एक्स्प्लोर

Filmmaker Pahlaj Nihalani Passes Away: गोविंदा, चंकी पांडे यांना लॉन्च करणारे प्रख्यात सिनेनिर्माते पहलाज निहलानी यांचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

Filmmaker Pahlaj Nihalani Passes Away: प्रख्यात सिनेनिर्माते आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी वयाच्या 76 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

Filmmaker Pahlaj Nihalani Passes Away: प्रख्यात चित्रपट निर्माते (Filmmaker) आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष (Ex CBFC Chairperson), पहलाज निहलानी (Pahlaj Nihalani Death) यांचं निधन झाले आहे. वयाच्या 79 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पहलाज निहलानी हे गेल्या काही काळापासून यकृताशी संबंधित आजारांशी लढा देत होते. त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण, मृत्यूशी त्यांची झुंज अखेर अपयशी ठरली.  गुरुवार, 4 जून रोजी मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला.

पहलाज निहलानी यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन (Pahlaj Nihalani Death News)

FWICE चे अध्यक्ष बी. एन. तिवारी यांनी पहलाज निहलानी यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, "सिनेसृष्टीसाठी हा एक मोठा धक्का आहे. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे पहलाजजी यांचं निधन झालंय..."

पहलाज निहलानी यांची कारकीर्द (Pahlaj Nihalani Career Graph)

पहलाज निहलानी यांनी 1982 मध्ये 'हथकडी' या सिनेमाद्वारे निर्माता म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. अनेक दशकांपासून बॉलिवूडमध्ये एक अत्यंत परिचित नाव असलेल्या निहलानी यांनी निर्माता म्हणून अत्यंत यशस्वी कारकीर्द घडवली. त्यांनी 'आँखे', 'अंदाज', 'शोला और शबनम', 'तलाश', 'रंगीला राजा' आणि 'ज्युली 2' यांसारखे अनेक हिट सिनेमे दिले. गोविंदा आणि दिव्या भारती ही पहलाज निहलानी यांची आवडती जोडी, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यांनी या दोघांसोबत अनेक सिनेमे केले. 

गोविंदा, चंकी पांडे यांना लॉन्च करणारा निर्माता, पहलाज निहलानी

अनेक अभिनेत्यांच्या कारकिर्दीत पहलाज निहलानी यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. 1986 मध्ये त्यांनी 'इल्झाम' या सिनेमाद्वारे गोविंदाला सिनेसृष्टीत लाँच केलं आणि त्यानंतर 'आग ही आग' या सिनेमाद्वारे चंकी पांडेला या क्षेत्रात आणलं. पुढे, पहलाज निहलानी यांनी गोविंदा आणि चंकी पांडे यांची प्रमुख भूमिका असलेला 'आँखे' सिनेमाची निर्मिती केलेली. 1993 मध्ये प्रदर्शित झालेला हा सिनेमा त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांपैकी एक ठरला. 

पहलाज निहलानी यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात 1982 मध्ये 'हथकडी' सिनेमाद्वारे निर्माता म्हणून केली. 'आंखें', 'अंदाज', 'शोला और शबनम', 'पाप की दुनिया', 'इल्जाम', 'तलाश', 'रंगीला राजा', 'जूली 2', 'मिट्टी और सोना', 'आग ही आग', 'गुनाहों का फैसला', 'हथकड़ी' यांसारख्या अनेक सुपरहिट सिनेमांची निर्मिती त्यांनी केली.  

2015 ते 2017 या काळात CBFC प्रमुख म्हणून कार्यभार सांभाळला

पहलाज निहलानी यांनी 2015 ते 2017 या कालावधीत CBFC चे प्रमुख म्हणून कार्यभार सांभाळला. सिनेमांमधील हिंसक आणि इंटिमेट सीन्समध्ये विनाकारण कपात केल्याचा आरोप अनेकांनी त्यांच्यावर केला. या कार्यपद्धतीमुळे त्यांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला. जेम्स बाँडचा सिनेमा 'स्पेक्टर' (Spectre) मधील एका किसींग सीनमध्ये कात्री लावण्याचे आदेश दिल्यामुळे, त्यांना सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आलेलं. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Model Divyanshu Joshi Died: 20 वर्षांपासून बंद होती खाण, तरीही फोटो काढायला पाण्यात उतरला अन्...; सुप्रसिद्ध मॉडेलचा बुडून दुर्दैवी अंत

ABP माझाच्या बातम्या LIVE... 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget