला. मात्र त्याच गाव बिहारमधील बेसलंड हे आहे. पंकजचे गाव बिहारच्या एका नदीकाठी आहे. तिथेच तो लहानाचा मोठा झाला. स्वप्ने पाहू लागला. तिथले अनेक किस्से तो आजही सांगत असतो. कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या पंकजने आज बॉलिवूडमध्ये मोठं काम केलंय. गरिश वानखेडे सांगतात,"छोटे छोटे रोल करत पंकज त्रिपाठीने एक वेगळे विश्व निर्माणे केले. फुकरेच्या यशामागेही पंकज त्रिपाठीचा मोठा हात आहे. ओएमजी 2 लाही पंकज त्रिपाठीच्या योगदानामुळे मोठं यश मिळालय.
नॅशनल अवॉर्डही केला नावावर
पंकज त्रिपाठीने नॅशनल स्कुल ऑफ ड्रामामध्ये अभिनयाचे शिक्षण घेतले. अभिनेता बॉक्स ऑफिस सोबतचं सिनेमाच्या बाहेरील क्षेत्रातही यशस्वी ठरला. बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांप्रमाणे त्याने नाव कमावण्यात यश मिळवलय. ओटीटी प्लॅटफॉर्मवर त्याच्या इतके मोठे यश बॉलिवूडमधील फार कमी लोकांना मिळाले आहे. त्याने नॅशनल स्कुल ऑफ ड्रामाच्या मार्गावरुन जात असताना बॉलिवूडमध्येही स्वत;ला सिद्ध केलय. नॅशनला अवॉर्ड मनोज वाजपेयी आणि आशिष विद्यार्थींना मिळाला होता, तो पटकावल्यानंतर मला सर्वांत मोठा आनंद मिळाला होता, असे पकज त्रिपाठीने म्हटले होते. पंकजला भीष्म सहानीच्या नाटकात पहिल्यांदा रोल मिळाला होता. त्याची सर्वांकडून कौतुक झाले. ओएमजी 2 च्या माध्यमातून मुलांना लैंगिक शिक्षण दिली जावे, असा मेसेज देण्यात आलाय.
गँग ऑफ वासेपूर ते ओटीटी प्लॅटफॉर्म
पंकजने असेही काम केले. जिथे त्याच्या भूमिकेला काढून टाकण्यात आले. दरम्यान अनेक वर्षांच्या संघर्षानंतर त्याला गँग ऑफ वासेपूरच्या कुरेशीच्या मिळालेल्या भूमिकेने त्याला वेगळी ओळख निर्माण करता आली. या सिनेमासाठी अनुराग कश्यपने त्याला रिजेक्ट केले होते. वासेपूरपासून त्याला मोठे सिनेमे मिळत गेले. त्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवरही तो झळकू लागला. सॅक्रेड गेम्स, क्रिमिनल जस्टीस आणि मिर्झापूरने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. मिर्झापूरने पंकजला स्टार बनवले, असे म्हटले तर वावगे ठरणा नाही.
View this post on Instagram
View this post on Instagram
इतर महत्वाच्या बातम्या