एक्स्प्लोर

Indian Predator: Beast of Bangalore: माणूस नाही हैवान... दिवसा पोलीसाची वर्दी घालायचा अन् रात्री महिलांना हेरुन अब्रू लुटून संपवायचा; 129 मिनटांची क्राईम स्टोरी हादरवते

Netflix True Story Indian Predator: माणूस नाही हैवान तो... माजी पोलीस अधिकाऱ्यानं 18 महिलांना ओरबाडून संपवलं, फासावर लटकवणार होते, पण... 129 मिनटांची खऱ्याखुऱ्या घटनेवर आधारित असलेली स्टोरी पाहून थरकाप उडेल

OTT Platform Netflix True Story Indian Predator: Beast of Bangalore: ओटीटीवर (OTT) प्रत्येक मिनिटाला म्हटलं तरी काहीना काही नवं येत असतं. काही कॉमेडी सीरिज किंवा फिल्म्स असतात, तर काही हॉरर... पण, आज आम्ही तुम्हाला एका खऱ्याखुऱ्या घटनेवर आधारित क्राईम डॉक्टुमेंटरीबाबत (Crime Documentary) सांगणार आहोत. ही फक्त अंगावर शहारेच आणत नाहीतर तुम्हाला पुरतं हादरवून सोडते. आपलं रक्षण करण्यासाठी असलेल्या पोलिसाची ही कहाणी, या डॉक्युमेंटरीच्या तीन भागांमध्ये एका पोलिसाचा भयानक चेहरा दिसतो आणि संपूर्ण सीरिज तुम्हाला हादरवून सोडते. 

समाजात शांतता आणि सुव्यवस्था टिकवण्याचं काम पोलीस करतात. लोक अनेकदा पोलिसांवर असा विश्वास ठेवतात. पोलीस जर इथे असतील, तर आपण सुरक्षित आहोत, असं प्रत्येकाला वाटतं. पण कधीकधी आपल्या सुरक्षेसाठी तैनात असलेला पोलीस समाजातील एखाद्या व्यक्तीसाठी घातक समस्या बनू शकतो. जर तुम्हाला यावर विश्वास नसेल, तर नेटफ्लिक्सची ही डॉक्युमेंट्री पाहिल्यानंतर तुम्हाला तुमचा विचार बदलावा लागू शकतो. ही तीन एपिसोड्सची डॉक्युमेंट्री आहे. ही एका रिअल स्टोरीवर आधारित क्राइम डॉक्यू सीरीज आहे. या सीरिजच्या तीन एपिसोड्समध्ये पोलिसाचा खुंखार चेहरा दिसून येतो आणि संपूर्ण सीरिज हादरवून सोडते. 

डॉक्युमेंट्रीचं नाव काय? 

आपण ज्या क्राइम डॉक्युड्रामाबाबत बोलत आहोत, त्याचं नाव 'इंडियन प्रीडेटर - बीस्ट ऑफ बंगलोर' (Indian Predator: Beast of Bangalore) आहे. ही कथा एका व्यक्तीची आहे, जो पोलिसात कॉन्स्टेबल होता. पण हा त्याच्या निर्दयी आणि क्रूर चेहऱ्यावरचा मुखवटा होता. खरं तर, तो एक सीरिअल किलर, बलात्कारी आणि खुनी होता. तो दिवसा गणवेश घालून समाजाचं रक्षण करण्याचा आव आणायचा आणि रात्री त्याच गणवेशाच्या आडून आपला वाईट हेतू अंमलात आणायचा. हा पोलीस उमेश रेड्डी होता. जो एकट्या महिलांना लक्ष्य करायचा. तो त्या महिलांचा पाठलाग करायचा, त्यांच्या घरात घुसायचा, त्यांच्यावर बलात्कार करायचा आणि नंतर त्यांना मारायचा.

फाशी देण्याऐवजी मिळाली 'ही' शिक्षा 

'इंडियन प्रीडेटर - बीस्ट ऑफ बंगलोर' (Indian Predator: Beast of Bangalore) या डॉक्यु सीरिजमध्ये उमेश रेड्डीच्या ब्रूटल क्राईमला थ्रिलरच्या स्वरुपात सादर करण्यात आलं आहे. ज्यामध्ये तुम्ही पोलीस, पत्रकार आणि प्रकरणाशी संबंधित काही इतर लोकांच्या रियल इंटरव्यूजही पाहू शकता. काही सीन्समध्ये क्राईम सीनला रीकंस्ट्रक्ट करण्यासोबतच कोर्ट केसचेही डिटेल्स दाखवण्यात आले आहेत. त्या नराधम पोलिसानं तब्बल 18 महिलांसोबत बलात्कार आणि हत्येच्या जघन्य कृत्याची कबुली दिली आणि त्यापैकी नऊ प्रकरणांमध्ये तो दोषी आढळला. 2002 मध्ये त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. पण नंतर ही शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Actress Exposed Salman Khan: 'सलमान खानसोबतच्या आठ वन-नाईट स्टँडमुळे मी थकलेले...'; एक्स-गर्लफ्रेंडकडून सुपरस्टार भाईजानची पोलखोल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

NASA astronaut Sunita Williams Retires: तीन मोहिमेतून तब्बल 608 दिवस अंतराळात घालवलेल्या सुनिता विल्यम्स यांची 'नासा'तून निवृत्ती; अंतराळ रणरागिनीची सोन्याची पावलं आता जमिनीवर 'विसावणार'
तीन मोहिमेतून तब्बल 608 दिवस अंतराळात घालवलेल्या सुनिता विल्यम्स यांची 'नासा'तून निवृत्ती; अंतराळ रणरागिनीची सोन्याची पावलं आता जमिनीवर 'विसावणार'
School girl letter to Ajit Pawar: आमच्याकडे काही सोयी नाहीत; सगळं कागदावरचं दाखवलं गेलंय, लाखो रुपये...; जिल्हा परिषदेच्या शाळेतील चिमुकलीने अजित पवारांना धाडलं पत्र
आमच्याकडे काही सोयी नाहीत; सगळं कागदावरचं दाखवलं गेलंय, लाखो रुपये...; जिल्हा परिषदेच्या शाळेतील चिमुकलीने अजित पवारांना धाडलं पत्र
लोढा हेडक्वार्टर मुंबईत, JSWचं बीकेसीत, जे काम मुंबईत बसून होते, त्यासाठी राज्याच्या तिजोरीतून पैसा खर्च करून 'पंचतारांकित पिकनिक' करण्याची गरज काय? राऊतांचा हल्लाबोल
लोढा हेडक्वार्टर मुंबईत, JSWचं बीकेसीत, जे काम मुंबईत बसून होते, त्यासाठी राज्याच्या तिजोरीतून पैसा खर्च करून 'पंचतारांकित पिकनिक' करण्याची गरज काय? राऊतांचा हल्लाबोल
Mumbai Mayor BJP Shivsena Deal: मोठी बातमी: भाजप-शिवसेनेची डील झाली? मुंबईत पाठिंबा देण्याच्या मोबदल्यात शिंदे सेनेला नाशिकच्या सत्तेत वाटा, तडजोडीचे संकेत
भाजप-शिवसेनेची डील झाली? मुंबईत पाठिंबा देण्याच्या मोबदल्यात शिंदे सेनेला नाशिकच्या सत्तेत वाटा, तडजोडीचे संकेत

व्हिडीओ

Mahesh Sawant On Samadhan Sarvankar : भाजपच्या टोळीमुळे पराभव झाल्याचा आरोप करणाऱ्या सरवणकरांना सावंतांनी सुनावलं
Harshwardhan Sapkal Buldhana: प्रतिभा धानोरकर-विजय वडेट्टीवार वादावर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
Pratibha Dhanorkar On Vijay Wadettiwar : काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर, चंद्रपूरात प्रतिभा धानेकर आणि विजय वडेट्टीवार वाद शिगेला
Gosikhurd Project Special Report गोसेखुर्द काठोकाठ पण 38 वर्षांपासून गावकरी पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत
Naresh Mhaske Coffee with Kaushik : मुंबईत महापौर कुणाचा? खासदार नरेश म्हस्के यांचा खळबळजनक पॉडकास्ट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NASA astronaut Sunita Williams Retires: तीन मोहिमेतून तब्बल 608 दिवस अंतराळात घालवलेल्या सुनिता विल्यम्स यांची 'नासा'तून निवृत्ती; अंतराळ रणरागिनीची सोन्याची पावलं आता जमिनीवर 'विसावणार'
तीन मोहिमेतून तब्बल 608 दिवस अंतराळात घालवलेल्या सुनिता विल्यम्स यांची 'नासा'तून निवृत्ती; अंतराळ रणरागिनीची सोन्याची पावलं आता जमिनीवर 'विसावणार'
School girl letter to Ajit Pawar: आमच्याकडे काही सोयी नाहीत; सगळं कागदावरचं दाखवलं गेलंय, लाखो रुपये...; जिल्हा परिषदेच्या शाळेतील चिमुकलीने अजित पवारांना धाडलं पत्र
आमच्याकडे काही सोयी नाहीत; सगळं कागदावरचं दाखवलं गेलंय, लाखो रुपये...; जिल्हा परिषदेच्या शाळेतील चिमुकलीने अजित पवारांना धाडलं पत्र
लोढा हेडक्वार्टर मुंबईत, JSWचं बीकेसीत, जे काम मुंबईत बसून होते, त्यासाठी राज्याच्या तिजोरीतून पैसा खर्च करून 'पंचतारांकित पिकनिक' करण्याची गरज काय? राऊतांचा हल्लाबोल
लोढा हेडक्वार्टर मुंबईत, JSWचं बीकेसीत, जे काम मुंबईत बसून होते, त्यासाठी राज्याच्या तिजोरीतून पैसा खर्च करून 'पंचतारांकित पिकनिक' करण्याची गरज काय? राऊतांचा हल्लाबोल
Mumbai Mayor BJP Shivsena Deal: मोठी बातमी: भाजप-शिवसेनेची डील झाली? मुंबईत पाठिंबा देण्याच्या मोबदल्यात शिंदे सेनेला नाशिकच्या सत्तेत वाटा, तडजोडीचे संकेत
भाजप-शिवसेनेची डील झाली? मुंबईत पाठिंबा देण्याच्या मोबदल्यात शिंदे सेनेला नाशिकच्या सत्तेत वाटा, तडजोडीचे संकेत
Devendra Fadnavis Davos: रायगड-पेणमध्ये ग्रोथ सेंटर उभं राहणार; प्रचंड गुंतवणूक, आधुनिक तंत्रज्ञान भारतात येणार, देवेंद्र फडणवीसांची दावोसमधून मोठी घोषणा
तिसऱ्या मुंबईला बुस्ट मिळणार, रायगड-पेणमध्ये ग्रोथ सेंटर उभं राहणार; देवेंद्र फडणवीसांची दावोसमधून मोठी घोषणा
Samadhan Sarvankar vs BJP: सरवणकर कुटुंबाचं काम करू नका, माझं नाव सांगा...; समाधान सरवणकरांच्या आरोपानंतर व्हॉट्सअ‍ॅपवरील चॅट व्हायरल, नेमकं काय काय म्हटलंय?
सरवणकर कुटुंबाचं काम करू नका, माझं नाव...; समाधान यांच्या आरोपानंतर व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल
Mahesh Sawant on Samadhan Sarvankar: समाधान सरवणकरांनी सांगितलं, भाजपच्या एका टोळीने मला हरवलं, आता ठाकरे गटाचे स्थानिक आमदार महेश सावंत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
समाधान सरवणकर म्हणाले भाजपच्या 'त्या' टोळीमुळे हरलो, महेश सावंतांनी खडेबोल सुनावले, म्हणाले....
BMC Mayor 2026: मुंबईच्या महापौरपदासाठी 114 चा ‘जादुई आकडा’ आवश्यक नाही, वस्तुस्थिती काय?; RTI कार्यकर्ते अनिल गलगलींनी सगळं सांगितलं!
मुंबईच्या महापौरपदासाठी 114 चा ‘जादुई आकडा’ आवश्यक नाही, वस्तुस्थिती काय?; RTI कार्यकर्ते अनिल गलगलींनी सगळं सांगितलं!
Embed widget