एक्स्प्लोर

Actress Exposed Salman Khan: 'सलमान खानसोबतच्या आठ वन-नाईट स्टँडमुळे मी थकलेले...'; एक्स-गर्लफ्रेंडकडून सुपरस्टार भाईजानची पोलखोल

Somy Ali Exposed Salman Khan: बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा केवळ त्याच्या दमदार अभिनयासाठीच नाही तर त्याच्या लव्ह अफेअर्समुळेही चर्चेत असतो. पण, सध्या तो चर्चेत आलाय, त्याच्या एक्स गर्लफ्रेंडमुळे...

Somy Ali Exposed Salman Khan: बॉलिवूडचा (Bollywood News) भाईजान सलमान खान (Salman Khan) लग्न कधी करणार? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. साठीला टेकलेला सलमानच्या लग्नाचा अजून थांगपत्ता नाही, पण आजवर दबंग भाईजानचे अफेअर्स काही कमी झाले नाहीत, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे, मग संगीत बिजलानीसोबतचं (Sangeeta Bijlani) अगदी लग्नापर्यंतचं नातं असो किंवा मग ऐश्वर्या रायसोबतचं (Aishwarya Rai) सिरिअस रिलेशनशिप किंवा कतरिना कैफसोबतचं (Katrina Kaif) अफेअर, सलमानच्या या नात्यांबाबतच्या अनेक गोष्टी आपण ऐकल्यात, पण यापैकी एकही नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अशातच आता सलमान खानच्या एक्स-गर्लफ्रेंडनं बोलताना सुपरस्टार सलमान खानची पोलखोल केली आहे. या अभिनेत्रीनं थेट सलमानच्या वन नाईट स्टँडवर खळबळजनक खुलासा केला आहे. 

बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Bollywood Actor Salman Khan) हा केवळ त्याच्या दमदार अभिनयासाठीच नाही तर त्याच्या लव्ह अफेअर्समुळेही चर्चेत असतो. बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबत डेटिंग करण्यापूर्वी सलमान खान सोमी अलीसोबत सीरिअस रिलेशनशिपमध्ये होता. असं म्हटलं जातं की, ते दोघेही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते आणि लग्न करणार होते. पण, काही कारणामुळे गोष्टी लग्नापर्यंत पोहोचण्यापूर्वीच थांबल्या. आता सोमी अलीनं (Somy Ali) समोर येऊन अनेक गोष्टींचा खळबळजनक खुलासा केला आहे.

सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीनं सुपरस्टारसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे केलेत. इतकंच नाही तर अनेक जुन्या मुलाखतींमध्ये सोमी अलीनं तिचा एक्स बॉयफ्रेंड सलमान खानचा अपमानही केला होता. सोमी अलीनं सलमान खानवर तिच्याशी गैरवर्तन करण्याचा तसेच मारहाण करण्याचा आरोप केला होता.

अलिकडेच, सोमी अलीनं रेडिट एएमए (Ask Me Anything) सत्रात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. तिनं सलमान खानचं वैयक्तिक आयुष्य, त्याच्यासोबतच्या नात्याचा अनुभव आणि काही खळबळजनक दावे केले आहेत.

Actress Exposed Salman Khan: 'सलमान खानसोबतच्या आठ वन-नाईट स्टँडमुळे मी थकलेले...'; एक्स-गर्लफ्रेंडकडून सुपरस्टार भाईजानची पोलखोल

सलमान खानच्या आठ वन-नाईट स्टँडमुळे कंटाळलेले : सोमी अली 

अभिनेत्री सोमी अलीनं आपल्या करिअरला अलविदा करण्याचं मुख्य कारण सर्वांसमोर सांगितलं. ती म्हणाली की, "सलमान खानच्या 8 वन-नाईट स्टँड्सना मी कंटाळले होते. दररोज मला त्याच्या नव्या लफड्याबाबत ऐकायला मिळायचं. सलमान खान मला शिवीगाळ करायचा आणि त्याच्या वागण्यातून मला हीन वागणूक द्यायचा, अपमानही करायचा..."

सोमी अली म्हणाली की, "सलमान खानला जे हवं होतं, ते सहज मिळायचं. अनेक मुली स्वतः जाऊन सलमान खानला इंम्प्रेस करायच्या, तो काही मुलींना डोळ्यांनी ऑफर करायचा." सोमी अलीनं पुढे बोलताना स्पष्टपणे सांगितलं होतं की, तिचं शोषण झालेलं. सोमी अलीचं हे वक्तव्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सोमी अलीनं सांगितलं की, तिला अनेकदा फिल्म्सच्या ऑफर मिळाल्यात, पण सलमान खाननं तिला, त्याचं सत्य बाहेर येईल या भितीनं इंडस्ट्रीपासून बाहेर ठेवलं. सोमी अलीनं सांगितलं की, त्यांनी फक्त सलमान खानला मिळवण्यासाठी बॉलिवूडमध्ये एन्ट्री केलेली, पण पुढे जे तिच्यासोबत घडलं त्यामुळे ती पुरती निराश झालेली. 

यावेळी सोमी अलीनं सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोईबाबतही भाष्य केलं. सोमी अली म्हणाली की, लॉरेन्स बिश्नोई बॉलिवूडचा नवा दाऊद आणि छोटा शकील बनले आहेत. पण, त्यासोबतच सोमी अली म्हणाली की, ती हत्या किंवा गंभीर हिंसाचाराचं समर्थन करत नाही.

Throwback To When Salman Khan And Somy Ali Were Madly In Love; Their Split & More | HerZindagi

सोमी अली आणि सलमान खानचे नाते

मिडिया रिपोर्टनुसार, सलमान खान आणि सोमी अली 1991 ते 1999 पर्यंत रिलेशनशिपमध्ये होत्या. त्यांचं अफेअर तब्बल 8 वर्ष चाललं. सोमी अली सलमान खानला प्रपोज करणारी पहिली अभिनेत्री, त्यानंतर दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. 

1999 मध्ये ब्रेकअप झाल्यानंतर सोमी अली अमेरिकेला परत गेली. तिनं तिथेच तिचं शिक्षण पूर्ण केलं. असं म्हटलं जातं की, सोमी अलीचे अमेरिकेत 4 अफेअर होते. सर्वात आधी ती एका भारतीय सर्जनसोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्यानंतर तिचं एका पत्रकाराशी, नंतर एका कॉर्पोरेट वकीलाशी आणि शेवटी तिचं एका प्राध्यापकाशी अफेअर होतं.

सोमी अली सध्या करते काय? 

मिडिया रिपोर्टनुसार, सोमी अली ही एक पाकिस्तानी-अमेरिकन अभिनेत्री, लेखिका, चित्रपट निर्माती, मॉडेल आणि अॅक्टिव्हिस्ट आहे. तिनं बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. ती 2007 पासून नो मोर टीयर्स नावाची एक एनजीओ चालवते.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Actress Became Bollywood Queen to Global Icon: सलमान खानशी भांडण, वाटलं आता संपलं करिअर, बॉलिवूडला रामराम करुन हॉलिवूडची धरली वाट; आता 'हिचा' एंजेलिना जोलीसारखा थाट

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil: 'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
फॉर्च्यूनरचा चेंदामेंदा, पुण्याहून गुजरातला निघालेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू संभाजी पाटीलचा अपघाती मृत्यू
फॉर्च्यूनरचा चेंदामेंदा, पुण्याहून गुजरातला निघालेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू संभाजी पाटीलचा अपघाती मृत्यू
ZP Eelction results: झेडपी निवडणुकीत अजित दादांच्या राष्ट्रवादीचा मोठा विजय, पुण्यातही सर्वाधिक जागा; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया
झेडपी निवडणुकीत अजित दादांच्या राष्ट्रवादीचा मोठा विजय, पुण्यातही सर्वाधिक जागा; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 फेब्रुवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 फेब्रुवारी 2026 | सोमवार

व्हिडीओ

Aditi Tatkare : निवडणुकीतील यश पाहण्यासाठी दादा हवे होते, निवडणुकीच्या यशानंतर अदिती तटकरे भावूक
Sharad Pawar Health Update : शरद पवार होतोय श्वसनाचा त्रास, रुबी रुग्णालयात केलं दाखल
Ram Satpute On ZP Election : मोहिते पाटील आणि जानकरांना घरात बसवलं- राम सातपुते
Avinash Jadhav : एक दिवस असा येईल की भाजपला एक जागा आणायलाही कसर करावी लागेल
Bharat Gogawale ZP Celebration : जिल्हा परिषदेत लेकाचा विजय, भरत गोगावलेंचं विजयी सेलिब्रेशन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil: 'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
फॉर्च्यूनरचा चेंदामेंदा, पुण्याहून गुजरातला निघालेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू संभाजी पाटीलचा अपघाती मृत्यू
फॉर्च्यूनरचा चेंदामेंदा, पुण्याहून गुजरातला निघालेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू संभाजी पाटीलचा अपघाती मृत्यू
ZP Eelction results: झेडपी निवडणुकीत अजित दादांच्या राष्ट्रवादीचा मोठा विजय, पुण्यातही सर्वाधिक जागा; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया
झेडपी निवडणुकीत अजित दादांच्या राष्ट्रवादीचा मोठा विजय, पुण्यातही सर्वाधिक जागा; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 फेब्रुवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 फेब्रुवारी 2026 | सोमवार
Kolhapur ZP Election Result: अजितदादांच्या अकाली निधनानंतर कोल्हापूरकरांची राष्ट्रवादीला साथ; सतेज पाटलांची पुन्हा एकदा महायुतीविरोधात एकहाती कडवी झुंज
अजितदादांच्या अकाली निधनानंतर कोल्हापूरकरांची राष्ट्रवादीला साथ; सतेज पाटलांची पुन्हा एकदा महायुतीविरोधात एकहाती कडवी झुंज
ZP निवडणुकीत धाकटी ठरली वरचढ; थोरल्या जाऊबाईंचा अवघ्या 2 मतांनी पराभव; माजी आमदाराला 'दे धक्का'
ZP निवडणुकीत धाकटी ठरली वरचढ; थोरल्या जाऊबाईंचा अवघ्या 2 मतांनी पराभव; माजी आमदाराला 'दे धक्का'
Satara ZP Election Result 2026 : माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना धक्का, पत्नी प्राची पाटील पराभूत, शिवसेनेच्या 22 वर्षांच्या उमेदवार मृणाल पाटील विजयी
साताऱ्याच्या पाटण तालुक्यातून धक्कादायक निकाल, नरेंद्र पाटील यांच्या पत्नी प्राची पाटील पराभूत, शिवसेनेच्या मृणाल पाटील विजयी
Sangli : मुख्यमंत्र्यांचं नाव घेत आव्हान दिलं, आता सर्व जागा जिंकत भाजपचा धुव्वा उडवला, खानापुरात शिंदेंच्या आमदाराची कमाल
मुख्यमंत्र्यांचं नाव घेत आव्हान दिलं, आता सर्व जागा जिंकत भाजपचा धुव्वा उडवला, खानापुरात शिंदेंच्या आमदाराची कमाल
Embed widget