एक्स्प्लोर

OTT psychological Thriller: IMDb वर 8.7 रेटिंग; OTT वर हिंदीत पाहा 170 मिनिटांचा सायकोलॉजिकल थ्रिलर, क्लायमॅक्सला धक्कादायक ट्विस्ट पाहून डोकं चक्रावेल

शेवटचा क्लायमॅक्स संपूर्ण कथेला अनपेक्षित वळण देतो आणि प्रेक्षकांना अक्षरशः थक्क करून सोडतो.

OTT psychological Thriller: जर तुम्हाला मेंदूला चालना देणारे सायकोलॉजिकल थ्रिलर (Psychological Thriller) चित्रपट आवडत असतील, तर तुमच्यासाठी OTT वर एक जबरदस्त पर्याय उपलब्ध झाला आहे. तेलुगूमध्ये बनलेला 'राव बहादूर' (Ravbahaddur)  हा चित्रपट आता हिंदीसह इतर भाषांमध्येही पाहता येणार आहे. IMDb वर या चित्रपटाला 8.7 इतके दमदार रेटिंग मिळाले असून, त्याच्या कथानकाची आणि अभिनयाची प्रेक्षकांकडून मोठी प्रशंसा होत आहे.

एका वृद्ध, श्रीमंत, प्रचंड विक्षिप्त आणि दारूच्या आहारी गेलेल्या माणसाची ही कथा आहे. यकृताच्या कर्करोगामुळे त्याच्याकडे अवघे चार महिने उरले असल्याचे डॉक्टर सांगतात. पत्नी त्याच्यापासून दूर राहते, मोठा मुलगा मृत्यूमुखी पडलेला असतो, तर धाकटा मुलगा सतत संघर्ष करत असतो. मात्र एक वेडसर ध्यास त्याला मृत्यूच्या उंबरठ्यावरही जिवंत ठेवतो. सत्यदेवच्या दमदार अभिनयामुळे हा चित्रपट विशेष चर्चेत आला आहे. 3 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट आता OTT वर प्रदर्शित होत आहे.

OTT वर कधी आणि कुठे पाहता येणार?

दिग्दर्शक वेंकटेश महा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला 'राव बहादूर' हा सायकोलॉजिकल थ्रिलर आणि डार्क कॉमेडी चित्रपट महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर यांच्या GMB Entertainment या बॅनरखाली सादर करण्यात आला आहे. हा चित्रपट 31 जुलैपासून Netflix वर तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये स्ट्रीम होत आहे.

काय आहे 'राव बहादूर'ची कथा?

भुवनम रामप्पा राव बहादूर (सत्यदेव) हा वृद्ध, श्रीमंत, दारूच्या व्यसनाधीन आणि मानसिकदृष्ट्या अस्थिर व्यक्ती आहे. तो यकृताच्या कर्करोगाच्या शेवटच्या टप्प्यात असतो. डॉक्टरांनी त्याच्याकडे फक्त चार महिने शिल्लक असल्याचे सांगितलेले असते. मात्र आपल्या पूर्वजांच्या 'भुवनालयम' या वाड्यात तो अपेक्षेपेक्षा जास्त काळ जिवंत राहतो.

मृत्यू अगदी जवळ आला असतानाही त्याच्या मनात एकच संशय पेटलेला असतो- धाकटा मुलगा खरोखर त्याचाच आहे का? या एका प्रश्नामुळे कुटुंबातील नातेसंबंध तुटू लागतात आणि वर्षानुवर्षे दडलेली गुपितं समोर येऊ लागतात. भूतकाळ आणि वर्तमानाचा प्रवास करत कथा सस्पेन्स, भावनिक संघर्ष आणि धक्कादायक ट्विस्टकडे सरकते. शेवटचा क्लायमॅक्स संपूर्ण कथेला अनपेक्षित वळण देतो आणि प्रेक्षकांना अक्षरशः थक्क करून सोडतो.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget