Alia Bhatt : 'वाटलं होतं पाकिस्तानीच असा विचार करतात...' ; आलियाच्या वक्तव्याला पाकिस्तानी अभिनेत्रींचा पाठिंबा
Alia Bhatt : आता पाकिस्तानी अभिनेत्रींनी आलियाला सपोर्ट केला आहे.
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) 27 जून रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन चाहत्यांना गूड न्यूज दिली आहे.आलिया भट आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor)यांच्या घरी लवकरच एका चिमुकल्या पाहूण्याचे आगमन होणार आहे.आलियानं सोशल मीडियावर रणबीरसोबतचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोला आलियानं कॅप्शन दिलं 'आमचं बाळ लवकरच येत आहे'. आलियानं ही गूड न्यूज दिल्यानंतर काहींनी आलियाला ट्रोल केलं. त्यानंतर आलियानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं. आता पाकिस्तानी अभिनेत्रींनी आलियाला सपोर्ट केला आहे.
जारा नूर अब्बास सिद्दीकी
आलियानं ट्रोलर्सला उत्तर देत शेअर केलेल्या पोस्टला रिपोस्ट करुन पाकिस्तानी अभिनेत्री जारा नूर अब्बास सिद्दीकीनं आलियाला पाठिंबा दिला आहे. तिनं पोस्टमध्ये लिहिलं, 'मला वाटलं होतं की केवळ पाकिस्तानीच असा विचार करतात. जेव्हा अभिनेत्री गर्भवती होतात तेव्हा लोकांना वाटतं त्यांना काम मिळणार नाही. महिला या प्रत्येक कामात चांगले असतात. महिलांना त्यांचे मातृत्व आणि टॅलेंट सिद्ध करण्याची गरज नाहीये. '
दुर-ए-फिशान सलीम
अभिनेत्री दुर-ए-फिशान सलीमनं देखील आलियाला सपोर्ट केला. 'आपण लग्न करु शकतो तसेच मुलांना देखील जन्म देखील देऊ शकतो. लग्न हा जीवनाचा एक भाग आहे, टप्पा नाही.', अशी पोस्ट दुर-ए-फिशान सलीमनं शेअर केली.
आलियाची पोस्ट
'मी एक स्त्री आहे, एखादे पार्सल नाही.आम्ही अजूनही काही लोकांच्या मनात राहतो, आम्ही अजूनही पितृसत्ताक जगात जगत आहोत. तुमच्या माहितीसाठी सांगते, कोणत्याही कामाला अजून विलंब झालेला नाही. मला कुणीही घ्यायला येण्याची गरज नाही, मी एक स्त्री आहे, पार्सल नाही.' अशी पोस्ट आलियानं पोस्ट केली होती.
आलियाचे ‘हार्ट ऑफ स्टोन’ आणि ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हे आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
हेही वाचा:
Alia Bhatt Pregnancy: ‘मी काही पार्सल नाही!’, माध्यमांतील चर्चांवर आलिया भट्टने व्यक्त केला संताप!